अद्भुतरस

लाटणे सोबती सोडीना ती पाठ -

विदेश's picture
विदेश in जे न देखे रवी...
10 May 2014 - 9:19 pm

.
( चाल: पाऊले चालती पंढरीची वाट -)

लाटणे सोबती सोडीना ती पाठ
मनी संसाराची सोडावी का वाट ... | धृ |

भांडूनिया सारी चाळ ओरड्याने
जमता रिकाम्या घरी शुकशुकाट ... लाटणे

खाष्ट दुष्ट सारे नातेवाईक ते
साधुनिया संधी, न बसती मुकाट ... लाटणे

चुकविता प्रहार मी लाटण्याचा
कसा त्या बयेचा वाढे थयथयाट ... लाटणे

मनी खंत धरता नसे तडजोड
झेला भांडीफेक एका पाठोपाठ ... लाटणे
.

अद्भुतरसकविताविडंबनजीवनमानमौजमजा

<पहिली धार>

प्यारे१'s picture
प्यारे१ in जे न देखे रवी...
3 Apr 2014 - 2:11 pm

सोडा नसला तरी चालेल ,
पण संध्याकाळी एक चपटी असावी !

एकही चुनाडबी नसली तर चालेल ,
पण खिशात एक तंबाखूची पुडी असावी !

लॉलीपॉप- तंदूरीची सर कोणालाच नाही ,
पण चखण्यात एक चकली तरी असावी !

हलकट मित्रांनी बिअर मारायला शिकवली ,
पण वाईन प्यायला सोबत एक तरुणी असावी !

क्रेट संपवायला गँग आहेच ,
पण शेवटी मारायला एक चिल्ड असावीच !

पाण्याशिवाय सर्वच अपुर्ण ,
पण किक बसायला एक ऑन द रॉक असावी'च्च' !!!

-पिणार
____________________________________________

काहीच्या काही कविताकॉकटेल रेसिपीकोडाईकनालगरम पाण्याचे कुंडभूछत्रीबिभत्सअद्भुतरसविडंबन

श्वास लय

अज्ञातकुल's picture
अज्ञातकुल in जे न देखे रवी...
26 Feb 2014 - 6:40 pm

स्फटिक निर्मळ स्वर अभंग रोम रोमी चाळ ते
दूर कोठे गाव माझे अंतरीचे चाळते
श्वास लय; अदृष्य सारे लुप्त शब्दी वेधते
चांदण्या गर्दीत कांही हरवलेले शोधते

त्या आभा भासात अजुनी संभ्रमी मन धावते
गोडशी हुरहूर अंगी; स्वप्न नादी लावते
पाश मय रागा-स्वरांचे सोसलेले घाव ते
चंदनी आनंद त्यांचे बाळकोषी दावते

…………… अज्ञात

अद्भुतरसकविता

चिमुटभर

अज्ञातकुल's picture
अज्ञातकुल in जे न देखे रवी...
6 Feb 2014 - 8:35 pm

हूल हीच चाहूल आजवर तीच ओळखीची
आळवावरचा थेंब जसा अस्पर्श उजागर त्याची
एकेक शहारा आस तयाला ह्या हृदयीची त्या हृदयी
झुरे सावली वाटेवरती खंत तिला रात्रीची

रोमांकित अनुबंध पोरका धग अशीच जराशी
फुंकर हळवी भेट चेतवे निखाराच वैशाखी
संधीवरची दूर क्षितीजे स्मरणे आभासाची
सुंभ जळाले पीळ खळे ना राख चिमुटभर बाकी

………………अज्ञात

अद्भुतरसकविता

रसिका

अज्ञातकुल's picture
अज्ञातकुल in जे न देखे रवी...
28 Jan 2014 - 10:59 am

गुंतती खुणा गाठती रेशमी धागे
हृदयात रुधिर रसिकाचे जेंव्हा जागे
चांदणे टिपुर आवसेचे निर्मळ अवघे
चंद्रास न माहित पण; ते पडद्यामागे

श्वासांचे प्राक्तन; सुखवी प्रेम नि माया
चिरतरुण ठेवते अभिलाषा; मन-काया
जन्मास सोबती गोत; खेळ खेळाया
शोधण्या किनारा लाट हवी उसवाया

