रोज ऑफिसला बुलेटवरच जातो. मनमोकळ्या स्वभावाच्या माझ्या बॉसशी ऑफिसात गप्पा मारताना सहजच म्हणालो, हैद्राबादपासून तीन-चारशे किलोमिटरच्या परिघात मी सर्वत्र बुलेटवर फिरलोय. एक स्कोडा, एक व्हॉल्वो, दोन टोयोटा आणि इतर किरकोळ, ही कौटुंबिक वापराची वाहने असलेल्या बॉसच्या डोळ्यात मनोमन कौतुक आणि (मी प्रवासाला वेळ काढू शकतो म्हणून की काय,) किंचित हेवा तरळला. त्यानं माझ्या पाठीवर थाप मारली व म्हणाला, “तू साला बहोत ऐश करता है!”
***
ऑफिसला जाताना मालकिणीला शाळेत सोडतो. तिला एक विद्यार्थी बालसुलभ-कौतुकमिश्रित-आदरानं म्हणाला “मॅडम आपके पास बुलेट है!”
***
गावाकडून हैद्राबादला खरेदीसाठी आलेल्या मित्रासोबत मीही कपडे घेतले. संध्याकाळी त्याला बसस्टॉपवर सोडून घरी परत निघालो. बंगीकॉर्डने बुलेटला सामान बांधण्यात नवीन काही नाही. कपड्यांची कॅरीबॅग पेट्रोलटाकीवर ठेवून, तिला बंगीकॉर्डने लेगगार्डला बांधून मी मोकळा झालो. बाजूच्या फूटपाथवर उभा असलेला एकजण हे सर्व पहात होता. त्याला बहुधा हा प्रकार नवीन असावा. माझी त्याच्याशी नजरानजर होताच त्याने भुवया उंचावून-मान डोलावून-मस्त स्मित देऊन मला दाद दिली.
***
प्रतिक्रिया
13 Oct 2017 - 5:26 pm | पगला गजोधर
किकवाली की ऑटोस्टार्ट वाली ?? बुलेट तुमची सर ???
13 Oct 2017 - 9:29 pm | Rahul D
आमच्या सौ चा बुलेट ला तीव्र विरोध आहे.
14 Oct 2017 - 5:28 am | Ram ram
फाड़़़़़़़फाड.....फाड़
14 Oct 2017 - 8:06 pm | मोदक
छ्या.. काय राव देशमुख, किती पोटेंशिअल आहे या विषयात आणि तुम्ही चार ओळी खरडल्यात फक्त. ;)
*******************************
आपली लहानपणीची स्वप्ने असतात... मोठे झाल्यावर हे करू.. ते करू.. माझी स्वप्ने योनेक्सच्या रॅकेटपासून ते बुलेट पर्यंत अशीच पसरलेली होती. वय वाढताना आणि नोकरीनंतर हळूच अनेक गोष्टींनी शिरकाव केला मात्र बुलेटचे स्वप्न कायम होतेच. बाईकिंग, टूर, भटकणे वगैरे गोष्टींचा विचारही येत नव्हता तेंव्हापासून बुलेट घ्यायचीच्च होती. यथावकाश फिरण्याची गोडी लागली आणि एका क्षणी "रॉयल एन्फिल्ड क्लासीक ३५० ब्लॅक" ची मागणी नोंदवली. त्या सेल्सवाल्याने "थंडरबर्ड घ्या, चांगली आहे", "दुसरा रंग घ्या - कमी वेटिंग आहे" वगैरे मुद्दे मांडून थोडे भरकटवायचा प्रयत्न केला पण मी त्याला वरचे वाक्य परत ऐकवले आणि चारच महिन्यात हिरो होंडा पॅशनच्या बाजूला काळी दिमाखदार रॉयल एन्फिल्ड उभी राहिली.
सुरूवातीचे दिवस ओळख करून घेण्याचे होते, त्या महिन्याभरात डग डग डग डग आवाजाची नशा कळाली आणि अजुनही त्या आवाजासाठी गाडी पळवावीशी वाटते..!
पहिली राईड होती ती गणपतीपुळे देवदर्शनासाठी. पुणे-सांगली मार्गे गणपतीपुळे आणि नंतर चिपळूण मार्गे परत असा प्लॅन होता. जाताना एका ठिकाणी ऊसाच्या रसामुळे असेल बहुदा पण जबरदस्त फूड पॉईझनिंग झाले आणि सांगलीत चार दिवस झोपून काढले. त्यानंतरच्याच आठवड्यात परत सांगली मार्गे गणपतीपुळ्याला गेलो. तिथून चिपळूणला येताना शॉर्टकट शोधायच्या नादात आबलोलीला गेलो. १५ किमीचा शॉर्टकट आहे असे रस्ता सांगणार्याने सांगीतले आणि फारशी न रूळलेली गाडी घेऊन मी एकटा त्या निर्जन रस्त्यावर गेलो. नवीन गाडी, नवीन रस्ता आणि तो १५ किमीचा रस्ता तब्बल ६० किमीचा निघाला. तो प्रवास ज्या धास्तीने पार पाडला ते अजून विसरू शकत नाही. पण गाडीने आजीबात दगा दिला नाही. वेडेवाकडे रस्ते, खाचखळगे आणि सुमारे दीड तास त्या रस्त्यावर मी एकटाच चाललो होतो.
