एक अनावृत्त(छी! अश्लिल!) पत्र

पुंबा's picture
पुंबा in जनातलं, मनातलं
14 Nov 2017 - 8:05 am

रवि, अरे काय नाव ठेवलंस बाबा सिनेमाचं? न्युड? अरे! केवढं हे अश्लैल्य? 'दिगंबर' वगैरे सात्विक, शुचिर्भूत नाव ठेवलं असतंस तर चाललं असतं(हा आपला लेखकाचा कल्पनाविलास बर्का! दिगंबर नाव ठेवलं असतं तर उभा चिरला असता डायरेक्टरला). छे छे! संस्कृती बुडाली. (च्यामारी!(च्या आणि मारी दोन्हीही पतंजलीचे बर्का!) ह्या संस्कृतीला पोहायला शिकवले पाहिजे. सारखी बुडते. पण पोहायला शिकवायचं म्हणजे स्विमिंग कॉश्च्युम, आणखी अश्लैल्य! छे छे!!) 'न्युड'पणाचं आपल्या संस्कृतीला फार वावडं. कुंभमेळ्यात कधी दिसलाय न्युड साधू? कधीच नाही. आहे कुठला बुवा, महाराज अर्धन्युड? अंह! अरे, आम्ही जन्माला आलो तेव्हा सुद्धा न्युड नव्हतो, खाकी चड्डी, पांढरा सद्रा, माकडटोपी आणि गळ्यात ॲंटी- अश्लैल्य कवच असा सगळा जामानिमा घेऊनच आम्ही या जगती प्रवेश करते झालो. या कवचात अश्लैल्य डिटेक्ट करणारी नॅनो चिप आहे हे तुला म्हणून सांगतो. ह्या चिपमुळे तर आम्ही चित्रपट न बघता चित्रपटातील अश्लैल्य शोधून काढतो, नुसत्या नावावरून संस्कृती किती फूट बुडणार हे सांगू शकतो. हार्दिक पटेल अन संजय जोशी यांच्यासारख्या पाप्यांच्या क्लिपा काढून त्यांचे अश्लैल्य जगासमोर आणतो. या जगतीचे सारे अश्लैल्य दूर करून १२५ कोटी बालमने प्रदुषीत होण्यापासून वाचवणे हे तर आमचे जिवितध्येय. हे ध्येय मनी धरून तर आमचे बापट रात्रीचा दिवस करू करू क्लिपा बघतात. कर्नाटकात तर मंत्री विधानसभेत डोळ्याच्या खाचा होईपर्यंत पॉर्न बघतात. ध्येय एकच: सारे अश्लैल्य नष्ट करणे. अरे, बघितल्याशिवाय कळणार कसे किती अश्लिल आहे ते! असो. चित्रपट काढताय? जरूर काढा. पण त्याला पतंजलीच्या गोमुत्र स्कॅनरमधून स्कॅन करणे क्रमप्राप्त असेल हे लक्षात राहू द्या म्हणजे झालं.
चला, निघतो. अजून दहा क्लिपातलं अश्लैल्य शोधायचंय.
---श्री नाना लाजाळू, ॲंटी अश्लैल्य स्क्वाड, पुणे ३०

विनोदराजकारणमौजमजाचित्रपटप्रकटनविरंगुळा

प्रतिक्रिया

babu b's picture

14 Nov 2017 - 9:56 am | babu b

छान

सुबोध खरे's picture

14 Nov 2017 - 10:27 am | सुबोध खरे

काही जमलं नाही!

फुकटच्या वाइफाइचा उपयोग काय करणार?

बाबू, सुबोध खरे, लेख वाचून अभिप्राय दिल्याबद्दल धन्यवाद.
कंजूसकाका, लेख गंडलाय, फालतू आहे, किंवा खरे म्हटले तसे जमला नाही म्हटले असते तर ठीक होतं.
वायफाय कशाला काढताय? आणि तो फुकट आहे याची खात्री कशी एवढी?

अभिजीत अवलिया's picture

14 Nov 2017 - 1:48 pm | अभिजीत अवलिया

कंजूसकाकांंचा प्रतिसाद मंंत्र्यांंसाठी असावा.

