पेरणा
हायवे वरच्या वाटेवरचे वळण द्यायचे हाक
"लोक काय म्हणतील कृत्रीम बंधन सत्वर तोडुनी टाक !"
बायको नामक भूत बाटलीस कायम भिववीत होते
त्या भीतीने तरल काहिसे ग्लासातून निसटत होते
गोळा करूनी धैर्य, ठरविले, नको गाय छाप मळलेली
वाट खोकुनी माझी लावीते, वीडी कोंदटलेली,
जेडी, शिवास, टिचर्स, यांच्यात अवघडून बसलेली
ओल्ड माँक ती ग्लासामध्ये, विमुक्त होता निर्मळ हसली
त्या हसण्याचा खळाळ ध्वनि मज सांगुनी गेला काही,
"कितीही प्या, पण ध्यानी ठेवा..चखण्याविण "गंमत" नाही !"
भूछत्री
:))
+१
जबर्या !!!!!! _____/\______
सॉलिड हो....
=))
झक्कास
हे भारी आवडलं.....
खण्ण्ण! =))
हाहाहा.. फस्क्लास!!
म्हागृसाठी
क्या बात है
पुन्हा एकदा म्हाग्रु
In reply to पुन्हा एकदा म्हाग्रु by ज्ञानोबाचे पैजार
ठ्ठो...!!! कं हाणलंय!
काय लिवलंय.. काय लिवलंय...
In reply to काय लिवलंय.. काय लिवलंय... by मोदक
विडंबन लिवलंय.. विडंबन लिवलंय
काय लिहिलंय पैजार बुवा?