अद्भुतरस

वृक्षारव

अज्ञातकुल's picture
अज्ञातकुल in जे न देखे रवी...
12 Apr 2013 - 9:34 am

पाचोळा माझाच पेटला
झळा लागुनी दग्ध विशाखा
अंगावर जळली पाने पण
आत अबाधित बहर अनोखा

ना सूडाचा लेश तसूही
ना रिपुकांचा जंगम विळखा
डाव मांडला ऋतुचक्राचा
ना कोणी मज आपला परका

कुणी न माझा असो तरीही
"मी" माझ्यातिल उत्कट झोका
पवनाचे हुंकार झेलतो
जरी कधी असतो तो धोका

.........................अज्ञात

अद्भुतरसकविता

संमोहरमल

अज्ञातकुल's picture
अज्ञातकुल in जे न देखे रवी...
7 Apr 2013 - 10:50 am

भोर प्रभाती चंद्रकोर कोकीळ शीळ अन मनकवडी
हळुवार स्पर्श झुळुकेचा लाघव पक्षांची लाडी गोडी
गूढ साद अवती भवताली क्षितिजावर लाली थोडी
पर्णफुलांवर वसंत सण अंगणभर जगणारी कोडी

नील सरोवर प्रतिबिंबाविण थांग न त्या खोली वेडी
मेघ ढाळतो ऋतू तयातुन जीवन हसण्याची नाडी
मन हृदयी स्वप्ने जरतारी कुणी तरी नकळत धाडी
व्योम प्राणमय लयलाटेवर सुख दु:खे कडवी जोडी

काठ किनारे शब्दांचे रसरंग क्षणांच्या कावेडी
पाऊलठसे संमोहरमल मृगजळी तरंगे तन होडी

.....................अज्ञात

अद्भुतरसकविता

नायक क्रमांक एक

ज्ञानोबाचे पैजार's picture
ज्ञानोबाचे पैजार in जे न देखे रवी...
2 Apr 2013 - 4:17 pm

आमच्या आगामी " नायक क्रमांक एक" या चित्रपटातले शिर्षक गीत खास आमच्या चाहत्यांसाठी.

या चित्रपटाची पटकथा, संवाद आणि गीते आम्ही स्वतः लिहिली आहेत याची वाचकांनी कॄपया नोंद घ्यावी.

(कंसातल्या सुचना दिग्दर्शकासाठी असुन, नायक नायिकेने कंसाबाहेरच्या शब्दांचे गायन करत नॄत्य करायचे आहे. चित्रीकरण सुरु करण्या आधी कॅमेरामॅनच्या कॅमेर्‍याची बॅटरी चार्ज आहे कि नाही ते तपासावे)

(ज्याच्या कडे बर्‍यापैकी कपडे असतील त्यालाच नायक म्हणुन घेण्यात यावे. नायिका आम्ही आधिच निवडली आहे. तिच्या आईने तीला बर्‍यापैकी कपडे घालुन चित्रीकरणाला पाठवायचे आश्वासन दिले आहे)

कॉकटेल रेसिपीकोडाईकनालभूछत्रीमराठीचे श्लोकशृंगारभयानकहास्यकरुणवीररसअद्भुतरसरौद्ररसशांतरसमांडणीवावरसंस्कृतीकलानृत्यनाट्यसंगीतपाकक्रियाइतिहासवाङ्मयकथाबालकथाकविताचारोळ्याप्रेमकाव्यबालगीतमुक्तकविडंबनगझलभाषाउखाणेप्रतिशब्दम्हणीवाक्प्रचारव्याकरणव्युत्पत्तीशब्दक्रीडाशब्दार्थशुद्धलेखनसुभाषितेविनोदसाहित्यिकसमाजजीवनमानतंत्रराहणीऔषधोपचारप्रवासभूगोलदेशांतरराहती जागानोकरीविज्ञानक्रीडाअर्थकारणअर्थव्यवहारगुंतवणूकज्योतिषफलज्योतिषसामुद्रिककृष्णमुर्तीराशीराजकारणशिक्षणमौजमजाचित्रपटछायाचित्रणरेखाटनस्थिरचित्र

त्रेधा

अज्ञातकुल's picture
अज्ञातकुल in जे न देखे रवी...
2 Apr 2013 - 10:26 am

एक एक श्वासात ध्यास
मज बिलगुन आहे राधा
नसून भासे सोबतीस
ठायी ठायी ही बाधा
.............. स्वरे कोकिळा गाई वसंत
................अनाम सार्‍या विविधा
................मदन गंध पवनासंगे
................एकांती कुंठित मेधा

खोल निळाई अथांगासवे
क्षितिज बांधते वाडा
जन्म सांडतो संमोहातच
धाव धावतो वेडा
.................वलये वलये लाटा लटा
.................मनभर तिरपिट त्रेधा
.................काय कशास्तव हे भिजलेपण
.................सय-श्रावण सण साधा

......................अज्ञात

अद्भुतरसकविता

तुझ्यासह.. तुझ्याविना ...