पुंबा's picture

15 Nov 2017 - 11:43 am | पुंबा

हा!! असू शकतं तसंच.
उगाच गडबड केली. ;)

गामा पैलवान's picture

14 Nov 2017 - 1:38 pm | गामा पैलवान

पुंबा,

मग प्रवास कसा झाला? एकदम ठीकठाक? रस्त्याला किती वळणं होती? खड्डे, खाचखोचा फारशा नव्हत्या ना? सहप्रवासी बरेच होते वाटतं? नाय म्हणजे तुम्ही सदरा, चड्डी, टोपी वगैरे साग्रसंगीत पोशाखात या जागी अवतरलात. म्हणून उपरोक्त प्रश्न पडले.

आ.न.,
-गा.पै.

साहेब तुमची अँटी अश्लैल्य कवचाची नक्की व्याख्या काय बरें...... आपण ते घेऊनच प्रवेश करते झाले.......

सूड's picture

14 Nov 2017 - 4:23 pm | सूड

नक्की काय झालंय?

हा चित्रपट चित्रकलेच्या न्यूड फिगरेटिव्ह प्रकाराला केंद्रस्थानी ठेवून काही मांडू पाहतो आहे असे प्रथमदर्शनी दिसतेय. चित्रपट पाहिल्यावरच तो नेमका कशावर आहे हे कळेल. सर्वात आधी ह्या विषयावर चित्रपट आणि तोही मराठीतून काढायचं धाडस केल्याबद्दल दिग्दर्शक रवी जाधव यांचे अभिनंदन. आणि चित्रपट न पाहताच केवळ नावात नग्नता आहे म्हणून तो इफ्फीत न दाखवण्याचा निर्णय घेणाऱ्या माहिती व प्रसारण मंत्रालयाचा निषेध.

राही's picture

15 Nov 2017 - 7:12 am | राही

अगदी सहमत.
लेखाच्या आशयाशी पूर्ण सहमत.
कोणीतरी हे लिहायला हवेच होते.

रामपुरी's picture

15 Nov 2017 - 3:49 am | रामपुरी

"खाकी चड्डी, पांढरा सद्रा, माकडटोपी "
आणखी एक अजेंडाधारी अवतरलेले दिसतात.
चालू द्या...

राही's picture

15 Nov 2017 - 7:29 am | राही

अहो असे कित्येक ' अजेंडाधारी' कानाकोपऱ्यात आहेत अजूनही. आणि अनेक स्वच्छतादिन पाळूनही त्यांची ' सफाई' होऊ शकलेली नाहीय. काय करणार! झाडू आणखी जोरात फिरवावा लागणार बहुतेक. काय करणार!

राही's picture

15 Nov 2017 - 7:40 am | राही

अहो असे कित्येक ' अजेंडाधारी' कानाकोपऱ्यात आहेत अजूनही. आणि अनेक स्वच्छतादिन पाळूनही त्यांची ' सफाई' होऊ शकलेली नाहीय. काय करणार! झाडू आणखी जोरात फिरवावा लागणार बहुतेक. काय करणार!

शब्दबम्बाळ's picture

15 Nov 2017 - 6:55 am | शब्दबम्बाळ

विषय इथं मांडल्याबद्दल धन्यवाद!
हल्ली हि संस्कृतीविषयक नाटक फारच वाढत चालली आहेत! काही जणांना ठेका मिळालाय जणू रक्षण करायचा...
या सिनेमाने महोत्सवाची सुरुवात होणार होती! हा मान पहिल्यांदा मिळणार होता मराठीला पण चित्रपटाचं नाव काही पटलं नाही वाटत मंत्र्यांना!
डायरेक्त्त काढूनच टाकला यादीमधून... कोण म्हणतंय नावात काय आहे म्हणून! इथे बघा... आपल्या रेझ्युमे मध्ये लिहितील कशी संस्कृती वाचवली ते!

