छायाचित्रण
|| श्रीस्वामी समर्थ ||
आज श्रीस्वामी समर्थ महाराज {अक्कलकोट स्वामी} यांची पुण्यतिथी आहे. लहानपणी दादरच्या त्यांच्या मठात अनेकदा जाणे होत असे,आता गिरगावात कधी जाणे झाले तर काळाराम मंदीर आणि कांदेवाडीच्या मठात जातो... तिथलेच काढलेले हे फोटो आहेत.
काहीही...
कशाचे फोटो काढुया आता ? असा विचार टाळक्यात आला... मग विचार केला की काहीही टिपायचे कसेही टिपायचे... बघुया हा सुद्धा प्रयोग करुन. वेववेगळे विषय कसेही टिपुन नक्की दिसतील कसे याची उत्सुकता होती...
चिऊताई..
गेल्या काही दिवसांपूर्वी पावसाच्या तुरळक सरी मुंबईत झाल्या. कामाची वेळ रात्रीची असल्याकारणाने, दिवसा घरीच होतो अन् एकदम पावसाची सर आली. मग घेतला कॅमेरा आणि राहिलो उभा खिडकीत या आशेने. फोटो तसे काही मिळाले नाहीत पण, ही भिजून चिंब झालेली चिमणी तेवढ्यात खिडकीजवळ आली आणि कॅमेर्याचा क्लिक - क्लिकाट झाला...
मॅक्रो छायाचित्रण....
होळी, धूळवड, रंगपंचमी
नमस्कार,
'क्वीन' : कंगनाच्या सहज-सुंदर अभिनयातून साकारलेली स्त्री-मुक्तीची अनोखी कथा
'क्वीन' हा कंगना रनावतचा नवीन सिनेमा. याचे कथानक काय आहे,त्याला किती स्टार मिळालेत, अन्य अभिनेते कोण कोण आहेत, संगीत कुणाचे, वगैरे काहीही माहिती नसताना निव्वळ त्यात 'कंगना आहे' म्हणून हा सिनेमा बघितला, आणि अगदी कृतकृत्य झालो.
फ़्यंड्री...!
राम राम मंडळी. मंडळी, मिपावर फ्यंड्रीबद्दल उत्तम लिहून आल्यानंतर आणि इतरही ठिकाणी फ़्यांड्रीवर येता जाता चर्चा व्हायला लागल्यामुळे चित्रपट पाहण्याची उत्सूकता लागली होती. मराठी चित्रपटांनी कात टाकली आहे. पारंपरिक चित्रपटापेक्षा काही तरी वेगळे मराठी चित्रपटातून यायला लागले आहे. वास्तवतेवर आधारित सकस कथा, ध्वनी, छायाचित्रण,कलाकार, या आणि विविध अशा बदलांनी मराठी चित्रपट जरा हटके यायला लागले आहेत. मराठी चित्रपटांना विषय फुलवता यायला लागले थेटरात शांतपणे चित्रपट बघायला जावे, इथपर्यंत मराठी चित्रपटांनी भरारी घेतली आहे, असे वाटायला लागले आहे.
माझे स्वयंपाक प्रयोग छायाचित्रण
येथे मी बनविलेल्या काही पाककृतींचे छायाचित्रण देत आहे ,बघा आवडते का??
काळा घोडा कला महोत्सव कट्टा - वृत्तांत (३)
आम्ही उत्सवस्थळी दाखल झालो. माझा या उत्सवाला हजेरी लावण्याचा पहिलाच प्रसंग. कलेचा आणि माझा काडीमात्र संबंध नाही, अगदी रेघ देखिल सरळ मारता येत नाही. पण चार लोक जातात तर आपणही जावे, लोकांना कुठे माहित असतं की मी 'ढ' आहे? मागे एकदा तर मी जहांगिरला एक चित्र प्रदर्शन देखिल पाहुन आलो होतो. मूढ मुद्रेने एका चित्रापुढे 'हे काय असावे' याचा अंदाज घेत असता तिथल्यांपैकी एकाने मला 'जाणकार' समजुन अनेक भिकार चित्रांची सहल घडवली होती वर वहीत अभिप्राय लिहावा असा आग्रह देखिल केला होता. असो.