शशक'२०२२ - टेलिपॅथी

साहित्य संपादक's picture
साहित्य संपादक in स्पर्धा
12 May 2022 - 5:23 pm

“जेवायला वाढ, खूप भूक लागलीय.” तो घरात शिरत म्हणाला.

दिवाळीचा पाडवा,ती हरखली, किंचीत लाजली सुद्धा.काय हो अचानक कसे काय?आणी ते सुद्धा रात्रीच्या साडेअकरा वाजता.तो नुसताच गालात हसला.झोपलेल्या मुलांकडे प्रेमाचा एक कटाक्ष टाकला.

आई बाबा तुम्ही येणार नाही म्हणून तुमच्या बहिणीकडे गेलेत.

त्याच्या अचानक येण्याने तारांबळ उडली होती.तोडंच्या टकळी बरोबरच तीने पाट रांगोळी करत ताट वाढायला घेतल॔.

आपल्याच नादात म्हणाली, आहो हात पाय धुऊन घ्या. तो गेला.
.
.
.
.
.
.
मुलगा तीला हालवत म्हणाला,
"ए आये,दारावरची घंटी वाजतीय".

शशक'२०२२ - समाजप्रबोधनात अंधश्रद्धा

साहित्य संपादक's picture
साहित्य संपादक in स्पर्धा
12 May 2022 - 5:19 pm

समाजप्रबोधन करणार्या साहेबांचं जोरात भाषण चालू होतं. आज साहेब धर्मावर बोलू लागले. रूढी, परंपरा, पूजा-अर्चा, देव सगळं खोटं आहे, आपण या अंधश्रद्धांमधून बाहेर पडलं पाहिजे. साहेबांच्या प्रत्येक वाक्याला टाळ्या आणि शिट्ट्यांचा पाऊस पडत होता. बसलेले श्रोते आणि मंचावरचे सर्व लोक आज साहेबांच्या या नव्या अवताराकडे आश्चर्याने बघत होते. साहेब जोषात होते. तेवढ्यात एक बाई मंचापाशी येऊन उभी राहिली. तिने साहेबांना हातही केला. साहेबांचं लक्षच नाही. मंचावर उपस्थित सहकार्यांनी बाईंना वरती बोलावलं. साहेबांना आश्चर्यच वाटलं. तू कशी काय इथं? बाई म्हणाली, आजची सभा दणक्यात व्हायला पाहिजे असा तुम्ही नवस बोललाय.

शशक'२०२२ - पेच

साहित्य संपादक's picture
साहित्य संपादक in स्पर्धा
12 May 2022 - 5:17 pm

शुभमंगल वधू वर सूचक केंद्राच्या संचालिका, प्रमिला ताई यांचे फार नाव होते. वक्त्या, सामाजिक कार्यकर्त्या, उद्योजिका अशी अनेक बिरुदं त्या मिरवीत होत्या.
ऑफिस बंद करायच्या गडबडीत त्यांनी सेक्रेटरीला हाक मारली, मुग्धा, ती मंगळी मुलामुलींची यादी, अमेरिकेतील वरवधू, अपंग वर वधू, पत्रिका पाहणारे, न पाहणारे सगळे नीट सॉर्ट करून ठेवलेस नं? नाहीतर खूप गोंधळ उडतो बघ क्लायंट्स समोर!
'आत येऊ का मॅम ..? ' एक गोरटेली, नाजूक मुलगी विचारत होती.
'ये, ना. कुणाचं नाव नोंदवायचे आहे?' प्रमिला ताईंनी विचारलं.
'अं....माझंच..म्हणजे....'. ती चाचरत म्हणाली.

शशक'२०२२ - हाऊ डिड यू डाय?

साहित्य संपादक's picture
साहित्य संपादक in स्पर्धा
12 May 2022 - 5:16 pm

“आर्टीफिशिअल इंटेलिजन्सची कमाल आहे”
“पण हे सॉफ्टवेअर कसं काम करतं?”
“भूतकाळातल्या व्यक्तीचं लेखन आणि त्या व्यक्तीचा मूळ आवाज या सॉफ्टवेअर मध्ये फीड करायचा”
“ओके मग?”
“हे सॉफ्टवेअर ती सर्व माहिती प्रोसेस करतं”
“आणि त्या व्यक्तीचा मूळ आवाज शोधून काढतं?”
“फक्त शोधून काढत नाही, तर त्या व्यक्तीच्या मूळ आवाजात बोलतं सुद्धा”

“महाराजांशी सुद्धा बोलता येईल?”
“नाही, मूळ आवाजाचा नमुना फीड करावा लागतो”
“ओह.. आता मग कोणाशी बोलता येईल?”

त्या सायंटिस्टने कॉम्पुटरच्या स्क्रीनच्या पहिल्या नावावर क्लिक केले

शशक'२०२२ - बाप

साहित्य संपादक's picture
साहित्य संपादक in स्पर्धा
12 May 2022 - 5:13 pm

शेताततला लाखाचा माल मार्केटला पोहोचू शकला नाही, खराब झाला. गेले लाख वाया, पण बाप महत्वाचा होता. बापासाठी एवढं करायला नको?

