✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

(एक ग्लास त्याचा....)

स — सतिश गावडे, Mon, 04/17/2017 - 23:47
प्रेरणा बसण्याचा हिशोब साचा एक ग्लास त्याचा, एक माझा! दिसायला दोन्ही एकच ब्रँडही सारखाच फक्त चखण्याची रित ज... रा निराळी म्हणूनच.. एक ग्लास त्याचा,एक माझा! माझा आधी संपेल, त्याचा नंतर चालायचंच हे असं जंतरमंतर! अगदी निरंतर.. त्यातूनच घडते जादू शेवटी टेस्टी... लज्जतदार... सुरंगी पण तरिही.. एक ग्लास त्याचा, एक माझा! एकत्र बसून थोडं वेगळेपण वेगळं बसूनही थोडस्सं एकत्रपण..! त्याचं सावधपण माझं झोकांडणं बसण्यातली चखण्यातली गोडी वाढवणारं.. त्याच कारणानी.. एक ग्लास त्याचा, एक माझा! बिलाच्या बेरजा, नशेत केलेल्या वजा-बाक्या! कधी गुणाकार.. कधी भागाकार परत त्यांच्याही बेरजा वजाबाक्या!!! पण गणित तिथेच येऊन थांबतं.. अगदी नेहेमी.. एक ग्लास त्याचा.... asdf

प्रतिक्रिया द्या
22734 वाचन

💬 प्रतिसाद (28)

मस्त जमलंय !!!

राघवेंद्र
Mon, 04/17/2017 - 23:50 नवीन
मस्त जमलंय !!!
  • Log in or register to post comments

अजून दोनतीन कल्पना वाढवा.

कंजूस
Tue, 04/18/2017 - 08:59 नवीन
अजून दोनतीन कल्पना वाढवा.
  • Log in or register to post comments

मुळ कवितेत फक्त काही शब्दांचे

सतिश गावडे
Tue, 04/18/2017 - 11:04 नवीन
मुळ कवितेत फक्त काही शब्दांचे फेरफार केले आहेत :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस

=))

पैसा
Tue, 04/18/2017 - 09:22 नवीन
=))
  • Log in or register to post comments

खूप छान इडंबन

खटपट्या
Tue, 04/18/2017 - 09:31 नवीन
खूप छान इडंबन
  • Log in or register to post comments

ह्या ह्या ह्या..!

अत्रुप्त आत्मा
Tue, 04/18/2017 - 09:47 नवीन
ह्या ह्या ह्या..! .... ..... Image removed. गा वडे मास्तरांचा ग्लास जमला फस् क्लास!
  • Log in or register to post comments

=))

यशोधरा
Tue, 04/18/2017 - 09:56 नवीन
=))
  • Log in or register to post comments

व्वा.

चित्रगुप्त
Tue, 04/18/2017 - 10:01 नवीन
वाहवा.
  • Log in or register to post comments

हाहाहा.. मस्त..

पुंबा
Tue, 04/18/2017 - 10:54 नवीन
हाहाहा.. मस्त..
  • Log in or register to post comments

सगा,

संजय क्षीरसागर
Tue, 04/18/2017 - 11:50 नवीन
हे एक वेरिएशन बघा : बसण्याचा हिशोब घरचा एक ग्लास तिचा, एक माझा ! सगळी दारु एकच चढणारही सारखीच फक्त घेण्याची रित ज... रा निराळी म्हणूनच.. एक ग्लास तिचा,एक माझा! माझी आधी संपेल, तिची नंतर नेहेमीचंच हे पिण्यातलं-अंतर! अगदी निरंतर.. त्यातूनच घडते जादू शेवटी उष्टी... चलाखीदार... बदली पण तरीही.. एक ग्लास तिचा, एक माझा! एकत्र बसून थोडं वेडेपण वेगळं बसूनही झक्कास एकत्रपण..! तिचं सावधपण, माझं उधळलेपणं घेण्यातली आणि भरण्यातली गोडी वाढवणारं.. त्याच कारणानी.. एक ग्लास तिचा, एक माझा! चुकीची योगासनं, नशेत केलेल्या माकड उड्या! कधी ती माझ्यावर .. कधी मी तिच्यावर परत त्यातही एकमेकांवर कुरघोड्या!!! पण गणित तिथेच येऊन थांबतं.. अगदी नेहेमी.. एक ग्लास तिचा....
  • Log in or register to post comments

आरारारारारारा!

अत्रुप्त आत्मा
Tue, 04/18/2017 - 12:20 नवीन
आरारारारारारा! Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

वो सर, हा विषय मी घेणार होतो.

टवाळ कार्टा
Tue, 04/18/2017 - 18:17 नवीन
वो सर, हा विषय मी घेणार होतो....जाऊदे आता
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

दोन्ही ग्लास अमितचे. ;)

अभ्या..
Tue, 04/18/2017 - 12:46 नवीन
दोन्ही ग्लास अमितचे. ;)
  • Log in or register to post comments

एक ग्लास पक्षी-दरीत'ला(ही! )

अत्रुप्त आत्मा
Tue, 04/18/2017 - 14:01 नवीन
एक ग्लास पक्षी-दरीत'ला(ही! ) ह्ही ह्ही! =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

जबर्या

वरुण मोहिते
Tue, 04/18/2017 - 13:46 नवीन
विडंबन ...हाहाहा
  • Log in or register to post comments

चिअर्स ! ;)

मदनबाण
Tue, 04/18/2017 - 16:27 नवीन
चिअर्स ! ;)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Kahe Chhed - Mohe Rang Do :- Dr. Payal Vakharia
  • Log in or register to post comments

जबराऽऽट!

