चीत्कला चपळ चमके गगनी
स्वर उमड घुमड घन प्रतिध्वनी
थरकापे अवनी तपोवनी
डोळ्यात आंसवे विद्ध मनी
काळीज तळी अवखळ पाणी
जळ खळाळे विकल होवोनी
अस्वस्थ मेघ धावे कोणी
चातक चोचीत शुष्क रमणी
वेदना सखी मिरवे अंगी
श्रम दाह शमे ना एकांगी
शिडकावा तनभर भावुकसा
व्हावा अमृतमय शतरंगी
……………. अज्ञात
प्रतिक्रिया
30 Oct 2013 - 1:37 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
लिहित राहा.
-दिलीप बिरुटे
30 Oct 2013 - 2:21 pm | अग्निकोल्हा
.
30 Oct 2013 - 2:23 pm | धन्या
यानिमित्ताने चित्कला मुक्ताईची आठवण झाली.
30 Oct 2013 - 2:37 pm | प्यारे१
+१
मस्तच!
चित्कला म्हणजे वीज हे ठाऊक होतं.
मुक्ताबाईचं काय झालं कुणालाच ठाऊक नाही. पार्थिव नाही.
माऊलीच्या समाधीनंतर तिघे कुठल्यातरी यात्रेत जाताना पाऊस आला, वीज कडाडली नि मुक्ताबाई गायब.
30 Oct 2013 - 2:57 pm | बॅटमॅन
ज्ञानेश्वरांनी संजीवन समाधी का काय म्हणतात ती घेतली होती, त्यामुळे समाधीत त्यांचे पार्थिव असेल तर मॉडर्न तंत्रज्ञानाने त्यांचा चेहरा रीकन्स्ट्रक्ट करता येऊही शकेल. पण मग भावना दुखावतील नेहमीप्रमाणेच. असो.
30 Oct 2013 - 9:40 pm | प्यारे१
चेहरा रिकन्स्ट्रक्ट केला, ते कसे दिसत होते हे ही पाहिलं. पुढं?
मी म्हणतो त्यांना आज आधी चैतन्यरुपात होते तसं जिवंत करता आलं, पुढं?
ऑलरेडी 'मागिलिया जन्मा मुक्त झालो' म्हणालेत.
टास्क घेऊन आलेले, केला, चालले गेले (हे नासिकचं मराठी कधी कधी लई उपयोगी पडतं)
आपण बसलोय करत जयजयकार!
तेही कमी नाही म्हणा, पण ज्यु के जी तलं दप्तर बदलूया की कधी!
लिहावाचायला कधी शिकायचं ? ते वापरायला कधी शिकायचं?
का नुसताच डबा खायचा, शि शु करायची, खेळायचं नि झालं?
30 Oct 2013 - 10:37 pm | धन्या
अहो त्यांनी कुतुहलापोटी विचारलं असेल. लगेच काही बारीला उभं राहून किर्तन दयायला नको ;)
31 Oct 2013 - 2:06 am | प्यारे१
:( :( :(
31 Oct 2013 - 8:54 am | किसन शिंदे
हा धन्या मेला एक चान्सही सोडत नाही त्या बिचार्या प्यारेला बोलायचा. :P
1 Nov 2013 - 3:28 pm | बॅटमॅन
पुढं काहीच नाही. आम्ही म्हणतो दोन्ही महत्त्वाचं आहे!
कुठल्या प्रकारच्या उत्सुकतेला प्राधान्य दिलं पाहिजे हे कोण ठरवणार? ज्ञानेश्वरांनी सांगितलेल्या मार्गाबद्दल साधकबाधक विचार करणे हा एक प्रकार झाला, त्याचे महत्त्व कोण नाकारतंय इथं? पण म्हणून या इतक्याशा निरुपद्रवी प्रस्तावाविरुद्धची तीव्र रिअॅक्शन रोचक वाटली. कुणाला असे कुतूहल असेल तर ते बिनकामाचे हे तुम्ही का ठरवता?
1 Nov 2013 - 3:44 pm | प्यारे१
क्षमस्व. चूकच झाली खरंतर.
30 Oct 2013 - 10:35 pm | धन्या
माणूस गेला की त्याचा देह पंचमहाभूतांत विलीन होतो. अगदी आप, तेज, वायू वगैरेंमध्ये गेला नाही तर मृतदेहाचे विघटन होते. त्यामुळे समाधीत पार्थिव असेल म्हणणे बरोबर आहे असं वाटत नाही. जवळपास आठशे वर्षांनतरही तर नाहीच नाही.
1 Nov 2013 - 3:24 pm | बॅटमॅन
ते आहेच रे. इजिप्तसारखी ममी नसेलच तिथे-अझ्यूमिंग की तिथे तसं काही होतं. कातडी-मांस सगळे नष्टले असेलच. पण हाडाच्या सापळ्यावरूनही काही अंशी प्रयत्न करता येतो आणि तसा प्रयत्न काही ठिकाणी ठयशस्वी झालेलाही आहे. म्हणून म्हणालो इतकेच. :)
31 Oct 2013 - 5:23 am | स्पंदना
>>पण मग भावना दुखावतील नेहमीप्रमाणेच.>>
काय आहे, पदर धरुन मोठा झालो म्हणुन पदराची जर खरी का खोटी याचा उहापोह केल्यासारख होइल ते.
माऊली म्हणतात त्यांना, तेथे तू खरी आई का दत्तक अस विचारुन जेनेटीक टेस्ट करायचा आग्रह धरल्यासारख होइल ते.
1 Nov 2013 - 3:31 pm | बॅटमॅन
आजिबात विचार न करता दिलेला प्रतिसाद आहे हा. या अनावश्यक भावनाबंबाळपणाला आवर घालून मी काय म्हणतो ते पाहिलं तर माझी उत्सुकता किती निरुपद्रवी आहे ते लक्षात येईल.
काय वाट्टेल ते. ज्ञानेश्वरांबद्दलचा माझ्या मनातला आदर मी तुम्हाला किंवा अजून कुणाला दाखवून श्रद्धावंत असल्याचे सर्टिफिकेट मिळवायची गरज नाहीये मला. त्यामुळे मूर्तिभञ्जकाचा निषेध केल्याच्या थाटातला हा प्रतिसाद खटकला इतकेच म्हणतो.
30 Oct 2013 - 2:24 pm | बॅटमॅन
शब्दयोजना विशेष आवडली. शीर्षक वाचून कच्चा माल असल्याची शंका आली होती (चीत्कलाया इ.इ.) पण कविता तशी नाही हे पाहून बरे वाटले.
31 Oct 2013 - 5:21 am | स्पंदना
अज्ञातांच्या कवितात कच्चा माल शोधायचा कधीहे प्रय्तन करु नको बॅटॅ.
त्यांच एक बेट आहे कवितांच. वेगळच, अद्भुत!
31 Oct 2013 - 5:44 am | अत्रुप्त आत्मा
त्यांच एक बेट आहे कवितांच. वेगळच, अद्भुत!>>> +++१११
अज्ञाता'चा फ्यान~ आत्मू! :)
1 Nov 2013 - 3:22 pm | बॅटमॅन
आयमाय स्वारी. आलेली शङ्का साङ्गितली फक्त. :)
30 Oct 2013 - 2:49 pm | सार्थबोध
खुप भारि
1 Nov 2013 - 2:33 pm | म्हैस
@प्यारे १ नंबर प्रतिक्रिया