रुद्रम
श्वेतांबरा ही मराठीतली पहिली सिरियल आठवते. ती बघताना त्यांत अनेक त्रुटी असूनही ती उत्सुकतेने शेवटपर्यंत बघितली. फक्त, त्याचा शेवट झाल्यावर, शेवटच्या भागात जो,'अहो रुपम अहो ध्वनिम' चा कार्यक्रम झाला तो हास्यास्पद होता. पुढे फक्त दूरदर्शनची सद्दी होती तोपर्यंत अनेक चांगल्या-बर्या मालिका बघितल्या. नंतर प्रायव्हेट चॅनेल आले आणि काही बर्यापैकी सिरियल बघायला मिळाल्या. शेवटची सिरियल बघितल्याची आठवते ती 'या गोजिरवाण्या घरांत'! पण ती फारच पाणी घालून वाढवायला लागल्यावर बघणे बंद केले. त्यानंतर कुठलीही मराठी किंवा हिंदी सिरियल बघायची नाही हे ठरवून टाकले. तो नियम अगदी यावर्षीपर्यंत कटाक्षाने पाळला.