पेरणा
एका जगप्रसिध्द संस्थळावर, नव्याने आलेल्या एका स्वयंघोषित प्रेशिताच्या मागे इतर सदस्य लागलेले असतात. त्या प्रेशिताला त्या संस्थळाचे संपादकही सहानुभूतीने सांभाळून घ्यायचा प्रयत्न करतात. त्याला व इतरांना सबुरीने घ्यायचा सल्ला देतात. काही नाठाळ सदस्यांना कानपिचक्याही देतात. त्यामुळे इतर सदस्य निराश होउन या प्रेशिताडे दुर्लक्ष करु लागतात. थोड्या दिवसांनी तो स्वयंघोषित प्रेशित संपादकांवरच विखारी टिका करायला लागतो. त्यांच्यावरच कंपुबाजीचे व पक्षपाताचे आरोप करायला लागतो.