शशक'२०२२ - कळ
१० वर्षाचे कोवळे पोरं ते. शिकायच्या नादात सायकल सरळ टपरीवर उभ्या असलेल्या राणाच्या बुलेटला जाऊन धडकली होती.
राणा ! झोपडपट्टीचा दादा ! आपल्या नव्याको-या बुलेटचा सायकलने उडवलेला रंग बघून त्याचे खोपडे सटकले.
"बच्चा है भाई, जाने दो !" टोळीने म्हणेपर्यंत त्याच्या हातात तो कुप्रसिद्ध सुरा चमचमायला लागला होता.
ह्या सु-याने राणा कसा एका झटक्यात पोटाचा कोथळा बाहेर काढतो हे बरेचदा ऐकले होते त्याने मित्रांकडून.
"मर साले अब " म्हणत एका झटक्यात सुरा त्याच्या पोटात फिरला. एक कळ उठली आणि रक्ताने त्याचे कपडे भिजायला लागले.