नंतर या गाडीवर अनेक जवळच्या ठिकाणी भेटी दिल्या. इंदूर / रावेरखेडी हा प्रवासही झाला. नंतर वेळ होती लेह लदाखची...
तब्बल २४ दिवस हाताशी घेऊन लेह प्लॅन आखला, गाडीनेही प्रवासात थोडाफार त्रास दिला पण पुण्याहून भारताचे उत्तरेकडील टोक गाठताना जो रौद्र निसर्ग अनुभवला आणि त्या खडतर परिस्थितीतही गाडीने जी साथ दिली ती निव्वळ लाजवाब होती.
उदयपूरहून रोहतकला जाताना समोर काळ्याकुट्ट ढगांची दाटी दिसत होती त्या ढगांची विचित्र सावली जमिनीवर पडली होती आणि भरीस भर म्हणून त्यात वीजा चमकत होत्या. हे सगळे बघत बघत आंम्ही गाड्या पळवत होतो. आंम्ही उन्हातून गाडी चालवत होतो आणि समोर काळ्या ढगांची व सावलीची गुहा तयार झाली होती.. यथावकाश आंम्ही त्या गुहेत प्रवेश केला. सोसाट्याचा वारा.. अचानक कमी झालेला प्रकाश आणि प्रचंड पावसाची लक्षणे दाखवणारा विशीष्ट असा ओला वास सगळीकडे पसरला होता. आंम्ही जसेजसे त्या ढगांच्या गुहेत प्रवेश केला तसे तसे वार्याचा जोर वाढत गेला आणि एका क्षणी बुलेट+ त्यावर लादलेले आमचे सामान + आंम्ही असे पळणारे ते वजनदार धूड एका वार्याच्या झोतामुळे रस्त्याच्या एका बाजूकडून दुसर्या बाजूकडे फेकले गेले. कशीबशी गाडी कंट्रोल केली.. तशाच सोसाट्याच्या वार्यातून थोडे पुढे आलो तर पजेरो आणि फॉर्च्युनर सारख्या गाड्या इंडिकेटर लाऊन मुकाट बाजूला थांबल्या होत्या आणि आम्ही बुलेट तशाच दामटत होतो. बुलेटसारख्या गाड्या रस्त्यावरून सरकलेल्या जाणवण्याची ती पहिली आणि शेवटची वेळ.. अन्यथा त्या राक्षसी वार्यातही गाडीने व्यवस्थीत टिकाव धरला होता.
त्या वादळाची ही झलक पहा..
लेहचे रस्ते आणि बाकी वातावरणाबद्दल काय बोलावे म्हाराजा... आयुष्यभराचा ठेवा बनला आहे ती राईड म्हणजे. पुण्यापासून ते जगातील सर्वोच्च रस्त्यापर्यंत गाडी चालवणे हा एक "अनुभव" होता. पुन्हा पुन्हा घ्यावासा वाटणारा..
राजस्थानातून परत येताना कुठेतरी.. प्रचंड ऊन आणि उष्णतेपासून बचाव म्हणून ऊनाच्या झळा लागू लागल्यावर आंम्ही एखाद्या पेट्रोल पंपावर थांबत होतो. जॅकेट, ग्लोव्हज, मास्क, हेल्मेट हे गार पाण्याने भिजवायचे आणि एक दोनदा तर चक्क बुटांमध्ये पाणी भरून मग गाडी चालवत होतो. हे सगळे प्रकरण पाचव्या मिनीटाला वाळत होते हा भाग अलहिदा.. अशाच एका दिवशी आंम्ही हनुमानगड जवळ मुसळधार पावसात अडकलो.. इतका पाऊस की समोर कांही दिसतच नव्हते. मग एका प्राथमिक आरोग्य केंद्रात गाड्या लावल्या. थोड्या वेळाने बाहेर पडलो तर रस्त्यावर एक दोनशे तीनशे मीटरचा मोठा भाग पाण्याखाली होता. सुमारे दोन ते तीन फुट पाणी साठले होते. मारूती आणि इतर लहान कार बाजुला थांबल्या होत्या. पाण्यातच एक दोन हिरो होंडा बंद पडल्या होत्या. एक दोन ट्रकना पुढे जाऊ दिले आणि रस्ता नीट बघितला व अशा पाण्यात तिसर्या ट्रकच्या मागे हिय्या करून बुलेट घातली. ट्रकच्या मागच्या टायरने बाजूला केलेल्या पाण्यातून बुलेट आरामात निघून गेली..
या दीड वर्षातच पुणे ते काश्मीर आणि पुणे ते कन्याकुमारी असा प्रवास झाला आहे.. असे अनेक प्रसंग आहेत.. अनेक क्षण आहेत जेथे या गाडीचा अभिमान वाटला आहे, एक प्रकारचा सुखद भाव दाटून आला आहे आणि समाधान वाटले आहे.
