(जरही) या दिशेला एकदाही यायचे नव्हते मला
जर विशालची तरही तर आमची जरही
(जरही) या दिशेला एकदाही यायचे नव्हते मला
मोकळे हापिसात् कधिही, व्हायचे नव्हते मला
या दिशेला एकदाही यायचे नव्हते मला,
कळ उठता पोटातूनी, दाबूनी ठेउ किती?
दर्प जहरी इतरे जनांना, द्यायचे नव्हते मला
आज गडबड जाहली पोटामधे माझ्या कशी?
करपट ढेकर द्यायची, मिटींग मधे नव्हती मला
वेळ नाही काळ नाही, ना कुणाची लाजही,
पाचवी वाटी बासुंदीची , प्यायची नव्हती मला,