तू.....

चक्कर_बंडा's picture
चक्कर_बंडा in जे न देखे रवी...
19 Jul 2022 - 11:12 pm

तू समोरून अलवार चालत यायचीस
मी उगाचंच रानफुलं वेचत रेंगाळायचो
पैंजणांची रुणझुण पुढे निघून जायची
मागे खच पडायचा पाऊलभर स्वप्नांचा

तू पावसात आडोसा पाहून थांबायचीस
मी मुद्दामचं भिजत पुढे निघून जायचो
काकणांची किणकिण कानाआड व्हायची
मागे ढीग पडायचा सकवार निःश्वासांचा

तू जराही वळून न पाहता निघून जायचीस
मी नुसताच थिजून पाहत राहायचो शून्यात
डोळ्यांच्या कडांवर मळभ दाटून यायचे
मागे सडा पडायचा ओंजळभर आसवांचा

मुक्त कविताकविता

अतिरंजित Sarcasm उर्फ Asterix: The Mansions of the Gods

शेर भाई's picture
शेर भाई in जनातलं, मनातलं
19 Jul 2022 - 8:43 pm

मा‍झ्या लहानपणी, म्हणजे तसा मी लहानच आहे अजून आणि तस ही मी २५ वर्षांनंतर वय मोजणं सोडून दिल, कारण देव साहेब म्हणून गेले आहेत कि “ Age is just a number.” तर मा‍झ्या लहानपणी जेव्हा आपल्याकडे उपग्रह वाहिन्याचं नुकताच आगमन झाल होत तेव्हा स्टार वाहिनीच स्टार मुव्हीज चानल नवीनच बाजारात आल तेव्हाची ही गोष्ट. स्टार मुव्हीज त्या काळातली माझ्या माहिती प्रमाणे भारतातील पहिली स-शुल्क वाहिनी होती. त्या वेळी तिथल्या सिनेमांना हिंदी सबटायटल्स असायची. तसेच त्या काळातले रात्री उशिरा लागणारे १८+ हा एक रम्य विषय आहे.

कलासमीक्षा

वह्या पुस्तके

पाषाणभेद's picture
पाषाणभेद in जनातलं, मनातलं
19 Jul 2022 - 5:37 pm

जून महिना चालू झाला की साधारणपणे मध्यमवर्गीयांच्या घरात शालेय वस्तू खरेदी करण्याची लगबग चालू होते. बहूतेक कुटूंबवत्सल पालक पगार झाला की शाळेसाठी लागणार्‍या वस्तूंच्या खरेदीसाठी बाजारात निघतात. मान्सूनचा पाऊस जरी चालू असला तरी एखाद्या सुटीच्या दिवशी आपापली मुले, त्यांच्या आया यांची स्कुटरवर निघालेली गर्दी रस्त्यावर पहायला मिळते.

भाषासमाजजीवनमानशिक्षणप्रकटनविचारआस्वादलेखअनुभवविरंगुळा

पुस्तक परिचय - वडीलधारी माणसे - लेखिका शांताबाई शेळके

मालविका's picture
मालविका in जनातलं, मनातलं
19 Jul 2022 - 1:06 pm

शांताबाईंच पुस्तक म्हणून सहजच दुकानात दिसलं आणि घेतलं हे पुस्तक. आज चवथ्या किंवा पाचव्यांदा वाचतेय. नावावरून कळलं असेलच कि यात व्यक्तिचित्र वाचायला मिळतील. शांताबाईंच्या कविता मला खूप आवडतात. पण त्यांचं गद्य लेखन मी फारसं वाचलेलं नाही. त्यामुळे हे पुस्तक दिसल्यावर मी लगेच घेतलं. आणि अगदी डोळे मिटून विश्वास ठेवावा आणि तो सार्थ ठरावा असं या पुस्तकाबाबत झालं. सहज सध्या सोप्या भाषेत त्यांनी त्यांच्या आयुष्यात आलेल्या काही व्यक्तींबाबत यात लिहिले आहे. कुठे बोजड शब्दांचा वापर नाही, कुठे अतिरेकी कौतुक केले नाही.

मुक्तकसमीक्षा

एकदा

अनन्त्_यात्री's picture
अनन्त्_यात्री in जे न देखे रवी...
19 Jul 2022 - 9:33 am

अक्षयाचा डोह भरुनी
वाहतो जेथे सदा
सांडवा तिथला कुठे ते
सांगशिल का एकदा?