15 Oct 2017 - 11:15 am | केडी
मस्त रे, ही एक इच्छा अपूर्णच आहे, बुलेट घ्यायची। घेतली तर ५०० देसर्ट स्टॉर्म किंवा क्लासिक।
16 Oct 2017 - 9:45 am | पाटीलभाऊ
हे सगळं अनुभवायचं...बुलेट सध्या तरी प्रतीक्षा यादीत आहे.
14 Oct 2017 - 9:21 pm | भ ट क्या खे ड वा ला
मूळ लेख हा निवग्री तर मोदक चा प्रतिसाद हा मोदक आहे .
(निवग्री हा उकडीचा एक पदार्थ असुन तो मोदका साठी केलेल्या उकडीत थोडे ताक , कोथिंबीर व हिरवी मिर्ची चे वाटण मिसळून करतात. आठ दहा मोदक खाल्ले कि एक दोन निवग्र्या ही छान लागतात खायला)
14 Oct 2017 - 9:51 pm | पगला गजोधर
एकदा गावाकडे ओळखीच्याकडे मुक्कामी असता, त्यांच्या दूरच्या नातेवाईकांचे, लग्नाचे आग्रही आमंत्रण मलाही होते, मी ओळखीच्या व्यक्ती कडे मुक्कामी होतो, माझ्याकडे एक नवीन ड्रेस होता, म्हटलं चला ड्रेस चं उद्घाटन करू, मी तो माझा भारिताला नवा कोरा ड्रेस घालून लग्नाला गेलो, लग्न सुरू व्हायला थोडासा अवधी होता, पण एक सटल गोष्ट माझ्या निरीक्षणात आली...
माझ्या ड्रेस त्या गावाकडच्या भागांत फारचं उठून दिसत होता, त्यामुळे कदाचित वर पक्षकडील लोक थोडी बुजली असावी...
मला आपली चूक लक्षात आली, तसाच परत, जवळील मुक्कामी घरात गेलो, तुलनेनं थोडा नेहमीचंच, परंतु लोकांच्या लग्नकार्यक्रमात घालता येईल असा ड्रेस घालून परतलो.
आता वरपक्षकडील मंडळींचा मघाचचा बुजरेपणा नाहीसा झाला.
तेव्हा जीवनातला धडा मिळाला, लग्नात किंवा वाढदिवसाला उत्सव मूर्तीच्या घरी असं ड्रेसिंग करून जावे, की लोकांना प्रश्न पडू नये... की "नक्की लग्न / वाढदिवस कोणाचाय ??"
हं आता समजा मला जर मिरवायाचंच असेल, तर मी स्वतः चा कार्यक्रम आयोजित करेन...... तिथं काय मिरवायचं ते मिरवीन...
14 Oct 2017 - 10:06 pm | मोदक
तुमचा आयडी तुम्हाला अगदीच शोभून दिसत आहे.
14 Oct 2017 - 10:37 pm | सुबोध खरे
@गजोधर
हा मोदकरावांबरोबर स्कोअर सेटलींगचा प्रयत्न वाटतो आहे.
कदाचित मी चूक असेन.
14 Oct 2017 - 10:42 pm | मोदक
डॉक,
बीग्रेडी हुजरे वेगळे काय करू शकतात..?
फाट्यावर मारा अशा लोकांना..
15 Oct 2017 - 11:03 am | धडपड्या
एक चांगले पोटेन्शियल असलेल्या लेखकाची, अशी "पींक"संप्रदायींकडे होत चाललेली वाटचाल पाहून, जेन्यूनली वाईट वाटलं....
16 Oct 2017 - 11:38 pm | शब्दबम्बाळ
त्यात वेगळं विशेष काही नाही!
आपल्या विचारसरणीच्या विरोधी विचारसरणी असणाऱ्यांना इथे ज्यांची संख्या जास्त त्यांच्याकडून अशीच वागणूक मिळते त्यात नवे काही नाही.
जरी पग यांनी खेचण्यासाठी तो प्रतिसाद टाकला असेल तरी त्यात असंसदीय काहीही नव्हतं पण इथल्या "काही" आयडींना मात्र त्या विरोधात काही बोलण्याचे स्वातंत्र्य आहे!
मग कोणी पगार काढेल, कोणी हुजरे म्हणेल, लायकी काढेल ते सगळं चालत.
कहर म्हणजे असे बोलणारे काही आयडी संक्षी किंवा इतर न आवडणाऱ्या आयडींच्या धाग्यावर किंवा प्रतिसादांवर भोचक टिप्पणी करताना दिसले असतीलच. पण तेच कोणी आपल्यावर केलं कि सहन होत नाही.
14 Oct 2017 - 10:10 pm | धडपड्या
आपल्या प्रतिक्रियेचं प्रयोजन समजलं नाही...
नेमकं काय म्हणायचं आहे, ते स्पष्ट केलंत, तर बरं होईल...
15 Oct 2017 - 6:41 am | इरसाल कार्टं
मीही हेच म्हणेन. अखिर काहीना क्या चाहतेही भाई?
आणि हो, लेख आणि मोदकाचा प्रतिसाद दोन्हीही आवडेश.
