Skip to main content

शशक'२०२२ - विमनस्क

लेखक साहित्य संपादक यांनी रविवार, 08/05/2022 12:22 या दिवशी प्रकाशित केले.
अंधाराचा काहूर होता मेघा मनूचा हात घट्ट धरून झपझप चालत होती. आपला कोणीतरी पाठलाग करतय अशी शंका तिला आली.नजरेचा कटाक्ष तिने मागे टाकला वीजेच्या कडकडाटात तिला एक चेहरा दिसला..... 'रव्या' इंदूबाईंचा वेडसर मुलगा गचाळ हसत येत होता. वेडा रव्या गावात दगड मारत फिरायचा,शिव्या द्यायचा.मेघाला आता दरदरून घाम फुटला."मनू चल लवकर"मेघा कळवळली . छोटीसी मनू दमली होती.एका खड्ड्यात मनू पडली.ती मोठमोठ्याने रडू लागली.समोरून येणारी दोन तीन टारगट पोरं तिला हसायला लागली, तेव्हा मनूचा सूर आणखिनच वाढला. भांबावल्या मेघाने रव्याकडे पाहिलं... त्याच्या हातातला दगड त्याने जोरात त्यांच्या दिशेला भिरकावला... तिने मनूला पोटाशी घेतलं.दगड जोरात लागल्याने धावत येणारी मोकाट कुत्री विव्हळत गेली.. विमनस्क रव्या की ती पोरं?

वाचने 5430
प्रतिक्रिया 10

प्रतिक्रिया

+१

+१

विमनस्क चा अर्थ माहितेय ना? म्हणजे कथाशीर्षकाला आणि शेवटच्या ट्वीस्ट वाक्यात तोच शब्द वापरला आहे. विकृत म्हणायचे होते का?

विमनस्क अवस्थेत बसलोय. सं - दी - प

पोरं हसत होती, मधूनच कुत्री कुठून आली ? अंधाराचा काहूर, मागून कोणीतरी येतंय- अचानक टारगट पोरं आल्यावर वातावरण भंग झालं.

In reply to by कॉमी

मेघा अन् मनूच्या मागे रव्या. मनू खड्ड्यात पडली. समोरून ३ मुले येतात. रव्या दगड मारतो. तो कुत्र्याला लागतो. विमनस्कचा अर्थ काही का असेना. इथं विमनस्क कोण? रव्या, पोरं, मेघा की कुत्री? का मी??

+१ आवडली. आणि शेवटचे वाक्य नसते असते तरी चालले असते असे वाटले.