विदेश's picture
विदेश in जे न देखे रवी...
29 Mar 2013 - 6:59 pm

तू असताना चंद्रचांदणे
तू नसताना खिन्न स्फुंदणे

तू असताना श्वास हवेसे
तू नसताना फक्त उसासे

तू असताना मधुर कहाणी
तू नसताना फक्त विराणी

तू असताना मंगल प्रभात
तू नसताना काजळ रात

तू असताना सुरेल सनई
तू नसताना फक्त जांभई

तू असताना जग हे हसते
तू नसताना सगळे फसते !
.

अद्भुतरसकविता

" यु आर लेट .. यु फुल !

जेनी...'s picture
जेनी... in जे न देखे रवी...
6 Mar 2013 - 9:49 pm

आज भेटायचे ठरले होतेना आपले किनार्‍यावर ? :(
कितीतरीच उशिर केलास :-/
कितीवेळ एकटीच उभी होते
.
तुझी वाट बघता बघता वरच्या आळीतला नाम्याच आला :(
एकटीला बघुन चल थोडं ओल्यागार रेतीत चालु म्हणाला :P
इतक्यात तुला... दुरुन येताना बघितलं
.
मनाशिच म्हटलं
यु आर लेट.. यु फुल ! :-/
.

भूछत्रीबिभत्सअद्भुतरसबालगीतविडंबन

संवाद

अज्ञातकुल's picture
अज्ञातकुल in जे न देखे रवी...
4 Mar 2013 - 8:18 pm

संवाद स्वरांशी माझा
स्पंदन अविरत रागांचे
हृदयी माया कंठी मार्दव
ओठात जलद शब्दांचे
.........सावल्या किती विझलेल्या
.........झिजलेले कोळ कळांचे
..........नाळेत ओवलेली गांवे
..........अवशेष अमिट नात्यांचे

वाहते प्रवाही गाथा
पेरीत स्मरण मिथकांचे
वादळे पूररेषांची
अंतहीन क्षेत्र नभाचे
...........शत जन्म अधूरे नाथा
...........तोकडे वेध वेदांचे
...........स्तंभीत मती नत माथा
...........रण ओघळते ऋणकांचे

.......................अज्ञात

अद्भुतरसकविता

अंकुर

अज्ञातकुल's picture
अज्ञातकुल in जे न देखे रवी...
4 Mar 2013 - 10:22 am

शुष्क दिसे, पोटी पण पाणी,
हृदयी एक कहाणी,
बीजे अगणित दडलेली,..
पाहिली कधी का कोणी ?

श्वासात उसासे जडलेले
आतूर सदा आणीबाणी
छाया मेघांची कुंद जशी
ओठी थिजलेली वाणी ?

सर सर सर शिरवा शिडकावा
काहुरते एक विरह राणी
हुरहुरते सुप्त, डंवरते मन
अंकुरते व्याकुळ धरणी

....................अज्ञात

अद्भुतरसकविता

माणूस

अज्ञातकुल's picture
अज्ञातकुल in जे न देखे रवी...
22 Feb 2013 - 10:04 am

खगांचे थवे, पाखरे ही निरागस
काय कसे रज, कण संचिताचे
थकेनात पंख, खळे ना भरारी
रिते मोकळे सोस, निळ्या अंबराचे

न हेवे न दावे, न साठे कशाचे
हवेसे नितळ, पारदर्शी उसासे
ढळे दिवस कोरा, रात्र आणि काळी
जगाची तमा ना, असे खेळ सारे

माणूस मी, भूक, व्याधी उपाधी
मुळी मूढ ईर्षा, अंध, अंग जाळी
परा, बुद्धी-प्रज्ञा, असूनी उपाशी
अवकाळ मोठा, सदा मोह पाशी

.........................अज्ञात

अद्भुतरसकविता

जालावर खेळ चाले, हा गूढ.....

अधिराज's picture
अधिराज in जे न देखे रवी...
21 Feb 2013 - 12:54 pm

डिसक्लेमर: हि एक विडंबित कविता आहे. ह्या द्वारे कोणाच्याही (डूआयडी धारक,डूआयडी समर्थक आणि डूआयडी विरोधक) भावना दुखविण्याचा अथवा खतपाणी घालण्याचा हेतू नाही. तथापि कोणत्याही व्यक्तीशी अथवा प्रसंगांशी साधर्म्य आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजाव, अशी नम्र विनंती.
=================================================================================
चाल : रात्रीस खेळ चाले, या गूढ चांदण्यांचा
-------------------------------------------------

जालावर खेळ चाले, हा गूढ आयडींचा
संपेल ना कधीही, घोळ डू आयडींचा ||ध्रु||

अद्भुतरसविडंबनजीवनमान