माय गे माय...
सक्काळपासूनच्या कौतुकाने हरखलेली माय मराठी दमून भागून जरा ओसरीवर टेकली.
डोक्यावरचं संदेशांचं, भाषणांचं, योजनांचं ओझं उतरवलं.
गळ्यातले हारतुरे काढून बाजुला ठेवले.
पिशवीतला श्रीखंडाच्या गोळ्यांचा डब्बा पुन्हा घडवंचीवर ठेवत पुटपुटली,
"एवढा मोठा सोहोळा झाला ,सगळी पोरं जमली पण नातवंडं काही भेटली नाहीत. "