श्रीगणेश लेखमाला २०२२

साहित्य संपादक's picture
साहित्य संपादक in काथ्याकूट
10 Jul 2022 - 4:25 pm

श्रीगणेश चतुर्थी हा आपल्या मिपाचा स्थापना दिन. त्या निमित्ताने दर वर्षी आपण गणेशोत्सवादरम्यान श्रीगणेश लेखमाला आयोजित करतो.
विषयाचे काहीही बंधन नाही. फक्त श्रीगणेश लेखमालेसाठी पाठवलेले लेखन इतर संकेतस्थळांवर वा सामाजिक माध्यमांवर पूर्वप्रकाशित नको. लेखमालेसाठी प्रवेशिका साहित्य संपादकांना व्यक्तिगत संदेश करून पाठवा. त्यासाठी येथे क्लिक करा.

मिपा साईट कंपनी नेटवर्क मध्ये चालत नाही

लई भारी's picture
लई भारी in तंत्रजगत
8 Jul 2022 - 1:00 pm

गेले काही दिवस misalpav.com आमच्या ऑफिस नेटवर्क मध्ये ब्लॉक केली जातेय. "या साईट/सर्व्हर वरून याआधी malicious software, viruses spread होतात असे निदर्शनास आले आहे", अशा स्वरूपाचा मेसेज येतोय.
याआधी कित्येक वर्षे चालत होती साइट नीट.
Mobile वर चालतेय पण connection secure नाही असा मेसेज येतोय.
असा अनुभव अजून कुणाला आहे का?

Block Reason : DNS RPZ

असे heading आहे block केल्या नंतर.

सुंदर ते ध्यान

Bhakti's picture
Bhakti in जनातलं, मनातलं
7 Jul 2022 - 11:06 pm

ध्यास सावळ्या विठूचा मनी
वाट पंढरीची चालावी चालावी...

समस्त संतांना ज्या रूपाने भक्तीची दीक्षा दिली,त्याच विठूच्या रूपाचा ध्यास घेत आजही भक्तीमय वारकरी पंढरीकडे मार्गस्थ करीत राहतो. विठूचे ते कमरेवारचे दोन हात अत्ठ्ठावीस युगांपासून ठेवलेले आहेत.पण आताच लेकराला आवडत्या कामाला लावून एखादी माउली दोन क्षण कमरेवर हात ठेऊन निश्चिंत उभी आहे असा भास होतो.सार्या जगाचा कारभार हाकणारे हात क्षणभर विठूने कमरेवर ठेवले आहेत.
त्या विटेची ती काय समाधी अवस्था घट्ट रोवलेल्या संकल्पांची ध्योताकच आहे.

मुक्तकप्रकटन

ऑफलाईन मराठी टायपिंग कसे करावे?

पाषाणभेद's picture
पाषाणभेद in तंत्रजगत
7 Jul 2022 - 4:21 pm

संदर्भ: उपाशी बोका यांचा धागा: http://misalpav.com/node/49825

ऑफलाईन मराठी टायपींगसाठी अनेक पद्धती आहेत. उपाशी बोकाने वर सांगितल्याप्रमाणे मिसळपावसारखी "गमभन"ची सवय असेल तर मराठी लिहिणे खूपच कठीण आहे आणि पटपट लिहिणे तर जवळपास अशक्य आहे. वरील धाग्यात बोकाने कळफलकचा कोड बदल केला असावा असे दिसते. मराठीबोला.कॉम च्या वेळी मराठी टायपींगसाठी मला असले अनेक प्रकार करावे लागले होते.

तर मंडळी, मी त्यातल्या त्यात ऑफलाईन टाईप करण्यासाठी दोन सोप्या पद्धती कोणत्या ते आपण पाहू.

हॅप्पी बर्थडे माही….

सुजित जाधव's picture
सुजित जाधव in जनातलं, मनातलं
7 Jul 2022 - 10:13 am

जुन्या हिंदी चित्रपटात एक सिन असायचा बघा..एक गुंडांची टोळी हिरॉईनच अपहरण करते.. एका सूनसान जागी तिला बांधून ठेवल जातं.. आणि तिचा छळ केला जायचा...तिच्या अंगाला त्या टोळीच्या म्होरक्याचा हात लागतो न लागतो तोच आपला हिरो अचानक एन्ट्री मारायचा...आधी तो थोडा मार खायचा पण मग पुढे त्याचा पवित्रा अचानक बदलायचा आणि तो गुंडांना बदडून काढायचा...क्रिकेटच्या मैदानावर पण असाच एक हिरो होता. जेव्हा जेव्हा भारतीय संघ अडचणीत सापडायचा तेव्हा तेव्हा तो अगदी शांतपणे मैदानात एन्ट्री करायचा आणि आपल्या स्टाईल मध्ये सामना जिंकवूनच परतायचा..

क्रीडाशुभेच्छा

(सन्तूर)

ज्ञानोबाचे पैजार's picture
ज्ञानोबाचे पैजार in जे न देखे रवी...
7 Jul 2022 - 9:46 am

पेरणा आमचे परम मित्र श्री श्री १०८ अनन्त्_यात्री यांची ही कविता http://misalpav.com/node/50404

(सन्तूर)

झटपट छनछन तुषार अगणित
भवतालाला व्यापत उडले

रोमरोम पुलकित करुनी त्यांनी
वरुणावरती गारूड केले

स्वरचित्रातील अवकाशात
अचूक तिचे आगमन झाले

सुंदरीचे त्या चिमुरडीशी
निगूढ नाते पुनश्च कळले

स्वप्नशिल्पातील कल्पनेचा
वर्तमानाशी घालूनी मेळ

नेहमी सारखा सहज रंगला
सुपरमॉमचा अद्भुत खेळ

पैजारबुवा,

कवितेतले गूढ उलगडण्यासाठी खालील व्हिडीओ जरूर पहावा

आरोग्यदायी पाककृतीकाणकोणकोडाईकनालगरम पाण्याचे कुंडइंदुरीकृष्णमुर्ती

सन्तूर

अनन्त्_यात्री's picture
अनन्त्_यात्री in जे न देखे रवी...
6 Jul 2022 - 10:30 pm

स्वरतत्वाचे तुषार अगणित
भवतालाला व्यापुनी उरले

रोमरोम पुलकित करणार्‍या
स्वरपुंजांनी गारूड केले

स्वरचित्रातील अवकाशाच्या
सुप्त मितीचे दर्शन झाले

स्वरलहरींचे जललहरींशी
निगूढ नाते पुनश्च कळले

स्वरशिल्पातील अमूर्ततेचा
चिरंतनाशी घालुनी मेळ
शब्दावाचून सहज रंगला
विलक्षणाचा अद्भुत खेळ

संगीतकविता

बहारो फूल बरसाओ - ३

विजुभाऊ's picture
विजुभाऊ in जनातलं, मनातलं
6 Jul 2022 - 9:28 am

माया माझ्याकडे पहाते. थोडी हसते. हसताना तीचे डोळे अधीकच पाणीदार दिसतात. ओठांना लावलेल्या ड्रीम रोझ लिप्स्टीक मुळे तीचे दात ही एकदम जहिरातीतल्या मुलीसारखे वाटताहेत.
"अगं चला , चला, तिकडे गुरुजी खोळंबलेत. नवरदेव येऊन उभा देखील राहिला. झालं ना सगळं. बघ गं मीरा, काही राहिलं नाही ना. मायाच्या आईची लगबग सुरू आहे.

मागील दुवा http://misalpav.com/node/50355

कथाविरंगुळा