तिकडे कोणीतरी राजपूत म्हणून विरोध करतायत भन्साळीला, आता अजून एक राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त मराठी चित्रपट "दशक्रिया" ला ब्राम्हण महासंघाने विरोध केलाय म्हणे! परंपरांचा अपमान केला म्हणून!
हि बातमी

हा समांतर सेन्सर बोर्ड तयार होतोय त्याला वेळीच आवरायला पाहिजे नाहीतर चारचौघात मोकळेपणाने विचार मांडणेही मुश्किल करून ठेवतील पुढे.
आता काही लोकांना नेहमीप्रमाणे हि सरकारविरोधी मते असल्यामुळे या अभिव्यक्तीच्या पोकळ बाता वाटतीलही पण निदान अजून तरी या गोष्टी मांडता येत आहेत त्यामुळे थोडं सहन करावं लागेल त्यांना... :)

राही's picture

15 Nov 2017 - 7:22 am | राही

मराठी कलासृष्टी ही नेहमीच प्रयोगशील राहिलेली आहे. मराठी सिनेमा मध्यंतरी काही वर्षे त्याच त्याच वळणावर अडकून राहिला होता. आता कुठे नव्या वाटा चोखाळायला सुरुवात झाली होती तो हे विघ्न.
मराठी कलाजगताची हानी झाली आहे हे नक्की.

मराठी_माणूस's picture

15 Nov 2017 - 10:47 am | मराठी_माणूस

https://mumbaimirror.indiatimes.com/entertainment/bollywood/after-s-durg...
ह्या बातमीत एका ठीकाणी असे म्हटले आहे की ज्युरींनीच ही फिल्म अपुर्ण आहे असे मत दीले होते.

एसभौ, राहीताई, शब्दबंबाळभौ,
धन्यवाद.
या विषयाचे गांभिर्य लोकांच्या लक्षात येत नाहीये अजूनही. ज्या चित्रपटाची निवड ज्युरींनी चित्रपट पाहून केली होती त्याला माहिती व प्रसारण मंत्रालयाने सेन्सॉर करणे तेदेखिल कसलेही कारण न देता हे गैर आहे. कायद्याच्या दृष्टीने आणि एकूणच सरकार या संस्थेकडून जे दायित्व अपेक्षित असते तिचा अधिक्षेप करणारे देखिल. आम्ही काय वाट्टेल ती अभिव्यक्ति अडवू शकतो, त्यासाठी कसले कारण देण्यास आम्ही बाध्य नाही ही भुमिका घेणारे अ‍ॅडमिनिस्ट्रेशन लोकशाहीत कसे काय असू शकते?

सुमित्रा भावे- सुनिल सुखटणकर यांनी आपला चित्रपट या महोत्सवातून माघारे घेतला, इतरही कलावंत पुढे येत आहेत. आपण मराठी माणसे मात्र रवि जाधव यांना म्हणावा असा पाठींबा देत नाही आहोत. आणि हे आपल्या हजारो वर्षांपासून रसरशीत पणे जोपासलेल्या कलाविषयक जाणीवांच्या र्‍हासाचे सुचक आहे असे मला वाटते.

मराठी कथालेखक's picture

15 Nov 2017 - 12:33 pm | मराठी कथालेखक

सहमत.. समांतर सेन्सॉर नसावेच. शिवाय महोत्सवात मंत्र्यांनी ढवढवळा करु नये. नाहीतर ज्युरी नेमण्याला अर्थच उरत नाही.

सोमणांवर बहिष्कार घालून निषेध करण्याची सक्ती आजिबात केली जाऊ नये. त्यांना आपली निर्मिती लोकांपर्यंत पोहोचण्याचा आनंद मिळायला हवा.

मराठी कथालेखक's picture

15 Nov 2017 - 5:13 pm | मराठी कथालेखक

सहमत...तसंही प्रश्न अजून चिघळवण्यात अर्थ नाही.

मराठी_माणूस's picture

15 Nov 2017 - 8:09 pm | मराठी_माणूस

आपण मराठी माणसे मात्र रवि जाधव यांना म्हणावा असा पाठींबा देत नाही आहोत.

http://epaper.timesgroup.com/Olive/ODN/TimesOfIndia/#

त्या मल्याळ्ळी फिल्म ला पण काही पाठींबा मिळत नाहीय्ये असे म्हटले आहे.

मराठी कथालेखक's picture

15 Nov 2017 - 12:29 pm | मराठी कथालेखक

चांगलं लिहिलंय ..
एक सल्ला द्यावासा वाटतोय, बघा पटतो का.संदर्भासाठी एक तळटीप देवून त्यात एखाद्या बातमीची लिंक दिली असतीत किंवा बातमीच थोडक्यात सांगितलीत तर प्रसंगानुरुप लिहिलेल्या या लेखाला पुर्णत्व लाभलं असतं.. सगळ्याच बातम्या वाचनात/बघण्यात येत नाहीत ना...शिवाय लेख जरी वर्तमानातल्या घडामोडींबद्दल असला तरी भविष्यातही तो वाचला गेल्यास वाचकाला संदर्भ लागून लेख पुर्ण कळेल त्याचा आनंद मिळेल असे मला वाटते. वरील एक दोन प्रतिसादांमुळे संदर्भ ध्यानात आला पण प्रतिसादांशिवायही लेखाला पुर्णत्व असावं म्हणून ही सूचना.
धन्यवाद.

