कान्हा
पैलतीरावर तुझी बासरी
घुमते ..कान्हा, वेड लावते
निळे मोरपीस ,श्यामल अंगी
खुलते आणिक हळू खुणवते
अस्तित्वाच्या हिंदोळ्यावर
मी ही होते राधा , मीरा
घनश्याम ,मनमोहन ओठी
निळाईत ही विरे दिठी.
निळा जलाशय निळ्या नभाशी
करीतो हितगुज हळवे,कोमल
सारे होई एकरूप अन्
व्यापून उरतो केवळ कृष्ण