ऑफिसचा पहिला दिवस.
मस्तपैकी लवकर उठलो...अंघोळ वगैरे आटपून कपड्यांना इस्त्री केली...मग घातले! फॉर्मल शर्ट... इन केला. नवा चेरीचा डबा फोडून बुटपॉलिश उरकलं.
सकाळी ऑफिसात पायधूळ झटकणारा पहिलाच एम्प्लॉयी. कुठे बसायचं माहित नसल्याने रिसेप्शनला सोफ्यावर रेलून मॅगझीन चाळत बसलो.
ऑफिसबॉयने इंटरव्हयूला पाहिलेलं मला. ओळखून हसला, म्हणाला, "काय घेणार सर?" मी खूषच, ऐटीत, "काय मिळत आपल्या ऑफिसात?"
एखाद्या सराईत वेटरसारखा तो उत्तरला...,
"सिनियर्सची अरेरावी,
ज्युनिअर्सची कामचुकारी,
दुपारी जेवल्यानंतरच्या चर्चा,
त्यातून रोज नवा वाद,
परदेशवास्तव्याची आस,
दिवसाची दिवास्वप्नं,
रिइम्बर्समेंटचे क्लेम्स,
नवेनवे ईएमआय,
अप्रेझलच राजकारण,
काम संपल्यावर नवीन काम,
वर बॉसच्या शिव्या!...
... तुम्हांला काय हवंय?"
"दिमाग का दही... नको आणू आता, झालंय ऑलरेडी!"
- संदीप चांदणे
प्रतिक्रिया
28 Sep 2017 - 6:13 pm | औरंगजेब
भारी....
28 Sep 2017 - 6:38 pm | दुर्गविहारी
हा हा हा. आजचा दिवसच मस्त गेला. तिकडे शिल्लक दुधाचा आणि विडंबनाचा धागा वाचतोय तोपर्यंत तुम्ही दिमागचे दही केले.
29 Sep 2017 - 10:27 am | Ram ram
नकारात्मकता, दुसरं काय. चश्मा बदलो.
29 Sep 2017 - 11:12 am | अनन्त्_यात्री
मिपावर दूधदुभतं भरपूर आहे हल्ली ! :)
29 Sep 2017 - 12:17 pm | राघव
हा हा हा.. मस्त! :-)
29 Sep 2017 - 12:45 pm | चांदणे संदीप
@ सासं, कृपया लेखाच्या शीर्षकात "शतशब्दकथा" ऍडवता येईल का?
धन्यवाद,
Sandy
29 Sep 2017 - 1:05 pm | अभ्या..
चांदणे संदीप लिहिसी
लोणी ते ताकातले
29 Sep 2017 - 3:31 pm | एस
भेंडी! :-)
29 Sep 2017 - 9:01 pm | डॉ सुहास म्हात्रे
खी खी खी !