गामा पैलवान's picture

15 Nov 2017 - 1:30 pm | गामा पैलवान

म.क., अहो काहीतरीच काय! लेखकाला वाटतं की आपण स्वत: जसे सर्वज्ञ आहोत तसेच वाचकसुद्धा हवेत. मग कंपू बनवायला सोपं जातं.
आ.न.,
-गा.पै.

पुंबा's picture

15 Nov 2017 - 3:02 pm | पुंबा

बाकी काहीही म्हणा पण सर्वज्ञतेचा आरोप नका करू. आमच्या असीम अज्ञानाची कल्पना आहे आम्हाला. कंपू बनवण्यात स्वारस्य नाही. तुम्ही इतके पिसाळून जाऊन लिहिताना पहिल्यांदाच पाहत आहे. काय झालंय नक्की?

बरोबर आहे. संदर्भ द्यायला हवा होता. मोबाईलवरून टंकल्यामुळे राहिले लिंक द्यायचे. धन्यवाद.

गामा पैलवान's picture

15 Nov 2017 - 1:34 pm | गामा पैलवान

राही,

मराठी सिनेमा मध्यंतरी काही वर्षे त्याच त्याच वळणावर अडकून राहिला होता. आता कुठे नव्या वाटा चोखाळायला सुरुवात झाली होती तो हे विघ्न.

यासंबंधी काही विदा व/वा पुरावा असल्यास कृपया सादर करावा. तसंच दशक्रिया व न्यूड या दोन चित्रपटांमुळे मराठी कलाजगताचं काय पोषण झालं असतं हे ही समजावून सांगावं ही विनंती.

आ.न.,
-गा.पै.

मराठी कथालेखक's picture

15 Nov 2017 - 5:17 pm | मराठी कथालेखक

मी मिपावरही अशीच संकुचित मनोवृत्तीची आणि पक्षपाती सेन्सॉरशिप अनुभवली आहे.. मी लिहिलेले एक विडंबन मला कोणतीही सूचना/ कारण न देता उखडले गेले होते.

श्रीगुरुजी's picture

15 Nov 2017 - 6:25 pm | श्रीगुरुजी

‘न्यूड’ हा सिनेमा सेन्सॉरच झालेला नाही. सिनेमा प्रदर्शित करण्याआधी १६ तारखेच्या आत त्यांना सिनेमाची सेन्सॉर कॉपी द्यायची असते हा गेल्या अनेक वर्षांपासूनचा हा ‘इफ्फी’चा नियम आहे. रवी जाधव यांचा हा सिनेमा सेन्सॉरच न झाल्यामुळे आम्ही कोणत्या आधारावर केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाला निषेध करायचा? याशिवाय दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे महोत्सवातील ज्युरींकडून या सिनेमाची निवड करण्यात आली होती आणि केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाकडून याचा विरोध करण्यात आला, असे अधिकृत पत्र मिळालेले नाही. अशी कोणतीही कागदपत्रे नसताना लोकं परस्पर नावं घेत आहेत. सिनेमा महोत्सवात प्रदर्शित करण्यापूर्वी तो सेन्सॉर असावा, अशा प्रतीवर आम्हा सर्व निर्मात्यांची स्वाक्षरी घेतली जाते. या प्रतीवर रवी जाधव यांच्याकडूनही स्वाक्षरी घेतली गेली असणार, असेही त्यांनी सांगितले.

https://www.loksatta.com/manoranjan-news/yogesh-soman-marathi-director-p...

कपिलमुनी's picture

15 Nov 2017 - 9:03 pm | कपिलमुनी

Since the 2016 edition of IFFI uncensored films are allowed to be screened in film festivals. However, the producers of such uncensored films need to get an “exemption certificate” from the Ministry which was denied in the case of both the films, while 11 others in the list of 26 were granted the same.