14 Oct 2017 - 10:50 pm | अमर विश्वास
नव्या बुलेट बद्दल अभिनंदन .. आणि बुलेट फॅन क्लब मध्ये स्वागत
आता एक लांब ट्रिप काढा ... साऊथ मध्येच जायचं असेल तर मधुमलई मार्गे उटी किंवा डायरेक्ट वायनाड गाठा :)
15 Oct 2017 - 8:09 am | डॉ श्रीहास
१२ वर्षांपुर्वीची गोष्ट .... मी माझी थंडरबर्डवर सिग्नलवर थांबलो असतांना बाजूच्या स्पेंडरवर बसेल्या माणसानी विचारलं "कितना देती है ?" .... मी शांतपणे उत्तरलो " बहोत .... खुशी देती है।" ..... त्यामाणसाचा चेहरा बघून मजा आली होती ;))
15 Oct 2017 - 10:48 am | धडपड्या
हा हा हा हा हा.....
15 Oct 2017 - 3:56 pm | वामन देशमुख
प्रतिसादकांचे आभार.
@ मोदक
तुमच्या ढ्यँ ढ्यँ ढ्यँ प्रतिसादापुढे मी अजून काय लिहिणार! तुम्ही लोक हां हां म्हणता प्रतिसाद-लेख-लेखमालारूपी ताजमहलं उभे करता आणि आम्ही पामर कधीतरी दोन-चार विटा जोडून बारकेसारके धागे काढतो!
मनातले सर्वच विचार-भाव-भावना शब्दात मांडणं नेहमीच शक्य होईल असं नाही, There are many slips between a lip and... another one!
@ अमर विश्वास
धन्यवाद, तथापि ही माझ्या घरातील पहिली बुलेट नाहीय, हम तो पैदाइशी बुलेट क्लब में हैं!
माझ्या नव्या बुलेटवर स्वार होऊन वर्ष उलटून गेलं पण अजूनही (मधुचंद्र संपणं तर सोडाच, पण) नववधूचा हात हातात धरून नुकताच लग्नमंडपातून बाहेर पडतोय असं वाटतंय, प्रिय रॉली, जीवनातली गाडी ही अशीच राहू दे!
15 Oct 2017 - 9:15 pm | गामा पैलवान
पगला गजोधर,
तुमचा इथला किस्सा वाचला. कपडे बदलण्यासाठी तुम्ही जवळच्या मुक्कामावर जाऊन सभ्यतेचे नवे आदर्श प्रस्थापित केलेत याबद्दल अभिनंदन. आम्हांस जशी नंगानाच घालायची सवय आहे तशी तुम्हांस दिसंत नाही.
तुमच्या :- जीवनात ही घडी अशीच राहू दे
आमच्या :- जीवनात ही खोडी अशीच राहू दे.
आ.न.,
-गा.पै.
15 Oct 2017 - 11:53 pm | चामुंडराय
व्वा वामनराव मस्त लेख आणि त्यावर मोदकरावांचा प्रतिसाद म्हणजे अगदी आयसिंग ऑन द केक !!
बुलेट प्रेमी परंतु सीडी १०० वर समाधान मानणारा चामुंडराय....
या निमित्ताने तुमच्या जीवनातली गाडी ही अशीच राहू दे! साठी माझे टू सेंट्स
जीवनात ही गाडी अशीच राहू दे
तिच्यासवे हा प्रवास असाच चालू दे ॥धृ॥
बघतो मी नित्य रूप तिचे देखणे
आवडते वेडीला मजसवे पळणे
रस्त्यावरची ही साथ अशीच राहू दे ॥१॥
ढ्यँ ढ्यँ तुला ऐकण्याचा छंद आगळा
स्वार होऊनि दौडण्याचा आनंद वेगळा
वेगाने पळवून तुज मन धुंद होऊ दे ॥२॥
पाहू दे असेच तुला नित्य पळता
जाऊ दे रस्ता मागे वेगे धावता
तुज साथ जीवनगीत धन्य होऊ दे ॥३॥.
जीवनात ही गाडी अशीच राहू दे
तिच्यासवे हा प्रवास असाच चालू दे ॥धृ॥
हे दोन सेंट्स मोदकरावांच्या धाग्यावर घेऊन जायचा मोह आवरत नाहीय्ये.
16 Oct 2017 - 12:31 pm | मोदक
व्वा बुवा..!!
16 Oct 2017 - 1:25 pm | यमगर्निकर
एक नं .......... खतरनाक..
16 Oct 2017 - 10:19 am | मराठी_माणूस
दुसरी बाजु: खुप लोकांची तक्रार "irritating noise". एव्हढा मोठा आवाज हा तांत्रिक दोष आहे का ?
16 Oct 2017 - 11:01 am | कपिलमुनी
मूळ सायलेन्सर बदलून मुद्दम मोठ्या आवाजाचा सायलेन्सर टाकतात त्यामुळे मोठा आवाज येतो.
16 Oct 2017 - 12:23 pm | मोदक
तांत्रीक दोष नाहीत, ते बेकायदेशीर बदल आहेत.
पोलीसांचे तिकडे लक्ष गेले आहे व कारवाई सुरू झाली आहे. हे एक चांगले आहे.
