बुलेट घेतल्यापासूनचे सुखद क्षण
रोज ऑफिसला बुलेटवरच जातो. मनमोकळ्या स्वभावाच्या माझ्या बॉसशी ऑफिसात गप्पा मारताना सहजच म्हणालो, हैद्राबादपासून तीन-चारशे किलोमिटरच्या परिघात मी सर्वत्र बुलेटवर फिरलोय. एक स्कोडा, एक व्हॉल्वो, दोन टोयोटा आणि इतर किरकोळ, ही कौटुंबिक वापराची वाहने असलेल्या बॉसच्या डोळ्यात मनोमन कौतुक आणि (मी प्रवासाला वेळ काढू शकतो म्हणून की काय,) किंचित हेवा तरळला. त्यानं माझ्या पाठीवर थाप मारली व म्हणाला, “तू साला बहोत ऐश करता है!”
***
ऑफिसला जाताना मालकिणीला शाळेत सोडतो. तिला एक विद्यार्थी बालसुलभ-कौतुकमिश्रित-आदरानं म्हणाला “मॅडम आपके पास बुलेट है!”
***