साठा उत्तरांची कहाणी

अनन्त्_यात्री's picture
अनन्त्_यात्री in जनातलं, मनातलं
17 Apr 2018 - 7:34 pm

एक टिनपाट महानगर होतं
तिथं एक आय्-डी होता
हा आय्-डी कसा होता?
विद्वज्जड, विचारवंत, साक्षेपी, प्रत्युत्पन्नमति इ.इ.
त्याचा दिवस कसा जायचा?
सक्काळी सक्काळी कायप्पावर इधरका माल उधर सर्कवायचा
लंच टायमात एका संस्थळावर काही अभ्यासपूर्ण टंकायचा
काॅफी ब्रेकात दुसर्‍या संस्थळी थोडा साक्षेपी पिंकायचा
परतीच्या घामट ट्रॅफिक जॅमात पाठथोपट्या प्रतिसादकांस धन्यवादायचा अन् पायखेच्या प्रतिसादकांना हेडाॅन भिडायचा.

एकदा काय झालं?
जरी सबकुछ होतं झिंगालाला तरी वैचारिक वैफल्य आलं बिचार्‍याला.

या वैफल्यानं काय झालं?
त्यास आंजावैराग्य आलं
आंजावैराग्याची लक्षणे कोणती?
तो टंकेना की पिंकेना
समस्त स्क्रीनांकडे तो पाठ फिरवू लागला.
दगडामातीच्या, हाडामासाच्या जगात २४x७ वायफायरहित जगायचं स्वप्न बघू लागला.
त्याच्या घंटो मिटल्या लॅपटाॅपची बिजाग्रं बिघडली.
त्याच्या मिनिटोमिनीट बंद चलाखफोनावर कोळीष्टकं जमली.
अनरेड कायप्पा पोष्टींनी सहस्रक ओलांडलं.

विचारवंताचं हे कडकनाथ वैराग्य देखून इकडे समाजमाध्यमेशांची तंतरली.
झुक्याची झोप उडाली
पिचई पेचात पडला
गेट्स गडबडला
संस्थळमालक सटपटले
"आज एकास पण उदईक समग्र विचारवंतांस समाजमाध्यमांप्रति ऐसे शुकवैराग्य आले तर आपल्या जगड्व्याळ पोटा-पसार्‍यांचे काय?" ही कुशंका त्यांस पोखरू लागली.

समाजमाध्यमेश सत्वर मिटींगले.
दूतास रदबदलीस पाठविण्याचे मुकर्रर केले.

दूत विचारवंतादारी पोहोचून
त्यास विनविता झाला,
"एकडाव, फक्त एकडाव अमुकअमुक सायटीवर डोळेझाक लाॅगिना.
समाधान न पाविल्यास बंद्यास बेशक बे-सीपीयु करा"

विचारवंत द्रवले.
अमुकअमुक सायटीवर डोळेझाक लाॅगिनले.
डोळे उघडतात तो काय?
सभोवती वरती खालती लखलख आरशांची खडी
आरशाआरशातून खुणावणारे स्वत:चेच जुने आय् डी
विचारवंत दिपले पण क्षणात सावरले.
एकेक आरशात पाहते झाले.
...निरागस, उथळ, भावुक, रसिक, आक्रमक, तत्वज्ञ...
विस्मृतीत गाडलेले माझे इतके उत्क्रांतीटप्पे येकगठ्ठा?
विचारवंत गुंग झाले,
क्षणभर नोस्टाल्जिले,
जुन्या आय्-डींच्या नजरपहार्‍यात सांप्रतच्या आय्-डी ला शाबूत राखण्यात आंजाव्यग्र झाले.
मग जगड्व्याळ मायासुरी जाळ्यात नकळत गुंतत गेले,

ग्रहण सुटले, वैराग्य सरले, विचारवंत आभासी रूटीनात पुनश्च आकंठ रुतले,
समाजमाध्यमेश सुटकेचा सुस्कारा सोडते जाहले.

ही साठा उत्तरांची कहाणी पाचा उत्तरी......

मुक्तकमाध्यमवेधविरंगुळा

प्रतिक्रिया

एस's picture

17 Apr 2018 - 8:49 pm | एस

:-)

डॉ सुहास म्हात्रे's picture

17 Apr 2018 - 8:56 pm | डॉ सुहास म्हात्रे

=)) =))

रुपी's picture

18 Apr 2018 - 1:23 am | रुपी

लै भारी =)

चित्रगुप्त's picture

18 Apr 2018 - 4:16 am | चित्रगुप्त

मस्त.

सस्नेह's picture

18 Apr 2018 - 9:41 am | सस्नेह

=)) =))
बेक्कार भारी

आंजाचा आधुनिकशब्दकोश च सादर केलात जणू.
अप्रतिम.
मराठी मायमावलीने मांडीवर घेतलय तुम्हाला.

वरुण मोहिते's picture

18 Apr 2018 - 10:06 am | वरुण मोहिते

भारी.

माहितगार's picture

18 Apr 2018 - 10:15 am | माहितगार

=)) भारी आवडेश :)

पुंबा's picture

18 Apr 2018 - 12:33 pm | पुंबा

जबरदस्त..

अनन्त्_यात्री's picture

19 Apr 2018 - 9:27 am | अनन्त्_यात्री

सर्व मिपाकरांचे मन:पूर्वक आभार!

पैसा's picture

19 Apr 2018 - 9:40 am | पैसा

:)

अनन्त्_यात्री's picture

20 Apr 2018 - 5:17 pm | अनन्त्_यात्री

_/\_

.

आगाऊपणा बद्दल आगाऊ माफी

अटीतटीने आपापले राजकीय एजंडे राबवणाऱ्या सगळ्या मिपाकरांना समर्पित!!

अनन्त्_यात्री's picture

22 Apr 2018 - 8:51 pm | अनन्त्_यात्री

व्यंगचित्र आवडलं !

जेम्स वांड's picture

23 Apr 2018 - 12:14 pm | जेम्स वांड

हल्ली असे आयडी छाटून निवडून वेचून जमा करतोय, कारण त्यांच्याशिवाय आमचा 'कुठल्याही आनंदावर उत्तम विरजण घालून देऊ' हा छंद पुरा होऊ शकणार नाहीये. लब्धप्रतिष्ठित जनतेला इंटरनेटवर जिंकल्याचा सुखद अनुभव तरी का घेऊ द्यावा म्हणतो मी!, प्रसंगी उत्तम विरजण घालायलाच हवे.

अनन्त्_यात्री's picture

23 Apr 2018 - 12:26 pm | अनन्त्_यात्री

:)

मदनबाण's picture

22 Apr 2018 - 10:36 pm | मदनबाण

हा.हा.हा... =))

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Wakhra Swag | Official Video | Navv Inder feat. Badshah |

अनन्त्_यात्री's picture

23 Apr 2018 - 11:15 am | अनन्त्_यात्री

_/\_

नाखु's picture

23 Apr 2018 - 1:50 pm | नाखु

फक्त ही कहाणी कुठल्या चतुर्मासात उ(प)द्यापीत करावी ते सांगा म्हणजे बरे!!!

अखिल मिपा एक तर वसा घेऊ नये घेतला तर टाकू नये या संघ्याच्या अधिक मास की मात या समितीच्या वतीने नम्र विनंती

अनन्त्_यात्री's picture

23 Apr 2018 - 4:25 pm | अनन्त्_यात्री

_/\_ ! पृच्छा कळली.
काय म्यां पामरे बोलावी उत्तरे?