घेत भरारी गगन विहारी विहंग मन प्रतिमा कोरी
वेध दिशांचे युगे युगे जन्मो जन्मी विस्मयकारी
अशक्य कोटी असंख्य नाती गुंता अनुनय गाभारी
अन्वय शोध बिचारे अगणित चुकार भाषा व्यभिचारी
गाळिवशा रिपुकांच्या भिंती रोप पेरती अविचारी
किती करावे थोडे ते तृप्ती न कधीच महाद्वारी
द्यावे घ्यावे विसरावे परतून न यावे माघारी
निववेल कुणी इच्छा वांच्छा थांबेल कधी का ही वारी ??
………………………. अज्ञात
प्रतिक्रिया
3 Jan 2014 - 3:16 pm | वेल्लाभट
सुपर्ब.........
3 Jan 2014 - 7:57 pm | अज्ञातकुल
धन्यवाद वेल्लाभत :)
3 Jan 2014 - 3:32 pm | अत्रुप्त आत्मा
समारोप अवडला..पण वाचताना खटक्यावर बोट होत नैय्ये!
3 Jan 2014 - 7:54 pm | अज्ञातकुल
पण वाचताना खटक्यावर बोट होत नैय्ये हे उलगडलं नाही बुवा !!
3 Jan 2014 - 4:14 pm | कवितानागेश
आहा. फार सुंदर.