आई, अशी कशी ही दिवाळी
येते पटकन, सरते झटकन,
अभ्यासाला पुन्हा जुंपते
दहा दिवस का जाती चटकन !
फराळाच्या डब्यात मोठ्ठ्या
गोड गोड का तसेच उरते ?
चकली चिवडा चट्टामट्टा
पोटामध्ये भरकन जिरते !
भुईचक्र अन् टिकल्या आता
कंटाळा मज येइ उडवता -
धमाल दिसते मोठया हाती
बॉम्ब नि रॉकेट आवाज करता !
सुट्टी असते किती ग हट्टी
ठरल्या दिवशी येते जाते -
मित्रमंडळी गोळा होता
धमाल अमुची मनीं रहाते !
दिवाळी संपुन सुट्टी संपता
जुनाट दिसती नवीन कपडे...
आई, सांग ना दिवाळीस ग
बारा महिने थांब, तू इकडे !
.
.
प्रतिक्रिया
28 Nov 2012 - 2:21 pm | ज्ञानराम
खूपच छान , बालगीत...
28 Nov 2012 - 3:47 pm | श्री गावसेना प्रमुख
घ्या आता रडु नका
28 Nov 2012 - 4:01 pm | सस्नेह
आँ ?
आणि चकली चिवडा कुठाय ?
28 Nov 2012 - 4:11 pm | श्री गावसेना प्रमुख
घ्या तुम्ही नका नाराज होउ
28 Nov 2012 - 4:06 pm | ज्ञानराम
मला बेसन लाडू :)
28 Nov 2012 - 4:13 pm | श्री गावसेना प्रमुख
तुम्हीही घ्या
28 Nov 2012 - 6:03 pm | अविनाशकुलकर्णी
एकदम निरागस बालगित...आवडले..
28 Nov 2012 - 9:58 pm | अत्रुप्त आत्मा
ऐसाइच बोल्ता है....! :-) येकदम विनोसन्ट :-)
28 Nov 2012 - 10:02 pm | ५० फक्त
खुप मस्त गाणं, पोराला शिकवेन. धन्यवाद.
28 Nov 2012 - 10:44 pm | रेवती
बालगीत आवडले आणि गासेप्रंचे प्रतिसाद पाहून हसू आले.
29 Nov 2012 - 8:03 am | अनिल तापकीर
सुंदर