16 Oct 2017 - 10:51 am | सुबोध खरे
https://www.rushlane.com/royal-enfield-owners-loud-exhausts-12156719.html
बुलेट गाडीच्या कंपनीने दिलेल्या सायलेन्सरमुळे आवाज "प्रमाणात" असतो पण बरेचसे लोक "जमाने को दिखाना है" या मनोवृत्तीतून त्यातील आवाज कंमी करणारी "मफलर" हि छोटीशी नळी काढून टाकतात किंवा बाहेरुन कानठळ्या बसवणारा आवाज करणारा दुसरा सायलेन्सर बसवून घेतात. रात्रीच्या शांत वेळेस हा आवाज फारच कानठळ्या बसवणारा असतो.
या दोन्ही गोष्टी बेकायदेशीर आहेत. या विरुद्ध कालपासून पोलिसांनी कार्यवाही चालू केलेली आहे. वरील दुवा पाहून घ्या.
16 Oct 2017 - 11:17 am | मराठी_माणूस
ह्यातले खालील वाक्य बरेच काही सांगुन जाते.
While Bullet owners think owning an Enfield Bullet and modifying its sound as a status symbol, they are oblivious to the sound disturbance it causes.
16 Oct 2017 - 11:29 am | अभ्या..
आधी शंभरात एखादी असायची बुलेट. उलट्या गिअर अन ब्रेक सिस्टममुळे, स्टार्टिंग मेथडमुळे आणि अवजडपणामुळे बुलेट वापरणार्याकडे वेगळ्याच आदराने पाहिले जायचे. सुरुवातीला तर धनाढ्य शेतकरी, भव्य अन वजनदार माणसे, आर्मी आणि फौजदार ह्यांचेच प्रस्थ बुलेट वापरणार्यात होते. पुण्यामुंबईत काही गिनेचुने लोक सोडले तर सर्रास बुलेटला नाके मुरडली जायची. आता परत क्रेझ वाढली. बुलेट सिंपल आणि हलकी झाली, बटनस्टार्ट झाली, अॅव्हरेज ही द्यायला लागली. आजकाल काय कुणीहि उठून घेते आता बुलेट. टपोरी गुंठामंत्र्याचे चमचे अन कॉलेजची पोरे वापरायली बुलेट. त्यात अशा शो आयटमवर दाबून पॅकेजवाल्यांची नजर पडली. मग व्हाटसप फेसबुकवर मिरवायला मस्त खेळणे सापडले. लग्न करुन इमाने इतबारे कुलु मनाली फोटो अपलोड करणारे अन बुलेट घेऊन लेहलदाखचे तोरणी झेंडे मिरवणारे ह्यात काडीचाही फरक वाटत नाही. कीव येते पाहून ते.
16 Oct 2017 - 11:37 am | पगला गजोधर
अभ्या, सद्यपरिस्थितिचा किमान शब्दात कमाल पिट्टा पडला रे !
16 Oct 2017 - 12:15 pm | मोदक
अरेरे.. खूपच अधोगती झाली म्हणायची एका उज्वल परंपरेची..
आपल्याला अशी गाडी बाळगणे झेपत नसल्याने नित्यनियमाने दुसर्यावर कीव करणारे प्रतिसाद देणार्या मनोवृत्तीची दया येणेही बंद झाले आहे.
(द्राक्षे आंबटच असतात हे पुन्हा नव्याने अनुभवलेला) मोदक.
16 Oct 2017 - 1:39 pm | यमगर्निकर
हा प्रतिसाद वाचून संकुचित विचारसरणीची किव आली, जगात अशीपण लोक असू शकतात?
16 Oct 2017 - 3:09 pm | हेमंत८२
खरे आहे... एके काली उलट्या गियर असणारी बुलेट वापरली होती पण आता बघायला मिळते ते वर्णन एकदम अचूक शब्दात मांडले आहे.
संकुचीत विचारसरणी नाही हे वास्तव आहे आणि ते थोडे स्वीकारले तर बरे होईल..
16 Oct 2017 - 3:28 pm | पगला गजोधर
बरोबर आहे, एकदा हायवेला एक बुलेटवाला फ्फुल स्पीडने ओव्हर टेक करून गेला , माझी कार साधारण ८० किमीप्रता असावी ...
पुढे कामतच्या धाब्यावर आलो ब्रेक घेण्यासाठी, तिथं तो मगांचाच बुलेटवाला..... , मी चहा घेता घेता संभाषण करताना म्हटलं.. "साहेब काय फुल्ल रेसिंगने गाडी चालवता हो हायवेवर, कमाल आहे !", त्यावर तो खुश होऊन म्हणाला " मग बुलेटचा मी चाहता आहे.... " वैगरे वैगरे ....
यावर एक गोष्ट लक्षात आली .... बऱ्याच लोकांना "क्रुझर" व "रेसर" कन्सेप्ट बद्दल आनंदी आनंद असतो...
क्रुझर कॅटेगरीतल्या गाड्या सुद्धा रेसर सारख्या दामटवंताना पाहून , बिचार्या क्रूझरची दया आली...
