सोने की चिड़ियां
हे गाणं माझं खूप म्हणजे खूप फेवरेट आहे. जेव्हा जेव्हा हे कानावर पडतं तेव्हा स्वर्गात विहरत असल्यासारखे वाटते. लहानपणी २६ जानेवारीला युनिफॉर्ममधे शाळेत ध्वजारोहणाला सकाळी सकाळी जायचो तेव्हा हे गाणं कुठे न कुठे चालू असायचं. तेव्हा मन देशाभिमानानी भरून यायचं. आपल्या मनात ही भावना येते याचंच अप्रूप वाटायचं. आपण अशा एका देशाचे नागरिक, वंशज, मालक आहोत ही भावना भारावून टाकायची. कालांतराने सँटाक्लॉसला सत्य मानणार्या लहान मुलाचे वय वाढल्यावर जेव्हा त्याला खरे समजते आणि त्याचे जे होते ते माझं झालंय बहुधा असं वाटतं. तरीही हे गाणं अजूनही गारूड करतंच.