संवाद

अज्ञातकुल's picture
अज्ञातकुल in जे न देखे रवी...
4 Mar 2013 - 8:18 pm

संवाद स्वरांशी माझा
स्पंदन अविरत रागांचे
हृदयी माया कंठी मार्दव
ओठात जलद शब्दांचे
.........सावल्या किती विझलेल्या
.........झिजलेले कोळ कळांचे
..........नाळेत ओवलेली गांवे
..........अवशेष अमिट नात्यांचे

वाहते प्रवाही गाथा
पेरीत स्मरण मिथकांचे
वादळे पूररेषांची
अंतहीन क्षेत्र नभाचे
...........शत जन्म अधूरे नाथा
...........तोकडे वेध वेदांचे
...........स्तंभीत मती नत माथा
...........रण ओघळते ऋणकांचे

.......................अज्ञात

अद्भुतरसकविता

प्रतिक्रिया

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

4 Mar 2013 - 8:22 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

शत जन्म अधूरे नाथा
तोकडे वेध वेदांचे
स्तंभीत मती नत माथा
रण ओघळते ऋणकांचे

अत्यंत रेखिव.

काय लिहीता हो तुम्ही!
सुरेख!

नगरीनिरंजन's picture

5 Mar 2013 - 8:13 am | नगरीनिरंजन

"रण ओघळते ऋणकांचे" म्हणजे काय?

इन्दुसुता's picture

8 Mar 2013 - 9:04 pm | इन्दुसुता

"काय लिहीता हो तुम्ही!
सुरेख"

अगदी असेच मलादेखील वाटते.