[लाज] - श श वि

Primary tabs

ज्ञानोबाचे पैजार's picture
ज्ञानोबाचे पैजार in जनातलं, मनातलं
12 Feb 2019 - 3:12 pm

पेरणा अर्थात विज्जुभाउंची ही कथा

दिवसभर मंत्रालया बाहेर बंदोबस्तासाठी उभे राहून वैतागलेला राणे हवालदाराचा घरी जाताना थोडीशी टाकून जाणे हा दिनक्रम होता.

आजची रात्र काही वेगळीच होती. बेस्टच्या बसने सोडलेला धुर रस्त्यावर पसरला होता.

त्यातून नाकासमोर हात हलवता चालताना राणेसाहेब ओसांडून वहाणाऱ्या कचराकुंडीपाशी जरासे रेंगाळले.

कुंडीच्या मागे काहीतरी खसफसले. थोडेसे जवळ जात राणेसाहेब ओरडले " कोण आहे रे तिकडे ".

कुंडीमागे कोणीतरी होते. त्यांनी काठीने जरासे ढोसले

आणि दचकून जोरात “हाड” असे ओरडले.

एक कुत्रे अचानक कुंडी मागून झपकन बाहेर आले. शेपूट पायात ओढत तिकडून पळाले.

आजूबाजूच्या हसणाऱ्या लोकांकडे काहीच झाले नाही अशा आविर्भावात पहात राणेसाहेब तेथून दूर गेले.

त्यांना आपल्या वर्दीची लाज घालवायची नव्हती.

पैजारबुवा,

वाङ्मयबालकथाकृष्णमुर्तीसद्भावनाप्रतिभा

प्रतिक्रिया

ज्योति अळवणी's picture

12 Feb 2019 - 6:19 pm | ज्योति अळवणी

श श वि म्हणजे काय?

ज्योति अळवणी's picture

12 Feb 2019 - 6:19 pm | ज्योति अळवणी

श श वि म्हणजे काय?

आ युष्कामी's picture

12 Feb 2019 - 7:36 pm | आ युष्कामी

शत शब्द विडंबन

डॉ सुहास म्हात्रे's picture

12 Feb 2019 - 8:52 pm | डॉ सुहास म्हात्रे

=))

विजुभाऊ's picture

13 Feb 2019 - 9:40 am | विजुभाऊ

या कथेत कुंडी हा शब्द मराठी आहे की कानडी

ज्ञानोबाचे पैजार's picture

14 Feb 2019 - 10:34 am | ज्ञानोबाचे पैजार

चाल:- इलू इलू

कुंडीSSS कुंडी SSS
कुंडी SSS कुंडी SSS

ये कुंडी कुंडी क्या है? ये कुंडी कुंडी?

जब टेरेस पे हो फुल खिलाना
तो उसके लिये चाहिये
कुंडी कुंडी कुंडी कुंडी

जब घरका ताजा भोपळा हो खाना
तो उसकोभी चाहिये
कुंडी कुंडी..... कुंडी कुंडी

जिसको घर के अंदर पेड हो उगाना
तो बाजार से ले आना
कुंडी कुंडी.... कुंडी कुंडी

कुंडी का मतलब है गमला
मिट्टीका गमला
करना ना इसमे कोई जुमला

पैजारबुवा,

प्रचेतस's picture

14 Feb 2019 - 3:53 pm | प्रचेतस

=))

खतरनाक

खिलजि's picture

14 Feb 2019 - 12:56 pm | खिलजि

पै बु काका , आम्हा सवंगड्यांमध्ये कुंडीचा अर्थ येगळाच होता . तो अर्थ घेऊनच श श वि वाचली , मस्त जुळतो .

विजुभाऊ's picture

14 Feb 2019 - 3:46 pm | विजुभाऊ

तो कानडीतला अर्थ आहे

चांदणे संदीप's picture

16 Feb 2019 - 7:16 am | चांदणे संदीप

शशवि आवडलं.

कुंडीकाव्य पण आवड्या. पैजारबुवांच्या शीघ्रविडंबकवृत्तीस आमचा सलाम. मिपाची ओळख जपण्याला मोलाचा वाटा पैजारबुवा उचलतात हे या ठिकाणी सांगतो आणि माझे दोन शब्द संपवून खाली बसतो. जयहिंद! जय महाराष्ट्र! जय मिपा!

Sandy

Chandu's picture

16 Feb 2019 - 9:46 am | Chandu

खिक

Chandu's picture

16 Feb 2019 - 9:46 am | Chandu

खिक

Chandu's picture

16 Feb 2019 - 9:46 am | Chandu

खिक

Chandu's picture

16 Feb 2019 - 9:46 am | Chandu

खिक

सत्य धर्म's picture

20 Feb 2019 - 1:38 am | सत्य धर्म

मजा आली वाचताना