नमस्कार मंडळी!
दर वर्षी कुसुमाग्रजांच्या जन्मदिवशी, म्हणजे २७ फेब्रुवारीला जागतिक मराठी दिन साजरा होतो. मिपावरही कमी-अधिक प्रमाणात दर वर्षी काही उपक्रम केले जातात. गेली २ वर्षे आपण मराठी भाषा दिनानिमित्त बोलीभाषा सप्ताह साजरा केला आणि त्याला उदंड प्रतिसाद मिळाला होता. काही काही अगदी अपरिचित बोलींमधील लिखाणही प्रकाशित झाले होते. तसेच आंतरजालावर हा अभिनव उपक्रम असल्याने वृत्तपत्रातही त्याची दखल घेतली गेली होती.
प्रमाणभाषेबरोबरच पुढच्या पिढ्यांना बोलीभाषेची ओळख असली पाहिजे. बोलीभाषांचे जतन संवर्धन करणे ही त्यासाठी आपली जबाबदारी आहे. २१ फेब्रुवारी हा जागतिक मातृभाषा दिन म्हणून साजरा केला जातो. या दोन्हीचे औचित्य साधून यावर्षीही येत्या आठवड्यात आपण विविध बोलीभाषांमध्ये थोडेतरी लिहू-वाचू या.
या वर्षी २७ फेब्रुवारी पासून मिपा सदस्यांचे विशेषत्वाने बोलीभाषांमधील किंवा बोलीभाषांसंबंधी लिखाण, कविता, कथा, कादंबर्या, लघुकादंबर्या, दीर्घकथा, लेख किंवा मराठी भाषेचा इतिहास, भाषेसंदर्भात इतर काही लिखाण मिपावरून प्रकाशित केले जातील. या उपक्रमासाठीचे आपले आपापल्या बोलीभाषातील किंवा बोलीभाषा संबंधित किंवा प्रमाण मराठी संदर्भात लिखाण प्रशांत, किंवा पैसा या आयडींना व्यनिद्वारे पाठवावे, ही विनंती. लिखाण यापूर्वी कुठेही प्रकाशित झालेले नसावे. आपले लिखाण २७/२८ फेब्रुवारीपर्यंत कृपया पाठवावे.
सर्वांना लिखाणासाठी शुभेच्छा!
धन्यवाद!
प्रतिक्रिया
19 Feb 2018 - 3:02 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
प्रशांतसेठ, मस्त उपक्रम. लवकरच बोली भाषेतील कविता पाठविण्यात येतील.
लव यू प्रशांतसेठ.... बाय द वे, तुमच्या वाट्सपवर कविता स्वीकारता का ? की व्यनी मनीच्या पत्त्यावरच पाठवू. उत्तराच्या प्रतिक्षेत.
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
(आपलाच मिपाकर)
21 Feb 2018 - 10:18 am | कलंत्री
खरेच विचार व्हावा.
19 Feb 2018 - 3:06 pm | पद्मावति
वाह, मस्तच!
19 Feb 2018 - 3:28 pm | डॉ सुहास म्हात्रे
सुंदर, स्पृहणिय उपक्रम ! त्याच्या यशस्वितेसाठी अनेकानेक शुभेच्छा ! उत्तमोत्तम लेख व कवितांची प्रतिक्षा आहे !!
20 Feb 2018 - 6:52 am | प्रचेतस
उत्तमोत्तम लेखांची वाट पाहात आहे.
20 Feb 2018 - 10:47 am | किसन शिंदे
उत्तमोत्तम लेखनांच्या प्रतिक्षेत.
20 Feb 2018 - 5:09 pm | सस्नेह
मागील दोन वर्षासारख्याच मेजवानी च्या प्रतिक्षेत !
21 Feb 2018 - 12:01 pm | रामदास२९
स्तुत्य उपक्रम.. हार्दिक शुभेच्छा ..
23 Feb 2018 - 8:08 pm | नाखु
शुभेच्छा
मिपाकर नाखु
24 Feb 2018 - 4:21 am | निशाचर
उत्तम लेखनाच्या प्रतिक्षेत
25 Feb 2018 - 4:16 pm | शशिधर केळकर
नमस्कार!
प्रमाण भाषेत लिहिलेली अनुवादित कथा चालेल का? बोलीभाषेवर भर आहे म्हणून विचारले.
धन्यवाद!
27 Feb 2018 - 10:04 am | पैसा
फक्त बोलीभाषाच नव्हे, मराठीत लिहिलेलेसुद्धा वाचूया.