"शिळा"लेख....
आमच्या कडे कधीच शिळ उरत नाही.
कारण ज्या दिवशी जेवण मला आवडतं ते अन्न तिला आवडत नाही, आणि तिला आवडलेलं मी पोटभर खाऊ शकत नाही.
आठवड्यातले तीन दिवस कोणीतरी एक पोटापेक्षा जास्त खाऊन तृप्त असतो तर उरलेले तीन दिवस दुसरा, कारण स्वयंपाक सरासरी एक दिवसाआड चांगला बनवला जातो.
अर्थात माझ्या दृष्टीने उत्तम म्हणजे तिच्या दृष्टीने बेचव ह्या व्याख्येप्रमाणे.
आठवड्याचे उरलेले तीन दिवस मी कमी जेवतो याची दोन कारणे, एक म्हणजे आमची अन्नपूर्णा इतकी देखील वाईट स्वयंपाकिण नाही की पूर्ण उपाशी राहावे लागेल. आणि दुसरं म्हणजे मला आवडलेलं तिने खाल्लं तर तिचं मन कसं भरेल?