अलक

मालविका's picture
मालविका in जनातलं, मनातलं
18 Jul 2022 - 9:35 pm

अलक 1
"करावं तसं भरावं", या कानाने ऐकून त्या कानाने सोडून दिलेलं वाक्य. सहजच बसस्टॉपवर पुस्तकं विकणार्या मुलाकडून चार पुस्तकं घेतली. माझ्या घरी मी एकटाच. कामवाल्या मावशीच्या मुलांना देऊन टाकली. दोन दिवसांनी त्याच्याकडून फुगे घेतले,ऑफिसमधल्या मैत्रिणीला दिले. अशीच ओळख वाढत राहिली. काही विशेष करत नव्हतो मी. दोन दिवस ताप आला. कामवाल्या मावशी कपडे भांडीच काय दोन वेळचं जेवण पण करून गेल्या. ऑफिसलातली मैत्रिण येऊन डाॅक्टरकडे घेऊन गेली. आणि तोच बसस्टॉपवरचा मुलगा, घर शोधत आला. आज तो फुलं विकत होता. चौकशी करून जाताना चार फुलं टेबलावर ठेऊन गेला. मी करत गेलो, ते माझी ओंजळ भरत गेले.

अलक 2

"नेहमी शुभ बोलावं रे, वास्तू तथास्तु म्हणत असते", आई कळवळून सांगायची.
पण कधी कोणी ऐकलं नाही. इस्टेटीवरून दोन भावांत झालेली भांडणं विकोपाला गेली. "मी मेलो तरी मला बघायला येऊ नको", दोघांपैकी एकाच्या तोंडून निघून गेलं. लाॅकडाऊनमुळे धाकटा भाऊ शहरात अडकला आणि दुर्दैवाने मोठा भाऊ गावी कोरोनाने मरण पावला. धाकट्याला राहून राहून आईचे शब्द आठवत होते. पण वास्तू आधीच 'तथास्तु' म्हणाली होती.

- धनश्रीनिवास

कथाप्रकटन

प्रतिक्रिया

सुखी's picture

18 Jul 2022 - 10:26 pm | सुखी

दोन्ही आवडल्या

श्वेता व्यास's picture

19 Jul 2022 - 7:49 am | श्वेता व्यास

दोन्ही अलक आवडल्या. दुसरीचा अनुभव खूपदा घेतला आहे. सहज बोलून गेलेलं खरं होऊन जातं.

कुमार१'s picture

19 Jul 2022 - 8:09 am | कुमार१

दोन्ही आवडल्या

ज्ञानोबाचे पैजार's picture

19 Jul 2022 - 8:23 am | ज्ञानोबाचे पैजार

आवडल्या

पैजारबुवा,

दोन्ही छान साध्यासरळ गोष्टी!
..पहिली जास्त आवडली.

मुक्त विहारि's picture

19 Jul 2022 - 9:46 am | मुक्त विहारि

छान आहेत

सौंदाळा's picture

19 Jul 2022 - 10:17 am | सौंदाळा

दोन्ही आवडल्या

नगरी's picture

20 Jul 2022 - 6:01 pm | नगरी

दोन्ही आवडल्या आणि त्या निमित्ताने अलक म्हणजे काय हे पण कळले

यश राज's picture

20 Jul 2022 - 6:45 pm | यश राज

आवडल्या दोनही

Nitin Palkar's picture

20 Jul 2022 - 8:15 pm | Nitin Palkar

दोन्ही कथा आवडल्या.