३१ डिसेंबर (विज्ञान कथा)
या वर्षीच्या (२०१८) "संवाद" या दिवाळी अंकात छापून आलेली माझी विज्ञान कथा !!
(निमिष सोनार)
दिनांक: 31 डिसेंबर, युरोपातील एका भूमिगत प्रयोगशाळेत -
"डॉक्टर कोहेन, खरं तर मी वेळ ही गोष्ट लांबी, रुंदी आणि उंची याप्रमाणे एक मिती आहे हे मानत नाही. वेळ ही मानवाने निर्माण केलेली गोष्ट आहे. घडलेल्या घटना क्रमाने स्मरणात ठेवण्यासाठी. पण काळ, अंतर आणि वेग यांच्यातल्या गुणोत्तराचा वापर मात्र मी वेगवान प्रवासासाठी करून घेणार आहे!', शास्त्रज्ञ डॉ. रमण म्हणाले.