२०१४

सांजसंध्या's picture
सांजसंध्या in जे न देखे रवी...
17 Sep 2013 - 12:59 am

देशाच्या प्राक्तनाचे
लिलाव जवळ येताच
भावी विधात्यांची
स्वप्नांची दुकानं
पॉश एरीयातल्या
आर्ट गॅलरीतली
कोलाज बनून सजतात
गूढ, अगम्य, गुंगवणारी
पण प्रेक्षणीय
आणि चक्क श्रवणीयही
तेव्हां..
टाळ्या पिटायला
आख्खी धारावी धावते
आणि वाट पाहते
पुढच्या शो ची
पुन्हा पाच वर्षांसाठी

- संध्या
१७.९.१३

अद्भुतरसकविता

प्रतिक्रिया

अत्रुप्त आत्मा's picture

17 Sep 2013 - 1:18 am | अत्रुप्त आत्मा

@आणि वाट पाहते
पुढच्या शो ची
पुन्हा पाच वर्षांसाठी >>> वा वा.. छान! http://www.pic4ever.com/images/birgits_snill.gif

अवांतरः-(अंतू बर्वा मोड)- आंता निवडणूकां विरोधी काव्यरणशिंग फुंकलनीत किं काँय? http://www.pic4ever.com/images/imslow.gif

प्यारे१'s picture

17 Sep 2013 - 1:32 am | प्यारे१

एकदम विद्रोही वगैरे?

थोडी छोटी नि तुटक पण छान.
अशा कविता मोठ्ठ्या चान वाटतात, व्यासपीठ सजवायला नि कवीसम्मेलन गाजवायला. :)

स्पंदना's picture

17 Sep 2013 - 6:55 am | स्पंदना

आपल्या हाती फक्त मतदान!
मतमोजणी सुद्धा नाही.

प्रचेतस's picture

17 Sep 2013 - 9:45 am | प्रचेतस

जाउ द्या हो.
चालायचंच.

चाणक्य's picture

17 Sep 2013 - 10:17 am | चाणक्य

दिवसांनी तुमची कविता आली. छोटेखानी पण चांगली.आहे

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

17 Sep 2013 - 11:09 am | मिसळलेला काव्यप्रेमी

तेव्हां..
टाळ्या पिटायला
आख्खी धारावी धावते
आणि वाट पाहते
पुढच्या शो ची
पुन्हा पाच वर्षांसाठी

व्वाह!!

अग्निकोल्हा's picture

17 Sep 2013 - 6:10 pm | अग्निकोल्हा

.