संध्याकाळी ५ ची वेळ ...
अविरत वाहणारा तो सागर, दगडांवर आपटून फुटणार्या लाटा, सूर्यप्रकाशाने चमचमणार पाणी जणू समुद्रभर पसरलेली चांदीच!! आणि तो सुर्यगोल दाह न देणारा पण तेज:पुंज्य!! हळू हळू प्रखर प्रकाश मंद मंद करत, स्वत:बरोबर आकाशभर लाली पसरवणार ते "सूर्यबिंब" मावळतीकडे झुकलेलं!! संध्येच्या सुखद मिठीत शिरणारा तो निसर्ग आणि पश्चिमेच्या क्षितिजावर विसावताना प्रकाशाचा स्त्रोत हलक्या हाताने झाकणारी ती सुंदर संध्या :) अहाहा ... लालसर, केशरी, पिवळे रंग कोण्या चित्रकाराने कॅव्हासवर पसरावे असे सुंदर सजलेले आकाश ,, आणि ,, आणि अवकाशातील त्या रंगात रंगलेला तो जलाशय जणू ती अद्भुत रंगांची डबी हिंदकळून रंग सांडावेत आणि पाण्यावर ते सारे पसरावेत असा नजारा !!.. आणि समुद्रात उठणार्या लाटांवर हेलकावणारे ते केशरी-लाल सूर्यबिंब !!! मंद मंद थंड हावा आणि कृत्रिम दिव्यांनी झगमगणारा तो किनारा!! हे वर्णन ऐकून कोण्या शांत सुंदर ठिकाणचा सूर्यास्त वाटावा पण .., पण हे वर्णन आहे मुंबईच्या सूर्यास्ताचं आणि जागा ,,, marine drives ...
गजबजलेली मुंबई.. चाकरमान्यांनची घराकडे पळण्याची तयारी. taxi पासून ते फोर्ड, Mercedes एक ना अनेक महागड्या गाड्यांचा मुंबईच्या रस्त्यांवरचा "स्पीड" !! घाई, गर्दी आणि स्पीड मुंबईची ओळख. marine drives चे ते कट्टे... त्यांच्या एका बाजूला तुफान वेगात धावणारी आयुष्ये सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंत कामांना जुंपलेले मुंबईकर आणि दुसरीकडे अथांग समुद्र .. दोन्ही कडे गती.. किनर्या लगतच्या मोठमोठाल्या इमारती, हॉटेल्स त्याचे डोळे दिपवणारे झगमगाट आणि दुसरीकडे मास्तीत गरजणारा समुद्र!!
marine drives चा हा किनारा, न जाणे किती वर्षे हे अनुभवतोय??? आकाशातले सूर्याचे खेळ, लाटांचे आवाज, पाणी, चंद्राच्या कला, रात्रीचे टिपूर चांदणे आणि दुसरीकडे "उन्मत्त वेग" !! एकीकडे शांत आणि सुरेख निसर्ग सूर्यास्ताच्या देखाव्याने आणि रंगानी न्हालेला समुद्र, थंड मोकळा वारा आणि दुसरीकडे तुफान वेगात धावणाऱ्या गाड्या, नुकत नुकत सुरु होणारं मुंबईचं night life आणि मायानगरीतल एक सत्य "पैसा बोलता है| "... पण .. किती करंटे आपण?? हे आयुष्य जगणारे, त्या कट्ट्याना रोज पहाणारे मुंबईकर!! ते मात्र त्या कट्ट्याच्या अल्याडचे आणि पल्याडचे अशी दोन्ही दृश्ये एकत्र पाहू आणि अनुभवू शकत नाहीत कारण एकाकडे पाठ फिरवल्याशिवाय दुरसे मुळात दिसतच नाही!! आणि marine drives चा कट्टा तो... संपूर्ण गजबजाटात राहून "स्थितप्रज्ञ " !!!
अरबी समुद्र!! शाळेत पाठ केलेला, न्यूज पेपर्स मध्ये वाचलेला, TV वर पाहिलेला आणि प्रत्यक्षात रोजच दिसणारा..तो समुद्र !! असंख्य सूर्योदय आणि सूर्यास्त बघितलेला, पावसाळ्यात उसळणारा आणि ओहोटीला शांतपणे मागे मागे सरणारा तो मुंबईचा समुद्र... असंख्य माणसे,गजबजाट, भांडण, प्रेम, हासू तर कधी आसू पाहणारा आणि किनर्यावर मायानगरीचा झगमगाट वागवणारा आणि तरीही मस्तीत गरजणारा तो अरबी समुद्र !! तिन्ही त्रिकाळ बारा महिने मुंबापुरीला सोबत करणारा.. सकाळच्या सूर्याबरोबर खुलणारा, माध्यान्हीला तापणारा, संध्याकाळी मुंबापुरीचे चे रुपडे खुलवणारा, वातावरण फुलकीत करणारा हा समुद्र!! मन शांत करणारा, जगण्याची उर्मी, उत्साह देणारा, प्रेमी युगुलांना खुणावणारा, मुंबईबाहेरच्या प्रत्येकाला भुलवणारा, मुंबईकरांना अक्षरश: रोज भेटणारा तो समुद्र... पण किती वेळा हे सौंदर्य अनुभवतो आपण??? धावून धावून दमून नेमक्या वेळेस कितीवेळा तो समुद्र आणि ते निरागस आकाश पाहतो आपण?? खरच शेजारच सौदर्य, शांतता रोजमर्राच्या आयुष्यात हारवून बसतो आणि मग शोधात फिरतो शांतता आणि समाधान - मुंबई पासून लांबच्या गाव-खेड्यात !!!
