रसिका

अज्ञातकुल's picture
अज्ञातकुल in जे न देखे रवी...
28 Jan 2014 - 10:59 am

गुंतती खुणा गाठती रेशमी धागे
हृदयात रुधिर रसिकाचे जेंव्हा जागे
चांदणे टिपुर आवसेचे निर्मळ अवघे
चंद्रास न माहित पण; ते पडद्यामागे

श्वासांचे प्राक्तन; सुखवी प्रेम नि माया
चिरतरुण ठेवते अभिलाषा; मन-काया
जन्मास सोबती गोत; खेळ खेळाया
शोधण्या किनारा लाट हवी उसवाया

प्रेरणा कामना उचंबळाचे कारण
ऋतु गंध रंग रस चैतन्याचे सारण
अभिसरण नसे ते; रुक्ष पोरके अंगण
दशदिशा चराचर अस्वादास्तव आंदण

………………… अज्ञात

अद्भुतरसकविता

प्रतिक्रिया

आयुर्हित's picture

30 Jan 2014 - 12:49 pm | आयुर्हित

"श्वासांचे प्राक्तन; सुखवी प्रेम नि माया
चिरतरुण ठेवते अभिलाषा; मन-काया"

व्वा, क्या बात है! जबरदस्त विचार !

कवितेत किती सहजपणे सुखी जीवनाचा व दीर्घायुषाचा मूळमंत्र सांगितला आहे.
धनयवाद

एक शंका: चंद्राच्या प्रकाशाला चांदणे म्हणतात कि चांदण्यांच्या प्रकाशाला?

अज्ञातकुल's picture

31 Jan 2014 - 10:51 am | अज्ञातकुल

चन्द्राची "आभा" चांदण्यांचा प्रकाश म्हणजे "चांदणे". "चंद्राचे चांदणे" म्हणजे "चंद्राच्या सख्या चांदण्या". आमावसेला चंद्राची आभा नसते म्हणून चंदणे "टिपूर" दिसते. हे माझे निरीक्षण आणि त्यावरून तयार झालेले मत. :) प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक आभार..

मदनबाण's picture

31 Jan 2014 - 6:18 am | मदनबाण

मस्त...

अत्रुप्त आत्मा's picture

31 Jan 2014 - 11:46 am | अत्रुप्त आत्मा

झक्कास!