रावळगुंडवाडी स्पेशल : हुलग्याची ओट्टिगे आमटी
ह्या आमटीची दीक्षा मला आमच्या मल्लाप्पा नावाच्या शेजार्याने दिली.
ह्या आमटीची दीक्षा मला आमच्या मल्लाप्पा नावाच्या शेजार्याने दिली.
पेर्णा पाभे सरांची तू
http://misalpav.com/node/50075
थू -१
तू चालते अशी वटवृक्षाचे जणू खोड ग
अंगावरती भले दांडगे ओंडके जणू ल्याले ग
तू हसते अशी छाती माझी धडधडे ग
गडगडाटाने त्या माझ हासणं सारें लोपते ग
तुझ्या नुसत्या हालचालीनेही वारा वादळी वाहतो ग
येता येता तुझ्या घामाचा गंधही संगे आणतो ग
तू बघते तेव्हा अंगावरती शहारा माझ्या येतो ग
बघून तुला मीच कधीकधी थिजल्यासारखा होतो ग
तू चालते अशी झाडावरची वेल ग
अंगावरती पानं फुलं ल्यायते ग
तू हसते अशी झरा वाहतो ग
खळखळाटानं हासणं पिकतं ग
तुझ्या येण्यानं वारा वाहतो ग
येता येता सुगंघ आणतो ग
तू बघते तेव्हा अंगावर रोमांच येतो ग
बघून तुला मीच लाजल्यागत होतो ग
तू चंचला सुरेखा चतूरा रेखीव सरिता ग
तुझ्या ठाई प्रगती हर्ष आनंद वसतो ग
- पाषाणभेद
२९/०४/२०२२
कोची-एर्नाकुलम ही केरळमधील महत्वाची शहरे असून अलीकडील काळात त्यांच्या विकासाचा वेग झपाट्याने वाढला आहे. कोची-एर्नाकुलमच्या आसपास अनेक विशेष आर्थिक क्षेत्र स्थित आहेत. त्याचबरोबर कोची हे दक्षिण भारतातील एक मोठे नैसर्गिक बंदर असून नौदलासाठी आणि व्यापारी कंपन्यांसाठी युद्धनौका आणि अन्य जहाजे बांधणारी कोचीन शिपयार्ड लिमिटेडची मोठी गोदी इथे आहे. इतकेच नव्हे तर भारतीय नौदलाच्या दक्षिण विभागाचे मुख्यालय, तेलशुद्धिकरण प्रकल्प, केरळ उच्च न्यायालय अशा अनेक महत्वाच्या संस्थाही इथे आहेत.
नुकत्याच केलेल्या मराठवाडा दौऱ्यात परळी येथील बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले 'श्री वैजनाथ' मंदिर, अंबाजोगाई येथील आमची कुलदेवी 'श्री योगेश्वरी' मंदिर, आद्यकवी श्री मुकुंदराज स्वामी समाधीस्थळ आणि जोगाई सभामंडप लेणी (हत्तीखाना) अशा ठिकाणी भेट दिली त्याचा हा थोडक्यात वृत्तांत.
14 एप्रिलला सकाळी 9:30 वाजता घरी नाश्ता केल्यावर डोंबिवली ते परळी असा सुमारे 435 किमीचा प्रवास सुरु झाला. दुपारी दोन-सव्वादोनच्या सुमारास अहमदनगर मधल्या रेस्टोरंटमध्ये जेवण करून पुन्हा प्रवासाला सुरुवात करून संध्याकाळी 7 च्या सुमारास आम्ही परळीला पोचलो.
मी आणि माझी बहीण गाडी चालवत असलो तर रस्त्यावर अन्य चालकांना शिव्या घालत आमचा प्रवास सुरु असतो. अर्थात, असे चालक दरवेळी आम्हाला काही त्रास देतात असे नव्हे, मात्र त्यांचे वागणे अन्य लोकांच्या अपघातास कारणीभूत ठरू शकते म्हणून आम्ही त्यांना शिव्या घालतो, आमच्याच गाडीच्या बाहेर ऐकू जाणार नाहीत एवढ्याच आवाजात.
श्रीनिवास च्या भावाबहिणींच्या गेट टुगेदरच्या निमित्ताने आम्ही सगळे भेटलो. पानशेतला त्याच्या बहिणीच फार्म हाऊस आहे. तिथे जमायच ठरलं. पानशेतला मी प्रथमच जात होते. शिवाय श्रीनिवास च्य भावाबहिणींना भेटायची उत्सुकता होती.
वनस्पति उद्यानातून फेरफटका मारताना
माहितीची पाटी नसलेले झाड पाहून
साहित्यिक राजूमधील चौकश्याने विचारले
हे झाड कोणते?
त्याचा वनस्पती वैज्ञानिक मित्र म्हणाला
उष्णकटिबंधीय म्हणजेच ट्रॉपीकल!
(राजूने वेळ मारून नेणे कंसात जोडले)
वनस्पती वैज्ञानिक मित्राने
राजूची वसंत ऋतूवरील कविता
ऐकुन झाल्यावर
मोबाईलवर मराठी विकिपीडियावरचे
वसंत ऋतूचे पान उघडत राजूला विचारले
रोज किती पाणी प्यावे?
शरीराची गरज असेल एवढे
आणि आधुनिक विज्ञानाने सुविद्य
डॉक्टर सुचवतील तेवढे
रोज किती पाणी प्यावे?
अन्न पिकविण्यासाठी
शेतीसाठी
शिल्लक राहील एवढे
रोज किती पाणी प्यावे?
शेती आणि शरीरांची गरज
यांचे गणित नाही जुळली तर
इतर अपव्यय टाळून
लोकसंख्या नियंत्रणाचे महत्व
ईतर चार जणांना पटवून
शरीराची गरज भागेल तेवढे
आङळे वाङळें साहित्य संमेलन
आङळे वाङळेंना म्हणाली
मराठी साहित्य संमेलनाला
नाही गेलात कसे ते?
वाङळें आङळेंना म्हणाला
तुमच्या आङळीकेचे साहित्याने
अजीर्ण झाल्यावर इतर साहित्याला
जागा आता उरलीच कुठे ?