अद्भुतरस

टाळ बोले माझ्य मनीं -

विदेश's picture
विदेश in जे न देखे रवी...
21 Feb 2013 - 12:12 pm

टाळ बोले माझ्या मनीं
नाद करी मृदुंग कानीं
चिपळ्यातुनी येई ध्वनी
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल ||

हाती झेंडा नाचवुनी
स्मरण होई गजरातुनी
नामाचा जप मुखातुनी
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल ||

डोईवरी तुळशीवृंदावनीं
पावलांच्या ठेक्यातुनी
टाळ्यांच्या तालातुनी
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल ||

भक्तीच्या या वाटेवरुनी
जाऊ सगळे आनंदुनी
गाऊ सगळे दंग होउनी
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल ||

देहभान अपुले हरपूनी
नाचू रंगूया कीर्तनी
म्हणू सगळे वारीतुनी
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल ||
.

अद्भुतरसकविता

तरंग

अज्ञातकुल's picture
अज्ञातकुल in जे न देखे रवी...
18 Feb 2013 - 10:28 am

पीत वारा धुंद होतो, नित उषेच्या मैफिली
पाखरे उडती विहरती देत त्यांच्या चाहुली
रोज ही चैतन्यमय लय येइ माझ्या अंगणी
दूर कोठे शीळ घाली तृप्ततेची माउली

शीण चिणलेला निशेचा जातसे मन लंघुनी
लाट पाटाची प्रवाही होतसे क्षण बिलगुनी
योजनेच्या या पळांचे गीत गाई वैखरी
आळावी सारे तरंग अंतरंगी रंगुनी

.............................अज्ञात

अद्भुतरसकविता

आई ..

विदेश's picture
विदेश in जे न देखे रवी...
31 Jan 2013 - 9:58 pm

ठेच लागता घाई घाई,
तोंडी नेमके आई आई ..

दु:खामधे मुखात येई
कसे नेमके आई आई ..

तळमळ जेव्हां जिवात होई
मनीं नेमके आई आई ..

समर प्रसंग सामोरी येई
स्मरण नेमके आई आई ..

बापाचा पाठी मार खाई
तोंडी नेमके आई आई ..

जन्म माणसा वाया जाई
म्हटले ना जर आई आई !
.

अद्भुतरसकविता

जीवनरेषा

अज्ञातकुल's picture
अज्ञातकुल in जे न देखे रवी...
29 Jan 2013 - 5:18 pm

प्रेम असीम जलद विहारी
कोणी न जाणे अंत तयाचा
पवन दिशाहीन भ्रमरे भवती
रोखे गिरी वेग त्याचा
अजब जळी समीकरण असे हे बरसे जीवन रेषा सदनी
बरसे जीवन रेषा

मधुर स्वरे रसरंग परांनी
नटे अवनी हृदयी मनरमणी
वलये भली सुखसंवेदनांची
ज्योत झरे अंजनाची
गरज अटळ कळ तळकाळजाची बिन अक्षर परिभाषा वाणी
बिन अक्षर परिभाषा

शोध भरे ऋतु लयवित क्रांती
अविरत स्पंदन खल एकांती
मन साधन पण क्षितीज अनंत
लेश न गावे हाती
मनन स्मरण क्षण जतन करावे जनन मरण पडछाया देही
जनन मरण पडछाया

...........................अज्ञात

अद्भुतरसकविता

गाल चोळ फक्त

ज्ञानोबाचे पैजार's picture
ज्ञानोबाचे पैजार in जे न देखे रवी...
11 Dec 2012 - 9:41 am

3

कोडाईकनालभूछत्रीशृंगारभयानकहास्यबिभत्सकरुणवीररसअद्भुतरसरौद्ररसशांतरसधोरणसंस्कृतीकलानृत्यनाट्यसंगीतपाकक्रियावाङ्मयकथाबालकथाकविताचारोळ्याप्रेमकाव्यबालगीतगझलभाषाउखाणेप्रतिशब्दव्याकरणव्युत्पत्तीशब्दक्रीडासुभाषितेजीवनमानतंत्रऔषधोपचारदेशांतरराहती जागाविज्ञानक्रीडाअर्थकारणगुंतवणूकफलज्योतिषकृष्णमुर्तीराजकारणशिक्षणचित्रपटरेखाटन