आणि एस दुर्गा मामी मध्ये प्रदर्शित झाला होता आणि त्यांच्याकडे सेन्सॉर चा सर्टिफिकेट पण आहे , तरीदेखील अधिक्षेप करून वगळला आहे.

पुंबा,

तुम्ही इतके पिसाळून जाऊन लिहिताना पहिल्यांदाच पाहत आहे. काय झालंय नक्की?

खाकी चड्डी, पांढरा सद्रा, माकडटोपी आणि गळ्यात ॲंटी- अश्लैल्य कवच हे सगळं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला उद्देशून आहे ना?

आ.न.,
-गा.पै.

Duishen's picture

17 Nov 2017 - 7:24 pm | Duishen

हा प्रसंग कदाचित पुपुल जयकर यांच्या इंदिरा गांधी पुस्तकात वाचल्याचा स्मरतोय. १९७१ साली पाकिस्तान सोबत करार करतांना जन. माणेक शाॅ यांना तो करार उचित वाटला नाही. आपण त्यावेळेस पाकिस्तानी हद्दीत मुसंडी मारली होती पण इंदिरा गांधी करीत असलेला करार उचित नाही असे त्यांना वाटले. त्यांनी आर्मी दिल्लीत उतरवली. यावर इंदिरा गांधी बैचैन झाल्या. त्यांना वाटले की जन. माणेक शाॅ आपली सत्ता उलथवणार का? त्यांनी जन. माणेक शाॅ यांना बोलावून घेतले. बैठक काहीच मिनिटे चालली. इंदिरा गांधीनी त्यांना दिल्लीतील रस्त्यावर सैनिक उतरण्याविषयी विचारले. त्यावेळेस त्यांचे बाणेदार उत्तर होते - "माझे नाक तुमच्या नाकापेक्षा मोठे आहे पण मी इतरांच्या कामात नाक खुपसत नाही."

प्रसंग आठवण्याचे कारण की जिथे नाकच नाही अशीही मंडळी / मंत्रालय नको तिथे नाक खुपसत आहे. ही प्रवृत्ती भारताला महागात पडणार आहे. मंत्रालयाला नाक खुपसण्याचा अधिकार नाही. नुसता "न्यूड" असे चित्रपटाला नाव दिल्यामुळे हजारो वर्षाची संस्कृती धोक्यात येणार असेल तर ती संस्कृती किती तकलादू आहे असे लक्षात येते.

सालदार's picture

17 Nov 2017 - 8:00 pm | सालदार

लेखाशी प्रचंड सहमत!
बाकी मर्मावर बोट थेवलं की लोक चेकाळनारच...

गामा पैलवान's picture

18 Nov 2017 - 2:46 am | गामा पैलवान

Duishen,

नुसता "न्यूड" असे चित्रपटाला नाव दिल्यामुळे हजारो वर्षाची संस्कृती धोक्यात येणार असेल तर ती संस्कृती किती तकलादू आहे असे लक्षात येते.

नुसता एक चित्रपट महोत्सवातून माघारी बोलावल्याने भभिव्यक्तीस्वातंत्र्य धोक्यात येणार असेल तर ते भभिव्यक्तीस्वातंत्र्य किती तकलादू आहे ते लक्षात येतं.

आ.न.,
-गा.पै.

नाखु's picture

20 Nov 2017 - 10:32 pm | नाखु

त्या आडून रा स्व संघाबद्दल ओकार्या काढता येतातच, कंड नाही शमला तरी पित्तदोष कमी होवो हिच सदिच्छा

बादरायण संबंध लावुन भरताड लिखाणाला फक्त चोपलं पाहीजे

शब्दबम्बाळ's picture

21 Nov 2017 - 12:37 am | शब्दबम्बाळ

ओकाऱ्या काढणारे काढत असतील पण आपली का जळजळ होतेय पण इतकी?
काही तरी घ्या म्हणजे बर वाटेल!
रा स्व संघ काय आभाळातून पडलाय का टीका न करायला त्याच्यावर? असो... इथे असेही जास्त लिहून फायदा नाही म्हणा...
शमवा तुमचा तुम्ही...

मराठी कथालेखक's picture

22 Nov 2017 - 1:26 pm | मराठी कथालेखक

रा स्व संघ काय आभाळातून पडलाय का टीका न करायला त्याच्यावर?

एखाद्या संघटनेवर, व्यक्तीवर टीका करणे म्हणजे काही पाप नाही.