16 Oct 2017 - 6:51 pm | अभ्या..
संकुचित बिंकुचित काय नाय. सातवीला असल्यापासून बुलेट शिकलोय. तीही जुनी एन्फिल्ड माचिस्मो. ७ वर्षे अगदी व्यवस्थित भरपूर वापरलेली आहे. अजुनही घरात आहे. त्यावेळी होते कौतुक. मलाहि भारी वाटायचे. सगळे देशभर फिरुन बिरुन झाल्यावर, काहि गाड्या मॉडिफाय करायचे ते करुन झाल्यावरच हे लिहतोय. सध्याची सुध्दा सीबीजी ९वी बाईक आहे. बुलेटपेक्षा चांगला पर्फॉर्मन्स देणार्या खूप बाईक अॅव्हेलेबल आहेत. सध्याच्या बुलेटचा इमोशनल इश्श्यु करणारे लेटेस्ट बाटगा जोरात बांग देतो ह्यापेक्षा जास्त काही वेगळे नाही इतकेच माहीत आहे.
आणि @खरे साहेब, ह्यात जहरी टिका बिका काही नाही. आहे ते वास्तव सांगितले. ती वाक्ये झोंबली असेल तर तुम्हाला झोंबायचे कारणच नाही कारण तुम्ही उनिकॉर्नचे चाहते आहात माहीत आहे.
16 Oct 2017 - 7:09 pm | पगला गजोधर
काय राव ७-७ वर्ष बुलेट चालवता तेही जुनी (दंडवत घ्या )अन एकही धागा नै ??
परवडणे हा इस्सू नव्हता तर तुमच्या बाबतीत, आणि द्राक्षांची चवही न्यारीच असेल नं ?
17 Oct 2017 - 6:42 pm | सुबोध खरे
अभ्या शेट
मला बुलेट अजिबात आवडत नाही. या गाड्या बऱ्यापैकी कालबाह्य ( आणि येझदी सुद्धा अजिबात आवडत नाही ती तर ३० वर्षांपूर्वीच पूर्ण कालबाह्य झाली होती). या दोन्ही गाड्यातील कमतरता सहज पणे दाखवता येतील.
त्यातून मी जानेवारीतच बजाज ची डॉमिनार ४०० हि मोटार सायकल घेतली आहे जिची शक्ती ३४ अश्वशक्ती इतकी आहे.(बुलेट ५०० ची शक्ती ३० अश्वशक्ती एवढी आहे आणि बुलेट ३५० ची १९ अश्व शक्ती) या गाडी वर मी सध्याच तशी १२० किमी पर्यंत दौड केली.आपल्या कडील राष्ट्रीय हमरस्ता अगदी रिकामा होता तरी( रविवार सकाळ साडे सहा वाजता) यापेक्षा जास्त वेग वाढवण्याची माझी छाती झाली नाही. आमच्या गटातील एका पट्ठ्याने १८८ किमी तशी वेगाने हि गाडी हाणली त्याचा फोटो हि आहे माझ्याकडे. मी पण बुलेट बऱ्याच वर्षापासून आणि बऱ्याच वेळेस चालवली आहे आणि ती गाडी जवळच्या ( शहरात रहदारीत चालवणे किंवा वळवणे फार त्रासदायक आहे) किंवा लांबच्या सहलीस (हादऱ्यांमुळे हात बधिर होतात आणि आवाजाने कान किटून जातात) अजिबात आरामदायक नाही. हा माझा वैयक्तिक अनुभव आहे. त्यामुळे ती वाक्ये मला झोंबण्याचे काहीच कारण नाही.
माझा मुद्दा एकच आहे.
एखादी गोष्ट मी करत नाही म्हणजे ती करणारे लोक मूर्खच आहेत हे म्हणण्याचा मला काय हक्क आहे? (जोवर त्याचा त्यांच्या आप्तेष्टाना किंवा जनतेला त्रास होत नाही तोवर).
बाकी सर्व शब्दांचा खेळ आहे.
16 Oct 2017 - 12:44 pm | अमर विश्वास
याआधीही सोन्याबापु यांच्या बुलेट वरील एव्हरग्रीन धाग्यावर बरीच चर्चा झाली आहे ...
तरीहि येथे काही थोडे ...
बुलेट चा सायलेन्सर बदलून आवाज वाढवणे हे अयोग्यच आहे ... सालेन्सर असा बदलावा कि व्हॉल्युम कमी होईल पण आवाजाची प्रत सुधारेल (हे माझे वैयक्तिक मत )
तसेच बुलेट घेऊन लेह लडाख ला जाण्याविषयी ... ज्यांनी हा अनुभव घेतला आहे ... त्यांना अधिक काही सांगायची गरज नाही ,, ते भेटतीलच परत केंव्हातरी अशाच सफरीवर ...
ज्यांनी हा अनुभव घेतलेला नाही त्यांच्यासाठी बस एव्हडेच ...
