गाभा:
मित्रांनो,
मला (आणि कदाचित माझ्यासारख्या अनेकांना) मोबाईल मधील वाय-फाय नेमके कसे वापरावे याची माहिती हवी आहे. अलिकडेच मिपावर मोबाईल वरील दोनेक धाग्यांनी माझे लक्ष वेधून घेतले. मिपावरील तज्ज्ञ मित्र मला नक्की मदत करतील याची खात्री वाटल्याने हा धागा सुरु करतो आहे.
तर माझी विनंती आहे की मोबाईलमधील वाय-फाय कसे वापरावे? (जे फुकट असते असा माझा समज आहे)
त्यासाठी काय करावे लागते? हा वापर किती सुरक्षित आहे? सुरक्षा जपण्यासाठी काय काय काळजी घेतली पाहिजे? या व त्याअनुषंगाने अधिक माहिती कोणी देऊ शकेल तर खूप आभारी राहीन.
उदाहरणार्थ माझ्याकडे एन्ड्रॉईड ४ वर आधारित सोनी चा एक्सपेरिआ आहे. त्यावर वाय-फाय कसे वापरु? :)

धन्यवाद
प्रतिक्रिया
3 Apr 2013 - 5:56 pm | परिकथेतील राजकुमार
आधी आपल्या मोबाइलमध्ये वाय-फाय आहे याची खात्री करावी आणि त्यानंतर ते चालू करून वापरावे.
3 Apr 2013 - 6:02 pm | नन्दादीप
वाय - फाय फुकट असावे की नाही हे मालकावर डिपेंड असते..... पासवर्ड टाकला तर सगळ अवघड होवून जात.
बाकी अजून काय.....
कनेक्टीव्हीटी मधे जाऊन वाय - फाय चालू करा.. सर्च करून योग्य ते वाय - फाय सिलेक्ट करा. आणी चालू....
होत नसेल तर वेब ब्राऊसर च्या सेटिंग मधे जाऊन Access Point बदला. वाय - फाय ठेवा.
3 Apr 2013 - 6:11 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
वायफाय फुकट असते पण असं फुकट कोणाला वापरु द्यायचं हे मालकाच्या हातात असते. मालकलोक अशा वायफायचा वापर इतरांना करता येऊ नये म्हणून पासवर्ड टाकतात. आपल्या मोबाईलला वायफाय कनेक्षन सापडल्याचं कळतं पण वापरायला लागलो की पासवर्ड द्यावा लागतो जो मालकाच्या वायफायचा आणि मोबाईलच्या वायफायचा पासवर्ड म्याच झाला तरच आपल्याला मोबाईलसाठी वायफाय द्वारे नेट वापरता येतं.
-दिलीप बिरुटे
3 Apr 2013 - 6:35 pm | प्रसाद गोडबोले
इथे कदाचित माहीती मिळु शकेल
http://bit.ly/Z1tUkn
=))
3 Apr 2013 - 10:47 pm | पाषाणभेद
वाय फाय म्हंजी काय वो (सोत्री) भाऊ?
4 Apr 2013 - 4:05 pm | सागर
@परा, नन्दादीप, बिरुटे सर, गिरिजा तुम्हा सर्वांचे मनापासून आभार
तुम्हा सर्वांच्या माहितीचा खूप उपयोग झाला. व आज मी वायफाय वापरुन पाहिले एकदाचे.
खूप छान स्पीड मिळतो. :)
लवकरच आता मी घरी वायफाय राऊटर घेईन. वायफाय राऊटरचा जास्त फायदा होतो असे मी ऐकले आहे.
सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद :)
अवांतर : @पाभे : वायफाय म्हंजी हवेतल्या हवेत लुटालुट करण्याचा परवाना ;)
4 Apr 2013 - 4:16 pm | श्री गावसेना प्रमुख
काय करा,तुमच्या एखाद्या मित्राच्या मोबाईल वर नेट चालु असेल तर त्याच्या मोबाईल चा वाय फाय हॉटस्पॉट चालु करा,त्याला पासवर्ड टाका,व तोच पासवर्ड तुमच्या मोबाईल च्या वायफाय अक्सेस पॉईंट ला द्या व वापरा तुमच्या मोबाईल चे वाय फाय चालु करुन फु़कट नेट.
सध्या भारतात रेशन कार्ड वर एक वाय फाय कनेक्शन द्यायला हव सरकारने,कारण सध्या रिकाम्या हातांना काहीच काम नाहीये
5 Apr 2013 - 9:36 am | नानबा
:)) :))
5 Apr 2013 - 10:18 am | तुषार काळभोर
+२
5 Apr 2013 - 2:12 pm | सागर
व्हयजी ... ते पन करुन्शान पाह्यलं. पण आपण ज्या मित्राच्या मोबाईलचे हॉटस्पॉट वापरतो त्याला मात्र इंटरनेटचे बिलिंग चालू असते. ;)
एअरटेल च्या जाहिरातीचे गूढ हॉटस्पॉट वापरुन पाहिल्यावर उकलले - जो तेरा है वो मेरा है :P
5 Apr 2013 - 12:10 pm | अमोल केळकर
अभ्यास चालू आहे :) सगळेच नवीन आहे हे
अमोल केळकर