दोसतार - १२
मागील दुवा https://www.misalpav.com/node/42737
शाळेची घंटा हे प्रकटन संपायचीच जणू वाट पहात असावी. तास संपला. शाळा सुटली.
आठवड्यापुरती का होईना पुस्तकांची काळजी मिटली होते. अर्थात आम्हाला कोणालाच ही काळजी पडली नव्हती. हा भाग वेगळा....
मागील दुवा https://www.misalpav.com/node/42737
शाळेची घंटा हे प्रकटन संपायचीच जणू वाट पहात असावी. तास संपला. शाळा सुटली.
आठवड्यापुरती का होईना पुस्तकांची काळजी मिटली होते. अर्थात आम्हाला कोणालाच ही काळजी पडली नव्हती. हा भाग वेगळा....
मेघा आणि शर्मिष्ठाचा आतेभाऊ एकमेकांकडे टक लावून पहात असतात अगदि भान हरपून, इतकं की त्यांना भोवतालच्या जगाचा विसर पडतो.
"अरे काय पाहतोयस असा वेड्यासारखा?" शर्मिष्ठेच्या प्रश्नाने दोघेही भानावर आले.
" अग काही नाही . पण तू कितीवेळ करतीयेस? केव्हाचा थांबलोय मी? जायचयं ना आपल्याला आज पुण्याला? तुझं नटनं मुरडणं झालं असेल तर निघायच का ?" आपण पकडले गेलो म्हणून तो मनातून ओशाळला होता, पण त्याचा तसूभरही लवलेश चेहर्यावर जाणवू न देता उलट शर्मिष्ठेवर प्रश्नांची सरबत्ती चालू केली. ह्या सगळ्यात मेघावर चोरून कटाक्ष टाकायला मात्र विसरला नाही हं.
गोखले काकूंना पेढे देऊन मेघा घरी परतत होती तोच तिच्या लक्षात आले की " अरेच्चा शर्मिष्ठेच्या घरी पेढे द्यायला तर विसरलेच की मी. काय वेंधळी आहे ना मी!" स्वत:शीच बडबडत मेघा आपल्या प्रिय बालमैत्रिण म्हणजेच शर्मिष्ठाच्या घराकडे वळली.
" नलू काकू, शमू आहात का घरी?" दरवाज्यातून हाका मारत मेघा शर्मिष्ठाच्या घरात शिरली.
दिवाणखाण्यातून आत जाताना काहितरी अस्पष्ठ कुजबूज तिच्या कानी पडली पण त्याकडे दुर्लक्ष करत ती माजघरात गेली तोच खमंग तळणाचा वास तिच्या नाकात शिरला.
" अहाहा काय खमंग वास दरवळतोय नलू काकू! काय तळताय चकल्या का?"
रोज सकाळी बागेत फिरायला जायचे म्हणून पाचचा कर्कश गजर लावते पण गजर ऐकून परत बंद करून एखादी डुलकी काढावी वाटतेच मग सकाळी सकाळी जाता येत नाहीच . मग सव्वा सातला बागेत पाऊल पडते . गेट समोरच एक कारंज्या आहे . त्याचा सरसर आवाज येत असतो . पण काही केल्या हा आवाज मला शब्दात पकडता येतच नाही म्हणून "सरसर" हा शब्द शोधला मी . तिथून पुढे गेले कि बऱ्याचशे लोक गोलाकार उभे असतात . आणि त्यांचा हे हे हु हु हो हो चाललेले असते . त्यांची हि ह ची बाराखडी किती किती वळणे घेते .
अ का पेला - A cappella
हे नाव तसे जुनेच म्हणजे १५ व्या शतका पासून अस्तित्वात आहे. इटालियन भाषेतील हे नाव म्हणजे प्रार्थनेचे गाणे कुठल्याही वाद्याशिवाय एकटयाने किंवा समूहाने म्हणायचे असते. तसेही आपल्या संस्कृती मध्ये प्रार्थनेचे पाठ कुठल्याही वाद्याशिवाय म्हणले जातात.
हंबीरराव,बहिर्जी आणि बहादूरखान कोकलताश
मागील दुवा https://www.misalpav.com/node/42660
सर भारताच्या क्रिकेट टीम मधे असते तर अशा अचूक नेमबाजी मुळे सरानी पॅव्हलीयन मधूनही बरोब्बर चेंडू फेकून बॅट्समनला सहज रनाऊट केलं असतं . ते या शाळेत शिक्षक म्हणून चुकून आले असावेत.
प्रिय अन्नपूर्णा,
जसे शहरात अपार्टमेंट, तसे किचनमध्ये आम्ही. एकावरएक चार, पाच, सहा किंवा आणखी कितीही मजली. तुझ्या choice प्रमाणे. घरातील माणसांच्या संख्येवर लोक माझी खरेदी करतात. तुझ्या घरात आमचे सहा मजले आहेत. पण तू त्यातलेही एक दोन काढून ठेवतेस. म्हणतेस, ‘घरात इतकी कमी माणसे, कशाला सगळे मजले चढवत बसा?’ मग आमच्यातला वरचा मजला काढून ठेवतेस किंवा रिकामा तरी ठेवतेस. मग उरलेल्या सगळ्यांना कुकरमध्ये बसवतेस. आम्ही सहसा बाहेर येतो, ते सुट्टीच्या दिवशी. तो दिवस आमच्या outing चा.
मागील दुवा https://misalpav.com/node/42617
आईने तीच्या हातातला पुडा पिशवीत ठेवला. या शेंगा बाबाना . तो पुडा तुला. मी पुड्यातल्या चार गरम शेंगा काढून आईला दिल्या. आईने माझ्या हातातला पुडा किती गरम आहे याचा अंदाज घेतला आणि तो माझ्या शर्टच्या खिशात उपडा केला.
अर्धवट भिजलेल्या शर्ट मुळे वाजणारी थंडी त्या खिशातल्या गरम शेंगानी एकदम पार पळवून लावली.
पुढच्या आठवड्यात पुस्तंक आली आहेत का ते पहायला यायचं ते पाऊस येणार आहे हे बघूनच. हे ठरवूनच टाकले.
मध्यंतरी एका स्पर्धेत एक आठवणीचा किस्सा पाठवला होता त्याला बक्षिस मिळाल्याचे आज कळले... अॅड गिमिक असावे असे दिसते कारण बक्षिस नक्की काय ते गुलदस्तात आहे...! तो इंग्रजीत होता... कधी वेळ मिळाला तर मराठीत लिहायचा प्रयत्न करेन....