विशाल राज्य

शब्दानुज's picture
शब्दानुज in जे न देखे रवी...
18 Mar 2019 - 9:05 pm

विशाल राज्य होते एक , लोक जिथले विचित्र
पाठीवर टांगलेले आरसे आणि गळ्यात मोठे पात्र

स्वमताची पिंक दुस-याच्या पात्रात मारत रहायचे
आपले प्रतिबिंब दुस-याच्याच पाठीवरी पहायचे

पात्र ते गळ्यातले कधीच धूवायचे नाही
एकमेकांच्या घाणीचे इथले सर्वच भारवाही

एक गोष्ट मात्र परि इथे स्वताःची असे
पांढराशुभ्र सदरा इथे जन्मजात मिळत असे

चालताना लोक आरश्यावर धूळ उडवत जात असे
प्रत्येकास आपलाच सदरा मळकाच दिसत असे

"मळकट" सदरा ,कळकट पात्र , बळकट इथले आरसे
अोझ्यानेच त्या प्रत्येक माणूस झुकून इथे चालत असे

कृष्णमुर्ती

प्रतिक्रिया

ज्ञानोबाचे पैजार's picture

19 Mar 2019 - 9:58 am | ज्ञानोबाचे पैजार

या राज्याचा विस्तार जगभर होवो ही इश्वर चरणी प्रार्थना
पैजारबुवा,

खिलजि's picture

19 Mar 2019 - 4:09 pm | खिलजि

खिलजी बहुत खुश हुआ ,,,

काश हमारे राज्य मी भी ऐसे नायब नमुने होते

छान झाली आहे , कल्पना आवडली गेलेली आहे ...