प्रेरणा कामना उचंबळाचे कारण
ऋतु गंध रंग रस चैतन्याचे सारण
अभिसरण नसे ते; रुक्ष पोरके अंगण
दशदिशा चराचर अस्वादास्तव आंदण

………………… अज्ञात

अद्भुतरसकविता

बंधने

अज्ञातकुल's picture
अज्ञातकुल in जे न देखे रवी...
23 Jan 2014 - 11:52 am

ओठांस बंधने हृदयाची
हृदयास प्रेरणा प्राणाची
प्राणास गती मन-शरिराची
शरिरास कुंपणे काळाची

काळास न आहे गोत कुणी
वय चिर ओघळणारे पाणी
अंतास अथांग जलाशय पण
त्यासही किनार्‍याची करणी

गुदमरे प्रयोजन जन्माचे
ईप्सीत न कळते जगण्याचे
प्रणयात म्हणे क्षणशांती परि
सागरास अथक अशांती

………………. अज्ञात

अद्भुतरसकविता

निरलस

अज्ञातकुल's picture
अज्ञातकुल in जे न देखे रवी...
20 Jan 2014 - 5:22 pm

सुकते झडते पुन्हा उगवते भावुक ओले नाते
अवनीलाही कळते ना कोशात कसे तण अंकुरते

स्पर्श खुणेचा थेंब एक , गंधाळ : कुपीतुन उलगडते
रोम रोम रंध्रातुन अलगद अंतरातले दरवळते

कुठेच ना शब्दांचे जोखड मुक्यानेच सारे घडते
झुळुक वाहते अशीच निरलस अंग अंगणी शहारते

………………. अज्ञात

अद्भुतरसकविता

मन अंतर्मन

अज्ञातकुल's picture
अज्ञातकुल in जे न देखे रवी...
17 Jan 2014 - 9:56 am

उगवतीस क्षितिजावर हसते दिसते लोभस मोठे
मावळतीला पुन्हाहि हसते पण ते खोटे खोटे
दोन ध्रुवांची विलग अंतरे सलग न वाटे कोठे
दिशा चुम्बकांच्या ऐशा अंतरात साटे लोटे

कुणास ना ठाऊक कसे हे काळिज धडधडते
क्षण एका भेटीस्तव मन अंतर्मन धडपडते

……………………… अज्ञात

अद्भुतरसकविता

प्रीत खुळी

अज्ञातकुल's picture
अज्ञातकुल in जे न देखे रवी...
12 Jan 2014 - 1:06 pm

एक हुंदका कुशीतला निश्वास सांडला आकाशी
वादळ विरले उरले लाघव हिरवळले चंद्रापाशी
उलगडल्या सावल्या नाचल्या रास जणू हृदयी कोषी
अवसेकाठी पुनव रंगली ना कळले अवचीत कशी

कळा मिळाल्या ऋतुपर्णांना गंध कळ्यांना ह्या वेळी
मेघ दाटल्या नभओळी अंगणी सणाची रांगोळी
वलय शहारा अंकुरला ओठांवर खळखळ ओघळली
जातकुळी ही प्रीत खुळी रुधिरावर अलगद पागोळी

……………………… अज्ञात

अद्भुतरसकविता

भरारी

अज्ञातकुल's picture
अज्ञातकुल in जे न देखे रवी...
3 Jan 2014 - 11:13 am

घेत भरारी गगन विहारी विहंग मन प्रतिमा कोरी
वेध दिशांचे युगे युगे जन्मो जन्मी विस्मयकारी
अशक्य कोटी असंख्य नाती गुंता अनुनय गाभारी
अन्वय शोध बिचारे अगणित चुकार भाषा व्यभिचारी

गाळिवशा रिपुकांच्या भिंती रोप पेरती अविचारी
किती करावे थोडे ते तृप्ती न कधीच महाद्वारी
द्यावे घ्यावे विसरावे परतून न यावे माघारी
निववेल कुणी इच्छा वांच्छा थांबेल कधी का ही वारी ??

………………………. अज्ञात

अद्भुतरसकविता