जवळ जवळ रोज marine drives च्या आस पास फिरत असतो मुंबईकर... पण.. धकाधकीच्या आणि स्पीड च्या मागे पळणारा मुंबईकर किती वेळा marine drives च्या त्या कट्यांवर शांतपणे विसावतो आणि अनुभवतो ते सृष्टीतील बदल??? मायानगरीच्या मायेला झगमगाटाला भूललेले सारेच मुंबईत येतात आणि जुंपून घेतात स्वत:ला कामामध्ये, त्या स्पीड शी cope -up करायच्या नादात आणि छन छन करणार्या नाण्यात सुख शोधत फिंरतात. शांती, निरागस सौंदर्य आणि समाधान मुंबईत नाहीच असे बिनधास्त म्हणतात. पण मुंबईचा साधा सूर्यास्त .. इतका सुंदर निरागस नजारा मात्र अनुभवायचा विसरूनच जातात :( :( .. समुद्र पाहतो पण त्याच सौदर्य आणि असा निर्मळ, निखळ सुंदर देखावा तो पहायचाच विसरतो खरच फार क्वचित अनुभवलेला असेल आपण हा नजारा!!.. हे सौंदर्य मायानगरीची ही पण एक मायाच म्हणावी लागेल का???
जिथे सुर्यास्ताचा देखावा मन भुलवून टाकणारा असा दिसतो, अश्या जगातल्या कोणत्याही जागेवर सुर्यास्ता च्या नंतर एक अनामिक हुरहूर, असह्य शांतता आणि रुख-रुख पसरते पण मुंबई?? इथला सूर्यास्त तितकाच सुंदर असतो, भुरळ घालतो, पण सूर्यास्तानंतर समुद्राकडे पाठ केली की एक वेगळंच जग समोर येत ,, किनारा अजूनही प्रकाशित असतो कृत्रिम उजेडात झगमगत असतो आणि "स्पीड" वेडा मुंबईकर त्याच वेगात कोणत्याही टोचणी शिवाय धावत असतो... हे भावना शून्य असल्याच प्रतिक म्हणायचं?? की एक मस्तवाल attitude ?? की गरज?? उत्तर कठीण आहे. SO, तूर्तास आपण फक्त marine drives च्या कट्ट्याच हे नशीब म्हणू किंवा त्या कट्ट्याच वेगळेपण !!!!
काळोखाच्या गर्तेत समुद्र पूर्णपणे दिसेनासा होतो पण किनारा मात्र झगमगत असतो कृत्रिम lights च्या उजेडात,,, सूर्यबिंब संपूर्ण मावळलेलं असतं. पण,.. किनारा.. तो लख्ख असतो झगमगाटात हरवलेला!!!
मुंबई धावतच असते ... समुद्र वाहतच असतो ,,, फक्त किनार्याची , marine drives ची एक बाजू अंधारात अदृश्य झालेली असते... मुंबई आणि बेफिकीर मुंबईकरासाठी फक्त एक working day संपलेला असतो.
... रेश्मा आपटे
प्रतिक्रिया
28 Feb 2012 - 12:38 am | पैसा
मुंबईला इतका छान समुद्र आहे हेच बहुतेकाना धावताना विसरायला होत असेल!
समुद्राचं आणि किनार्याचं शब्दचित्र छान जमलंय!
28 Feb 2012 - 12:58 am | गणेशा
छान लिहिले आहे.
अवांतर :
नरिमन पॉईंटला जॉब ला असताना, रोज रुम वर लोअर परेल ला बाईक ने जाताना, कट्ट्यावर शांतपणे घालवलेले क्षण आठवले. आणि आठवद्यात एकदातरी रात्री १२ नंतर मित्राबरोबर कट्ट्यावर येत असलेलो आठवले.
मस्त.
मुंबईकर होऊनही शांतपणात अनुभवलेले ते क्षण मस्तच होते.
धन्यवाद ..
हा पण तो समुद्रच कदाचीत सांगत असेन.. थांबु नका.. सुर्यास्तीचा सुर्य पुन्हा भेटीला येइइन .. चालत रहा.. अविरत
28 Feb 2012 - 8:08 am | अन्या दातार
लेख चांगलाच जमलाय. वादच नाही.
काही लेखनप्रकारांची निवड कळली नाही.
शुभेच्छा: कुणाला आहेत यात शुभेच्छा?
सद्भावना: कुणासाठी सद्भावना?
अभिनंदन: कुणाचे?
चौकशी: कशाबद्दल?
बातमी: कुठे आहे बातमी?
शिफारस: काय शिफारस करत आहात लेखातून??
माध्यमवेध: सदर लेखातून कोणत्या माध्यमाचा वेध घेतला आहे?
सल्ला: काय सल्ला आहे तुमचा? (लेखनप्रकार निवडीबाबत आम्ही नक्कीच सल्ला देऊ शकतो ;) )
प्रश्नोत्तरे: कौबक आहे का??
मदत: काय मदत पाहिजे? लेखातून तरी काही मदत हवीये असं दिसत तरी नाही.
समीक्षा: कशाची समीक्षा आहे या लेखात?
भाषांतर: अच्छा, मूळ लेख कोणत्या भाषेत आहे म्हणे?
28 Feb 2012 - 8:34 am | प्रचेतस
नवलेखकांना नाऊमेद करणार्या प्रवृत्तींचा जाहीर निषेध.
28 Feb 2012 - 10:10 pm | प्राजु
छान लिहिले आहे.
29 Feb 2012 - 10:19 pm | रेशा
खरचं खुप सुंदर असतो सुर्यास्त .. खुप सुंदर क्षण .. :)
प्रोत्साहनासाठी मनापासुन धन्यवाद :)
लेखन प्रकारांची निवड हे येथे नविन असल्यामुळे उडालेला गोंधळ आहे... ती सुधारणा करेन नक्कीच