घोटाळा
सालस थंडी लालस डोळा गंध मदनमय घोटाळा
समिर नव्हाळा करतो चाळा झुळझुळतो मद लडिवाळा
एकल बेटावरती फिरतो खग पक्षांचा नभ मेळा
पाउल पाउल नटल्या वाटांवर झुलवी मन हिंदोळा
वेस क्षितीजाची असीमच माणुस ऐसा भव भोळा
कसा पुरावा पुरवावा हा नाही ठावे वानोळा
कुणा पुसावे काय करावे भरे न ओंजळ जीव खुळा
कल्लोळांचे लोळ अचानक राशीवर झाले गोळा
.......................अज्ञात