(गळवे)
हिच ती जीवघेणी ठणकणारी गळवे
ज्यावर तू हळूवार पणे मलम लावलेस!!
थोडीशी हिंमत असती तर
ही गळवे सुईने फोडून
आतला पस काढून
स्वच्छ पुसून टाकले असते...
ना हा ठणका राहीलां असता...
ना कूठे गेल्यावर हळूवार पणे
कमीत कमी दुखेल असे पहात
बसावे लागले असते....
ना त्याच्यावर माशा भिरभिरत राहिल्या असत्या....
पहा ना,
माझ्या ठणकणार्या गळवांना
फोडून टाकण्याची शक्ती घटकाभर दिली,
तर विधात्याचे काय जाते?
पैजारबुवा,