पिसे

अज्ञातकुल's picture
अज्ञातकुल in जे न देखे रवी...
27 Dec 2012 - 1:14 pm

सुखाच्या घडीला निभावू कसे
निळ्या आसमंती शशीचे हसे
नसे स्वप्न हे नाही आभासही
मिटे पापणी ना असे हे पिसे

स्पर्श अस्पर्श खोल आत कोषातले
आस वेल्ह्या नभाचे तरंग वेगळे
ओलवेली तृषा तृप्त परस अंगणी
कोण गाथा रुधीरास सांगते भले ?

..........................अज्ञात

अद्भुतरसकविता

प्रतिक्रिया

स्पंदना's picture

31 Dec 2012 - 8:44 am | स्पंदना

कुठुन आणता हो शब्द? की ते शब्दच येतात तुम्हाकडे?

अत्रुप्त आत्मा's picture

31 Dec 2012 - 12:48 pm | अत्रुप्त आत्मा

सलाम........................ !!!

इन्दुसुता's picture

6 Jan 2013 - 12:20 am | इन्दुसुता

सत्य आणि आभास या दोहोंच्या मधे, मनात एक परिसर असतो, तुमची कविता तेथे घेऊन गेली.
आवडली हेवेसांनल

अज्ञातकुल's picture

9 Jan 2013 - 1:04 pm | अज्ञातकुल

सर्वांचे मनापासून आभार.
इंदुसुता,
मी जे मांडलंय ते नेमकं समजलंय तुम्हाला. मला अतिशय आनंद वाटला आपला प्रतिसाद वाचून. मला ह्या सत्य आणि आभास मधल्या परिसरात वावरायला खूप आवडतं. तुम्हला ती जागा गवसली आणि आवडली याचं समाधान वाटलं. अशा जागांचे नेमके पत्ते सांगता येत नसतात. ते ज्याचे त्याला सापडत असतात असं मला नेहमीच वाटत आलंय त्याची ही प्रचिती आहे असं मी समजतो. :-)

आवडले हे शब्दांचे खेळ.... ज्याने कधी ना कळे वेळ...