रताळ्याच्या तिखट पुरी

Bhakti's picture
Bhakti in पाककृती
17 Jul 2022 - 4:40 pm

एकादशीला हक्काने घरात आलेले कार्बोहाड्रेट म्हणजे साबुदाणा ,बटाटा आणि रताळी !त्यात रताळीला एकादशीलाच जास्त आणंल जाते.बाकी इतर वेळी तसे दुर्लक्षितचअसतात.रताळी –दाणे किस,रताळ्याची खीर झाली.आता दोन दिवसांनी लेकीसाठी तिखट पुऱ्या करायचं ठरवलं.गुळाच्या पाण्यात गोड पुऱ्याही होतात,पण तिला गोड जास्त आवडतं नाही.

साहित्य-
४ उकडलेली रताळी
१ मोठी वाटी कणिक पीठ
१ छोटी वाटी रवा
आलं ,मिरची ,लसून,जिरे यांची एकत्रित पेस्ट
४ चमचे तीळ
१ चमचा तिखट
१ चमचा हळद
१ चमचा धणेपूड
चिरलेली कोथिंबीर
चवी पुरते मीठ
तळण्यासाठी ३ मोठी वाटी तेल

कृती:
तर मग कुकरमध्ये उकडलेल्या रताळ्याची साल काढून चांगली स्मश करायची.
गव्हाच्या पिठात तेल व हे कुस्करलेली रताळी टाकायची. यात रवा आणि वरील सर्व जिन्नस आल पेस्ट ,तिखट ,धणेपूड टाकायचे.
शेवटी कोथिंबीर आणि तीळ भुरभुरले की खूपच सुंदर मिश्रण दिसते.आणि हाच तो महत्वाचा क्षण 
a

हे मिश्रण एकजीव करून एक गोळा मळायचा.पाण्याची अजिबात गरज लागतं नाही.
एक मोठी जाडसर पोळी लाटून वाटीने गोल आकाराच्या पुऱ्या बनवायच्या.
गरम तेलात मंद आचेवर तळून घ्यायच्या. जरा ट्यूब पेटली शेप कटर नव्हता ,हातानेच स्टारचा आकार करून तळला.एक छोटासा ट्री शेप कटर होता.बिस्कीट सारखा तो तळला.
महत्वाची गोष्ट –ह्या पुऱ्या गरमा गरमच खायच्या कारण रताळीमुळे त्या लवकर मऊ होऊ शकतात.

१

-भक्ती

प्रतिक्रिया

कंजूस's picture

17 Jul 2022 - 6:32 pm | कंजूस

आकार आणि चव छान असली की मुलं खुश.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

17 Jul 2022 - 6:53 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आवडल्या पु-या.

-दिलीप बिरुटे

जेम्स वांड's picture

17 Jul 2022 - 7:01 pm | जेम्स वांड

उपवास स्टार रताळ्याचे हे बिन-उपवासी पदार्पण आवडले, ते स्टार अन ट्री शेप वगैरे तर फुल आऊट ऑफ ग्राउंड सिक्सर आहे.

सरिता बांदेकर's picture

17 Jul 2022 - 7:39 pm | सरिता बांदेकर

व्वा मस्त. परोठे करते,आलू पराठासारखे.कधीतरी पुऱया करून बघीन.

वामन देशमुख's picture

17 Jul 2022 - 7:57 pm | वामन देशमुख

रताळ्याच्या तिखट पुर्‍या आवडल्या. केलेले आकारही आवडले.

---

आम्ही बटाटाच्या तिखट पुर्‍या अश्या प्रकारे करतो.

जेम्स वांड's picture

17 Jul 2022 - 8:42 pm | जेम्स वांड

जर बटाट्याच्या पुरीत नीट तुपाचे मोहन घातले अन बटाट्याच्या मसाल्यात आमचूर, आले, जिरे, ओवा, काळीमिरी, बडीशेप इत्यादी घालून केलेला बटाट्याचा मसाला जर आपण त्या जाडसर पारीत भरून तळला तर राजस्थानी आलू कचौडी नामक फंडू प्रकरण पण साधून जाईल की !

होय कंकाका जरा लहान मुलांच्या आवडी जपल्या तर आनंदाने नवा पदार्थ खातात. आकार,रंग,सुवास हे आधी पाहतात ते.
बिरुटे सर, जेम्स दादा,सरिता ताई,वा दे नक्की करून पहा पदार्थ!

श्वेता व्यास's picture

18 Jul 2022 - 9:44 am | श्वेता व्यास

अरे वा! तोंपासु, नक्की करणार.

छान पाकृ. तोंपासु दिसतेय अगदी.

श्वेता , सस्नेह धन्यवाद :)

रताळ्यापासून तिखट पदार्थही बनवता येतो हे नवलंच!
आमच्या घरी आषाढी एकादशी, कार्तिकी एकादशी आणि महाशिवरात्र हे तीन उपास सगळ्यांचे असतात (कारण त्या तीन दिवशी उपवासाचे पदार्थ सोडून दुसरे काही बनतंच नाही घरी 😀) तेव्हा रात्री रताळ्याचा किस हमखास असतो आणि क्वचित प्रसंगी रताळ्याची खीर असते त्यामुळे रताळ्यापासून तिखट पदार्थही बनवता येतो हे माहित नव्हते. अर्थात उपवासासाठी बनवण्यात येणाऱ्या रताळ्याच्या किसात कितीही हिरव्या मीरच्या घातल्या तरी रताळ्याचा मूळचा गोडवा जाणवतोच, पण ह्या पुऱ्यांमध्ये रताळ्याच्या जोडीला अन्य पदार्थही असल्याने त्यांना तिखटपणा येत असावा असे वाटतंय.
अर्थात ट्राय केल्याशिवाय नक्की चव समजणार नाही तेव्हा करायला लावणे आलेच!
रेसिपी आणि फोटोज आवडले 👍

उपवासालाही बटाटे वापरुन ही रेसिपी होऊ शकते.नक्के करा.

मदनबाण's picture

22 Jul 2022 - 10:55 pm | मदनबाण

वाह्ह... हटके पाकृ ! ही वाचुन झाल्यावर कधी तरी मी क्वचीत रताळी गॅसवर भाजुन, मग सोलुन खातो ते उगाच आठवले ! नंतर युट्यूबवर मायक्रोवेव मध्ये असेच करता येते का ? त्यावर व्हिडियो शोधला... तर असे करता येते हे समजले. फक्त रताळी फोर्क किंवा चाकुने टोचुन घेऊन मग ती मायक्रोवेव्ह मध्ये ठेवावीत हे देखील कळले.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Full Song (Video) Shyama Aan Baso X Arre Dwaarpalon Kanhaiya Se Kehdo♥️ | Sachet♥️Parampara

यश राज's picture

23 Jul 2022 - 12:34 pm | यश राज

पुढच्या उपवासाला नक्की करणार

मदनबाण,यश राज धन्यवाद :)

पर्णिका's picture

25 Jul 2022 - 7:15 am | पर्णिका

छान आहे पाककृती! ती स्टार पुरी फार आवडली.

गोरगावलेकर's picture

28 Jul 2022 - 11:29 am | गोरगावलेकर

छान झाल्या आहेत पुऱ्या.