माझी राधा- ६

विजुभाऊ's picture
विजुभाऊ in जनातलं, मनातलं
12 May 2022 - 8:36 am

चालून चालून थकलो होतो. सकाळी न्याहारीही केली नव्हती. भूक बरीच लागली होती. नदीचे पाणी प्यालो. औदुंबराच्या झाडावरची काही फळे तोडून खाल्ली. झाडाची एक जाडशी फांदी पाहिली त्या,झोप लागली तरी पडणार नाही अशी खात्री करून घेतली अणि वर चढून बसलो. आता येऊ दे मायला शोधत मी सापडणारच नाही तीला.
मग कळेल की आपल्या कान्ह्याशी अबोला धरला की काय होते ते.
मागील दुवा : http://misalpav.com/node/50097

कथाविरंगुळा

श श क २०२२ - नवा काळ..

साहित्य संपादक's picture
साहित्य संपादक in स्पर्धा
12 May 2022 - 7:46 am

शंकरराव एक सुखी गृहस्थ, त्यांची पन्नाशी जवळ आली होती. बायको, दोन मुली नी एक मुलगा असा सुखी संसार. दोन्ही मुलींच्या लग्नाची चिंता त्यांना सतावत होती. नवा काळ, त्यामुळे मुलींनाच विचारावं “कुणी मनात आहे का?, कुणी आवडलंय का?” असं त्यांनी ठरवलं, दोन्ही मुलींना त्यांनी बोलावलं.
मोठी मुलगी:~ “पप्पा, मी लेस्बियन आहे, मला मूलं आवडत नाहीत मूली आवडतात, मी मुलीशीच लग्न करनार”
शंकररावांना धक्का बसला त्यांनी लहान मूलीकडे पाहीलं, “पप्पा, मी देखील लेस्बियन आहे, मलाही मूली आवडतात.” शंकरराव कोसळलेच.
संताप, तडफड, अनेक भावना एकाच वेळी ऊचंबळून आल्या.

शशक'२०२२ - जॉन डो

साहित्य संपादक's picture
साहित्य संपादक in स्पर्धा
11 May 2022 - 4:27 pm

कुळकुळीत आभाळ, दिवसभर रिपरिप चालूच. मनावर देखील शेवाळंच.
मी एकटाच या गच्चीवर. अस्वस्थ.
पोलिसांनी याच एरियात स्पॉट केलेल्या सीरियल किलरबद्दल सततच्या बातम्या खाली घरातल्या चालू असलेल्या टीव्हीवर उत्तेजित आवाजात कोणी होतकरू पत्रकार ओरडतोय.
इतक्यात खाली दरवाज्याची बेल वाजते. सावधपणे खाली डोकावलं तर रेनकोटमधे निथळत उभी एक पोरगेली आकृती दिसतेय.
मी वेळेत खाली दुबकून लपतो. नीट हालचाली केल्या पाहिजेत. शिडीवरुन मागच्या अंगणात उतरुन तिथून पुढे आलो तरच त्याला बेसावध ठेवून मागून घाव घालता येईल. एकच चान्स आहे मला.

शशक'२०२२ - कळ

साहित्य संपादक's picture
साहित्य संपादक in स्पर्धा
11 May 2022 - 7:43 am

१० वर्षाचे कोवळे पोरं ते. शिकायच्या नादात सायकल सरळ टपरीवर उभ्या असलेल्या राणाच्या बुलेटला जाऊन धडकली होती.
राणा ! झोपडपट्टीचा दादा ! आपल्या नव्याको-या बुलेटचा सायकलने उडवलेला रंग बघून त्याचे खोपडे सटकले.
"बच्चा है भाई, जाने दो !" टोळीने म्हणेपर्यंत त्याच्या हातात तो कुप्रसिद्ध सुरा चमचमायला लागला होता.
ह्या सु-याने राणा कसा एका झटक्यात पोटाचा कोथळा बाहेर काढतो हे बरेचदा ऐकले होते त्याने मित्रांकडून.
"मर साले अब " म्हणत एका झटक्यात सुरा त्याच्या पोटात फिरला. एक कळ उठली आणि रक्ताने त्याचे कपडे भिजायला लागले.

प्रसन्नतेच्या लहरी!

मार्गी's picture
मार्गी in जनातलं, मनातलं
10 May 2022 - 7:23 pm

नमस्कार. आजपर्यंत अनेक वेळेस मुलांना आकाशातल्या गमती दाखवल्या होत्या. वेगवेगळे तारे, ग्रह आणि चंद्रावरचे खड्डे बघताना मुलांच्या चेह-यावर येणारा आनंद आणि त्यांना होणारं समाधान नेहमीच अतिशय ऊर्जा देऊन जातं. 'ऑ! अरे बापरे!' 'ओह माय गॉड' अशी एक एक दृश्य बघतानाची मुलांची (आणि वयाने जास्त असलेल्या मुलांचीही) प्रतिक्रिया खूप काही सांगून जाते. त्यासारखाच पण थोडा वेगळा असा सुखद अनुभव आज घेता आला. निमित्त होतं परभणीतल्या निरामय योग प्रसार व संशोधन केंद्रामधल्या मुलांच्या सुट्टीतील शिबिरामध्ये घेतलेल्या ज्ञान रंजन अर्थात् fun and learn सत्राचं.

धोरणसमाजलेखअनुभव