लुत्फमें तुझसे क्या कहु नादाँ
हाय कम्बख्त ,, तूने पी ही नहीं
16 Oct 2017 - 1:50 pm | मोदक
बुलेट चा सायलेन्सर बदलून आवाज वाढवणे हे अयोग्यच आहे ... सालेन्सर असा बदलावा कि व्हॉल्युम कमी होईल पण आवाजाची प्रत सुधारेल (हे माझे वैयक्तिक मत )
पण मुळात सायलेन्सर किंवा अन्य कोणताही कंपनीने दिलेला भाग बदलू नये. लोकं जास्ती क्षमतेचे लाईट लावतात, बल्ब बदलून हॅलोजन वाले बल्ब लावतात हे चुकीचे वाटते. कंपनीने वायरींग करताना या लोडचा विचार केला असेलच असे नाही त्यामुळे असे बदल करू नयेत असे स्पष्ट मत आहे.
हँडल, सीट वगैरे बदलाचा गाडीच्या इंजिन / वायरींगवर लोड येत नसल्याने तो निर्णय आपला आपण घ्यावा.
16 Oct 2017 - 2:28 pm | अमर विश्वास
मोदकभाऊ
शक्यतो फॅक्टरी फिटेड पार्टस बदलू नयेत मान्य .. पण जर हौस असेल तर ..
मी स्वत: बुलेट ७ वर्षे कोणताही बदल न करता वापरली आहे.. तसेच २५ वर्षे जुनी यझदी विकत घेऊन तो मॉडिफाय पण केली आहे ..
अगदी इंजिन रिबोरिंग करून ओव्हरसाईझ पिस्टन टाकण्यापासून सर्व गोष्टी बदलल्या :)
दोनोका अपना अपना मझा होता है :)
16 Oct 2017 - 2:45 pm | मोदक
२५ वर्षे जुनी यझदी विकत घेऊन तो मॉडिफाय पण केली आहे ..अगदी इंजिन रिबोरिंग करून ओव्हरसाईझ पिस्टन टाकण्यापासून सर्व गोष्टी बदलल्या :)
याबद्दल अधिक लिहा की राव.. असे काहीतरी आतापर्यंत कधीच केलेले नाही.
16 Oct 2017 - 3:33 pm | कपिलमुनी
अधिक फोटो सहीत वाचायल आवडेल !
वैयक्तीक अनुभवानुसार अशा गाड्यांची रीलायबिलिटी आणि स्पेयर ची उपलब्धता कमी असते.
हौस म्हणून लोकल रनिंगला थीक आहे
16 Oct 2017 - 5:09 pm | अमर विश्वास
जुनी यझदी ...
मी इंजिनीरिंगला असताना हे उद्योग केले होते ..वीस वर्षांपूर्वी ...
मेकॅनिकल ला होतो .. त्याचा केलेला सर्वोत्तम उपयोग ... (अर्थात एका मित्राबरोबर)
जुनी गाडी घेऊन चालू केली ... आणि टप्प्याटप्याने मॉडिफाय केली (पैसे जमतील तसे )
जवळ जवळ २ वर्षे हा प्रोजेक्ट चालू होता ..
आज आठवतायत त्या गोष्टी :
१. इंजिन बोअर करून मोठा पिस्टन टाकला (CC वाढले पण ऍव्हरेज ची वाट लागली )
२. गिअरबॉक्स तीच वापरली कारण एकही गिअर टकला झाला नव्हता ... फक्त क्लीन करून असेंबल केली
३. क्लच ओव्हरहौल केला (हा मात्र मेकॅनिक कडून) प्लेट्स बदलल्या (OEM मेड )
४. हॅन्डल बार बदलला .. आत्ताच्या थंडरबर्ड सारखा .. थोडा अजून मोठा आर्क असलेला .. एक स्टील पाईप घेऊन तो शॉप मध्ये वाकवला .. हा बॅलन्स करायला फार त्रास झाला .. अनेक वेळा ट्रायल - एरर मेथीद वापरली .. शेवटी मध्ये एक पट्टी वेल्ड केली
५. सायलेन्सर बदलला .. त्या वेळचा लॉन्ग बॉटल .. विथ ऍडिशनल ग्लासवूल
६. चाक ... फक्त बॅलन्सिंग केले व क्रोम प्लेटिंग केले
७, सीट .. अनेक प्रयोग केले .. करायला सोपे व कमी खर्च .. शेवटी चालवणाऱ्याला बॅक रेस्ट दिले ...
८. पेंटींग : मडगार्ड क्रोम प्लेटेड .. बाकी गाडी मरून रंगात हँड पेन्टेड ...
त्यावेळचे फोटो मिळाले तर बघतो.. फारसे नसावेत .. असतील तर स्कॅन करतो
ही गाडी नंतर दोन वर्ष वापरली ... नोकरीला लागल्यावर यामाहा RX घेतली व ही विकली ..
पण हे दोन वर्षांची प्रोसेस फार मस्त होती ..
16 Oct 2017 - 5:14 pm | पगला गजोधर
यामाहा RX विकणार का ?
