बोटावर शाईचा अजून रंग ओला
बोटावर शाईचा अजून रंग ओला
माझ्या पाठी त्याच आधी खंजीर तू खूपसला
दाविलेस डोळ्यांना स्वप्न एक भगवे
दारोदारी फिरशी आता लाज सोडून नागवे
नकळत तव द्वेष गाड्या जागृत मम झाला
विश्वासून तुझीयावर मते तूला दिली
राम भरत जोडी ही क्षणार्धात तुटली
कालियूगीन भरत कसा सत्तातूर झाला
आई भवानी रडली अन, शिवराय व्यथित झाले
नाव त्यांचे आज पार धुळीला मिळाले
आज तुझ्या कृत्याने जीव धन्य झाला
पैजारबुवा,