अनन्त्_यात्री in जे न देखे रवी... 19 Jul 2022 - 9:33 am अक्षयाचा डोह भरुनी वाहतो जेथे सदा सांडवा तिथला कुठे ते सांगशिल का एकदा? अद्भुताचा ढग निळा ओथंबतो जेथे सदा बरसतो केव्हा, कुठे ते सांगशिल का एकदा? नीरवाचा घुंगरू बघ रुणझुणे येथे सदा सातही स्वर वर्ज्य तरिही ऐकशिल ना एकदा! कवितामुक्तक प्रतिक्रिया आवडली 23 Jul 2022 - 5:10 pm | ज्ञानोबाचे पैजार छान शब्दबद्ध झाली आहे भावना पैजारबुवा, असं कोणतं ठिकाण ते, 24 Jul 2022 - 1:24 am | श्रीगणेशा असं कोणतं ठिकाण ते, कोणी सांगेल का एकदा :-) ---- पूर्ण समजली नाही पण छान वाटली कविता! आवडली 24 Jul 2022 - 6:36 pm | कर्नलतपस्वी +१ आवडली 24 Jul 2022 - 11:20 am | धर्मराजमुटके सांडवा तिथला कुठे ते ? यातील सांडवा चा अर्थ काय ? अवांतर : शुद्धलेखनाच्या चुका टाळणे श्रेयस्कर. एक कवी म्हणून व्याकरणावर / शुद्धलेखनावर जास्त लक्ष द्या असे सुचवेन. सुचवणी बद्दल आभार पण 24 Jul 2022 - 12:11 pm | अनन्त्_यात्री शुद्धलेखनातील नेमक्या चुका दाखविल्यास अधिक आवडेल. सांडवा सांडवा sāṇḍavā m (सांडणें) A sluice, watergate, floodgate; a vent (as through a dam or mound): also a built-up channel or passage of masonry for flowing water generally. मोल्सवर्थ शब्दकोश मस्त! 25 Jul 2022 - 10:34 am | चांदणे संदीप कविता आवडली. सं - दी - प
प्रतिक्रिया
23 Jul 2022 - 5:10 pm | ज्ञानोबाचे पैजार
छान शब्दबद्ध झाली आहे भावना
पैजारबुवा,
24 Jul 2022 - 1:24 am | श्रीगणेशा
असं कोणतं ठिकाण ते,
कोणी सांगेल का एकदा
:-)
----
पूर्ण समजली नाही पण छान वाटली कविता!
24 Jul 2022 - 6:36 pm | कर्नलतपस्वी
+१
24 Jul 2022 - 11:20 am | धर्मराजमुटके
यातील सांडवा चा अर्थ काय ?
अवांतर :
शुद्धलेखनाच्या चुका टाळणे श्रेयस्कर. एक कवी म्हणून व्याकरणावर / शुद्धलेखनावर जास्त लक्ष द्या असे सुचवेन.
24 Jul 2022 - 12:11 pm | अनन्त्_यात्री
शुद्धलेखनातील नेमक्या चुका दाखविल्यास अधिक आवडेल.
सांडवा
सांडवा sāṇḍavā m (सांडणें) A sluice, watergate, floodgate; a vent (as through a dam or mound): also a built-up channel or passage of masonry for flowing water generally.
मोल्सवर्थ शब्दकोश
25 Jul 2022 - 10:34 am | चांदणे संदीप
कविता आवडली.
सं - दी - प