नवा जिल्बिवाला
समस्त अभ्यागत नवं तांब्याधारकांस कढई सह समर-पीत :-p
ब्लॉग माझा आहे तिथे, पीठही आहे भरपुर
तिकडुन भरुन तांब्या इथे, जिलब्या तळिन चुरचुर
नवि कढई दिसता माझे,हात लगेच उठतात
तेल गरम असो/नसो,पटपट तांब्या फिरवतात.
जरि काढल्या जिलब्यांवरती,फिरु लागल्या माश्या
मी म्हणेन,''बघा की नुस्त,का वाजवता ताशा?''
मला(हि) लेखक/कवि व्हायचय,तांब्या जरा फिरवु द्या
अखिल जिलबि पाडक संघाचं,राष्ट्रीय संमेलन भरवु द्या
एकाच दिवशी टाकेन मी,दोन दोन पराती जिलब्या
मि.पा. वरच्या प्रत्येक स्टॉलवर म्हणिन मी, ''मलाच घ्या''