त्रेधा

अज्ञातकुल's picture
अज्ञातकुल in जे न देखे रवी...
2 Apr 2013 - 10:26 am

एक एक श्वासात ध्यास
मज बिलगुन आहे राधा
नसून भासे सोबतीस
ठायी ठायी ही बाधा
.............. स्वरे कोकिळा गाई वसंत
................अनाम सार्‍या विविधा
................मदन गंध पवनासंगे
................एकांती कुंठित मेधा

खोल निळाई अथांगासवे
क्षितिज बांधते वाडा
जन्म सांडतो संमोहातच
धाव धावतो वेडा
.................वलये वलये लाटा लटा
.................मनभर तिरपिट त्रेधा
.................काय कशास्तव हे भिजलेपण
.................सय-श्रावण सण साधा

......................अज्ञात

अद्भुतरसकविता

प्रतिक्रिया

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

2 Apr 2013 - 10:31 am | मिसळलेला काव्यप्रेमी

सुंदर क्रियेशन

खोल निळाई अथांगासवे
क्षितिज बांधते वाडा
जन्म सांडतो संमोहातच
धाव धावतो वेडा

अ प्र ति म!!

काही ओळी आवडल्या (उदाहरणार्थ, 'नसून भासे सोबतीस')
पण काही (उदाहरणार्थ 'क्षितिज बांधतो वाडा') तितक्याशा रुचल्या नाहीत.
एकंदर कविता आवडली.