सत्यजित...
Wed, 04/19/2017 - 02:01 नवीन
याला म्हणावं विडंबन!
  • Log in or register to post comments

एक तांब्या त्याचा मी टाकणारे

कॅप्टन जॅक स्पॅरो
Wed, 04/19/2017 - 06:54 नवीन
एक तांब्या त्याचा मी टाकणारे ओ सगासर. डिब्ज. फक्कडं जमलाय हा एकचं प्याला.
  • Log in or register to post comments

(No subject)

अत्रुप्त आत्मा
Wed, 04/19/2017 - 12:25 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

मस्तं!

अनुप ढेरे
Wed, 04/19/2017 - 10:38 नवीन
मस्तं!
  • Log in or register to post comments

मस्तच!

पद्मावति
Wed, 04/19/2017 - 11:14 नवीन
मस्तच!
  • Log in or register to post comments

विडंबन जमलय.

अभिजीत अवलिया
Sat, 04/22/2017 - 20:37 नवीन
विडंबन जमलय.
  • Log in or register to post comments

वाह...

Secret Stranger
Fri, 07/20/2018 - 15:20 नवीन
खूप मजा आली वाचताना..
  • Log in or register to post comments

फर्मास कविता

खिलजि
Fri, 07/27/2018 - 13:33 नवीन
वाचतानाच चढली याला काय म्हणावं नशा कि अजून दुसरं काही हे असे शब्द वाचले कि ते दिवस आठवले जागा मिळेल तिथे प्याले रिचवले कुणी काय तोडले? कुणी काय ओकले ? लक्ष्यात त्याच्याच राहिले ज्याने बिल दिले आज खिसा भरलेला तरी तो वेळ मात्र नाही आणि असला तरी , ती मजा येत नाही सगाशेठ , हि कविता मी प्रिंटवली आहे , आणि हालमध्ये लावण्याच्या विचारात आहे . वाचूनच चढली राव , आता बाराची गरजच नाय उरलीय . धन्यवाद त्रिवार धन्यवाद ... सिद्धेश्वर विलास पाटणकर
  • Log in or register to post comments

आज खिसा भरलेला तरी तो वेळ

पुंबा
Tue, 07/31/2018 - 18:02 नवीन
आज खिसा भरलेला तरी तो वेळ मात्र नाही
अरेरे खिल्जीभौ. असं नका करत जाऊत. वेळ काढायचा. 'मद्य हे पूर्णब्रह्म' हे जाणून असा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खिलजि

ह. घ्यालच.

पुंबा
Tue, 07/31/2018 - 18:03 नवीन
ह. घ्यालच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुंबा

पुम्बा साहेब आजही ते दिवस

खिलजि
Tue, 07/31/2018 - 18:11 नवीन
पुम्बा साहेब आजही ते दिवस आठवतात राव ,,,, लय मज्जेदार किस्से घडून रह्यायलेत या जिंदगानीत . लिहिताना बी कससंच व्हतंय ...
  • Log in or register to post comments

@ सगाशेटनी या प्रतिसादाची नोंद घ्यावी हि नम्र विनन्ती

खिलजि
Wed, 08/01/2018 - 19:43 नवीन
मला वाटत हि चालेल ( कल्पना ) नुसती चालणारच नाही तर सुस्साट धावेल एका हातात जॅक डॅनियल नि दुसऱ्या हातात लेखणी लिहू कशावर तेच कळत नाही आहे कागदावर पडलीय शेजवान चटणी डोळे थोडे झालेत मंद मंद लॉलिपॉप चा वास दरवळतोय धुंद धुंद तिसऱ्या पेंगला आता कुठे सुरुवात झालीय बघा जरा सवंगड्यानो ,कशी रांगोळी आलीय बालपणीचा बार आठवून आजही गळे काढतोय उद्या आषाढी लागतेय, म्हणून आजच पितोय जोर साहेबांमधि तेव्हाही नव्हता आणि आताही नाही थर्र्याची चव काही औरच होती , जाता जात नाही नारिंगी, मोसंबी, टॅंगो पंच , त्यावर चढायचा मळीचा कळस सालं आता टाय लावून प्यायचं म्हंटल नवख्या गडयांना येतोय आपलाच किळस आताच्या चखण्याला ती चवच नाही काय तर म्हणे , सुरमई फ्राय , कोळंबी फ्राय तिखटमीठ लावलेली सुकट नि कांदा आता कुठेच दिसत न्हाय आता सोडापाणी गारेगार लागतंय सोबतीला ऐरकण्डिशनचं वारं लागतंय एव्हढं करूनही चढत न्हाई राव त्याचंच फार वाईट वाटतंय शुध्धीत लिहितात ते शुद्धलेखन धुंदीत लिहितात ते काव्यलेखन मागच्या २२ तारखेला करुनि चिकन हाणहाणहाणून करतोय तुम्हांसी अर्पण सध्याचा चातुर्मासिक खिलजी उर्फ सिद्धेश्वर विलास पाटणकर
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा