शशक'२०२२ - व्यसन
बॉम्ब फेकून त्याने एकास जायबंदी नी एकास ठार केले. दुसर्या महायुध्दात शोध लागलेला “मोलोटोव” शत्रूने फेकल्याने त्याचा सहकारी होरपळून निघाला. दोन सहकारी संपल्याने युध्द जिंकवण्याची जबाबदारी आपली आहे ह्याची त्याला जाणीव होती. जातीचा सैनिक होता तो. स्नायपर वर स्कोप चढवून त्याने आवाजाच्या दिशेने रोखली. एका क्षणासाठी शत्रू खिडकीत आला की “हेडशाॅट” द्यायचा नी खल्लास, तेव्हाच तर आपण “शार्पशूटर” म्हणवले जाऊ. त्याने अर्जूनासारखी एकाग्रता साधली.
“आले, आले”
येनारे आवाज त्याच्या कानापर्यंत येत होते पण त्याला ऐकू येत नव्हते.