अद्भुताचा ढग निळा
ओथंबतो जेथे सदा
बरसतो केव्हा, कुठे ते
सांगशिल का एकदा?

नीरवाचा घुंगरू
बघ रुणझुणे येथे सदा
सातही स्वर वर्ज्य तरिही
ऐकशिल ना एकदा!

कवितामुक्तक

अलक

मालविका's picture
मालविका in जनातलं, मनातलं
18 Jul 2022 - 9:35 pm

अलक 1
"करावं तसं भरावं", या कानाने ऐकून त्या कानाने सोडून दिलेलं वाक्य. सहजच बसस्टॉपवर पुस्तकं विकणार्या मुलाकडून चार पुस्तकं घेतली. माझ्या घरी मी एकटाच. कामवाल्या मावशीच्या मुलांना देऊन टाकली. दोन दिवसांनी त्याच्याकडून फुगे घेतले,ऑफिसमधल्या मैत्रिणीला दिले. अशीच ओळख वाढत राहिली. काही विशेष करत नव्हतो मी. दोन दिवस ताप आला. कामवाल्या मावशी कपडे भांडीच काय दोन वेळचं जेवण पण करून गेल्या. ऑफिसलातली मैत्रिण येऊन डाॅक्टरकडे घेऊन गेली. आणि तोच बसस्टॉपवरचा मुलगा, घर शोधत आला. आज तो फुलं विकत होता. चौकशी करून जाताना चार फुलं टेबलावर ठेऊन गेला. मी करत गेलो, ते माझी ओंजळ भरत गेले.

कथाप्रकटन

विस्मृतीत गेलेले पदार्थ १ - छिबा ढोकली

यश राज's picture
यश राज in पाककृती
18 Jul 2022 - 1:21 am

नमस्कार मिपाकर्स ..

आपण सर्व जाणतोच की भारतीय खाद्यसंस्कृती ही विविधतने नटलेली व प्रचंड मोठी आहे. प्रत्येक राज्यात, प्रान्तात, जिल्ह्यात एवढेच काय प्रत्येक गावा गावात खाण्या पिण्याचे असंख्य व वेगळे वेगळे प्रकार पहायला मिळतात. जे पिढी दर पिढी पुढे सुपुर्द केले जातात पण काळाच्या ओघात त्यातले काही पदार्थ नामशेष होत जातात.

रताळ्याच्या तिखट पुरी

Bhakti's picture
Bhakti in पाककृती
17 Jul 2022 - 4:40 pm

एकादशीला हक्काने घरात आलेले कार्बोहाड्रेट म्हणजे साबुदाणा ,बटाटा आणि रताळी !त्यात रताळीला एकादशीलाच जास्त आणंल जाते.बाकी इतर वेळी तसे दुर्लक्षितचअसतात.रताळी –दाणे किस,रताळ्याची खीर झाली.आता दोन दिवसांनी लेकीसाठी तिखट पुऱ्या करायचं ठरवलं.गुळाच्या पाण्यात गोड पुऱ्याही होतात,पण तिला गोड जास्त आवडतं नाही.

त्या शेवटच्या प्रवासाच्या आठवणी (भाग-३)

पराग१२२६३'s picture
पराग१२२६३ in भटकंती
17 Jul 2022 - 11:28 am

सोलापुरात चालक आणि गार्ड बदलले गेले आणि सव्वानऊला शताब्दी पुढच्या प्रवासाला निघाली. कोरोना साथीच्या भितीमुळे सर्वांचाच प्रवास कमी झाला होता. त्यामुळे सोलापूरहून गुलबर्गा, हैदराबादला जाणारी गर्दी आज दिसत नव्हती. आमच्या डब्यात बऱ्यापैकी गर्दी होती म्हणायची, पण पुढचा डबा तर पूर्ण मोकळाच होता. नाश्त्यानंतर तर बऱ्याच जणांनी मास्क उतरवलेच होते. दरम्यान, सोलापुरातून सुटत असतानाच होटगीकडून आलेली BOXN वाघिण्यांची मालगाडी शेजारच्या मार्गावर येऊन उभी राहिली होती.