विरंगुळा

भू-भू भुंकणारे कुत्रे

विवेकपटाईत's picture
विवेकपटाईत in जनातलं, मनातलं
6 Sep 2017 - 7:43 pm

कुत्र्यांची एक खासियत असते, कुणीही दिसले कि भुंकणे सुरु. एखादा हत्ती सारखा मोठा जनावर दुरून येताना दिसला कि यांचे भू-भू सुरु झालेच समजा. पण जसा-जसा तो जनावर जवळ येईल. कुत्रे भुंकणे सोडून शेपटी टाकून दूर पळून जातात. कुन्त्र्यांचा स्वभावच दुसरे काय. पण कधी एखादा हत्ती स्वकर्माने जमिनीवर पडला कि मग काय म्हणता राव झुंडीच्या झुंडी कुत्र्यांच्या एकत्र होऊन जमिनीवर पडलेल्या हत्ती वर तुटून पडतात. काही क्षणात सर्व कुत्रे मिळून हत्तीच्या शरीराच्या चिंध्या-चिंध्या करतात.

विडंबनविरंगुळा

आवाज

तिमा's picture
तिमा in जनातलं, मनातलं
3 Sep 2017 - 3:44 pm

डॉक्टर रावांची अपॉइंटमेंट संध्याकाळी सहाची होती. पण वाटेत ट्रॅफिक जॅम असण्याची दाट शक्यता असल्याने, अर्धा तास लवकरच निघालो. डॉ. राव, कान, नाक, घशाचे तज्ञ होतेच, पण त्यांनी बहिर्‍या लोकांसाठी एक औषध तयार केले होते. त्यामुळे कदाचित, त्यांना नोबेल देखील मिळण्याची शक्यता होती. त्यांच्या औषधाने बहिर्‍या लोकांच्या श्रवणक्षमतेत लक्षणीय सुधारणा होत असल्याचे रिपोर्ट होते. अशा लोकांची, महागड्या श्रवणयंत्रापासून मुक्तता झाली होती. अनेक लोकांना चांगला अनुभव आल्याने, त्यांची भेट घेणं, म्हणजे मोठे दिव्य होते. दोन महिन्याच्या प्रतीक्षायादीला सामोरे जावे लागे.

कथाविचारविरंगुळा

म्हागृ महिमा..

पुंबा's picture
पुंबा in जनातलं, मनातलं
30 Aug 2017 - 1:30 pm

महागुरू सचीन 'पीळ'गावकर हे एक महान व्यक्तिमत्व आहे. आता, त्यांचे कर्तृत्वच इतके महान की स्वतःविषयीचे गौरवोदगार त्यांनी काढले नाहीत तर बोलणंच बंद करावे लागायचे त्यांना. काही नतद्रष्ट मात्र टिंगल करतात त्यांची, पण म्हाग्रु त्या सर्वांना पिळून(सॉरी, पुरून) उरलेत. महाराष्ट्राचा अल पचिनो असे त्यांना म्हणतात खरे पण जॉनी डेप ला अमेरिकेचा सचिन पीळगावकर म्हणतात हे कुणी नाही सांगत.(ये बीक गयी है मिडिया, दुसरं काय?) विग घालून का होईना, पण तारूण्य काय टिकवलंय म्हाग्रुंनी!

नृत्यनाट्यसंगीतमौजमजाचित्रपटमाध्यमवेधप्रतिभाविरंगुळा

भारतीय भाषांनी इंग्रजीला उधार दिलेले शब्द

आदित्य कोरडे's picture
आदित्य कोरडे in जनातलं, मनातलं
27 Aug 2017 - 10:07 am

माझी मुलगी शाळेत जाऊ लागल्या पासून तिची मराठी फार बदलली. म्हणजे खराब झाली असे नाही तर मराठी शारदेने तिच्या जिभेवर बहुधा “नाच क्लास” ( हा तिचाच शब्द ) काढला आहे आणि तो सध्या जोरात सुरु आहे त्यामुळे हिडसवून-तिडसवून (म्हणजे तुम्हाला वाटेल ‘हिडीस फिडीस करून’ नाही ह्याचा अर्थ आहे जोर जोरात हलवून दोन किंवा दोन पेक्षा अधिक गोष्टी एकमेकात “मिक्षळणे”), पाडवणे, मस्करी खाणेअसले शब्द तिच्या टाकसाळीत प्रत्यही तयार होत असतात.

शब्दक्रीडाविरंगुळा

पैठणी दिवस भाग-३

गुल्लू दादा's picture
गुल्लू दादा in जनातलं, मनातलं
15 Aug 2017 - 11:36 am

बाह्यरुग्ण विभागामध्ये मलमपट्टी विभागात काम करायला मला विशेष आवडत असे. रुग्णांची संख्या कमी असल्यामुळे त्यांच्याशी मनमोकळ्या गप्पा मारता येत असत. 'जखम कशी झाली' या विषयाद्वारे रुग्ण आपलं मन माझ्यापाशी मोकळं करत. त्यांच्याकडून मग मी पैठण शहराची माहिती, प्रेक्षणीय स्थळे, खाऊ गल्ली यांची माहिती अलगद काढून घेत असे.

कथालेखअनुभवमाहितीआरोग्यविरंगुळा

प्रतिशोध भाग 1

कऊ's picture
कऊ in जनातलं, मनातलं
13 Aug 2017 - 10:45 am

प्रसंग पहिला

" शीट यार ,खूपच late झाला.
एवढा ngo चालवतो हा आकाश , पण एका मेंबरला माझ्यासोबत पाठवू शकला नाही का.
मीच मूर्ख जी गेली रांगोळी काढायला.
पुन्हा सकाळी जायचय रांगोळी काढायला.
गुढीपाडवा ना..
रात्री जागून रांगोळ्या काढा मग सकाळी मस्त तयार होऊन Rally मध्ये भाग घ्या.."

कथाविरंगुळा

प्रतिशोध भाग - 2

कऊ's picture
कऊ in जनातलं, मनातलं
13 Aug 2017 - 10:37 am

प्रतिशोध
भाग - दुसरा

"ओय , काऊ लक्ष कुठे आहे ग तुझं??कॉफी थंड झाली..हॉट कॉफी कशाला ऑडर केली मग "जमेल तेवढ्या हळू आवाजात सियाल काव्याला ओरडत होता.
दर रविवारी यांचा कट्टा जमायचा.
आज काव्या आणि सियाल जरा लवकरच आले होते.
तोपर्यंत बबलु , श्रीकांत ऊर्फ श्री , संदेश ऊर्फ सँडी यांची स्वारी तिथे पोहचली.

बबलु : "काय रे कदम एरवी सांगतो की आमच्यात काही नाही आणि आज बरे दोघ ..बोला तुम्ही ..आम्ही जातो..आम्ही कशाला कबाब मे हड्डी.."

"अबे Bmc तु तर तसपण हड्डी सारखाच आहे..मांस आहे कुठे तुझ्यावर.."सँडीच्या हातावर टाळी देत श्री उद्गारला.

कथाविरंगुळा