16 Oct 2017 - 9:18 pm | अमर विश्वास
दहा वर्षांपूर्वी ;बुलेट घेतली तेंव्हाच RX विकलीहो (मावसभावालाच दिली )
16 Oct 2017 - 1:33 pm | सुबोध खरे
बुलेट हि गाडी तांत्रिक दृष्ट्या अद्ययावत नाही. पण ती घेणारे लोक आपल्या "हृदयाची हाक"( किंवा हौस म्हणा वा लहानपणापासून असलेले स्वप्न म्हणा) ऐकून विकत घेत असतात. त्यांच्या या भावनेचा आदर असावा असे माझे मत आहे त्यामुळे त्यावर जहरी टीका करणे हि चूक आहे असे मला वाटते.
मी काही लडाखला बुलेट वर जाणार नाही( फार कशाला मी बुलेट विकतही घेणार नाही).
पण म्हणून जे लोक अशा साहसी सहली काढतात ते चूक आहेत किंवा मूर्ख आहेत असे म्हणण्याचा मला कोणता अधिकार पोचतो?
म्हणजे भर पावसात सुखाचा जीव दु:खात टाकून( असे माझ्या सारख्या बऱ्याच आळशी लोकांचे मत आहे) रात्री सह्याद्रीच्या कडे कोपऱ्यात ट्रेक करणारे लोक पण आहेत कि.त्यांना त्यात अतीव आनंद वाटतो हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे.
एखादी गोष्ट मी करत नाही म्हणजे ती करणारे लोक मूर्ख आहेत हे म्हणण्याचा मला काय हक्क आहे?
16 Oct 2017 - 3:18 pm | संग्राम
मी आधीही कुठे तरी लिहलं आहे ..... एखाद्याचा एखाद्या गोष्टीकडे बघण्याचा दृष्टीकोण त्याची मते ठरवतो .... "सर्वचं नाही" पण हे तत्व बर्याच गोष्टींना लागू होते
16 Oct 2017 - 1:36 pm | सुबोध खरे
अर्थात बुलेट चा कंपनीने दिलेला मूळ ( कमी/ माफक आवाजाचा) सायलेन्सर बदलून ठणाणा वाजणारा सायलेन्सर लावून आवाज प्रदूषण आणि जनतेची झोप मोड करणाऱ्यांचा मात्र मी निषेधच करतो. आपल्या आनंदाचा दुसऱ्याला त्रास होऊ नये अशा मताचा मी आहे.
16 Oct 2017 - 5:53 pm | अमरेंद्र बाहुबली
प्रत्येकाची आवड वेगळी!
![.](//s1.postimg.org/9emw6d0pfj/IMG_20160904_103804.jpg)
![.](https://s1.postimg.org/8jsoxfdz9b/FB_IMG_15081550608565896.jpg)
माझ्या काकांच गँरेज आहे. ते mahindra classic सारख्या अनेक जीप्स modify करतात.
मी ही स्थिरस्थावर झाल्यावर एक mahindra classic बनवून घेणार आहे.
हे काकांच्या गाडीचे काही फोटो
16 Oct 2017 - 9:19 pm | अमर विश्वास
मस्त .. महिंद्रा थार झिंदाबाद
16 Oct 2017 - 7:14 pm | मोदक
बरं मंडळी.. विनाकारण ट्रोल करणार्या संकुचित मनोवृत्तीच्या लोकांना फाट्यावर मारा आणि मूळ विषयाकडे या. ;)
16 Oct 2017 - 9:08 pm | mayu4u
सायकल चालवायला जास्त मजा येते! :D
16 Oct 2017 - 9:10 pm | केडी
+100
16 Oct 2017 - 9:29 pm | मोदक
+1000
विशेषतः ट्रॅफिक मध्ये ;)
16 Oct 2017 - 11:52 pm | पगला गजोधर
विशेषतः तीन चाकी
17 Oct 2017 - 12:00 am | मोदक
असेल ब्वा, आम्ही आमच्या वयानुसार मोठ्या सायकली चालवतो. तुम्ही तुमच्या बालबुद्धीनुसार तीन चाकी सायकल चालवा.
या धाग्यावर तुमच्याकडे दुर्लक्ष केले असताना विनाकारण स्कोअर सेटल करून / विषयांतर करून स्वत:ची सडकी मनोवृती दाखवण्यापेक्षा बरीच चांगली कामे करू शकता. तुमच्याकडून इतक्या साध्या गोष्टीची अपेक्षा करणे चुकीचे असेल कदाचित पण एक सहज सुचवतो आहे.
22 May 2018 - 10:11 am | गावठी फिलॉसॉफर
माज्यकडे palsar 220 आहे..... गावाकडे यातील फार कमी बाईक असतात..... लोंकांचा पहिला प्रश्न हाच असत की किती देते.
यांना काय घेणं देणं असत???? कधी कधी हक्काने सांगतात इकडे सोड, तिकडे सोड..... वरून अव्हरेज कमी म्हणून हिनावतात सुद्धा.... पण कधी 50 रु टाकत नाही( यांनी टाकावे म्हणून तर घेतली नाहीच)
22 May 2018 - 10:35 am | धर्मराजमुटके
सहमत ! वरुन स्वतःकडे सायकल नसली तरी बजाज ला रिसेल व्हॅल्यू नसल्याचे अॅनालिसिस ऐकवतात ते वेगळेच :)