विचार
सिनेमागृहातल्या अंधाराच समाजशास्त्र आणि मानसशास्त्र
'गुलाबजाम ' मधली राधा आगरकर जेंव्हा जेंव्हा vulnerable असते तेंव्हा तेंव्हा चित्रपटगृहात जाऊन बसत असते . तिला रणबीर कपूर आवडत असतो हे एक कारण झालंच . पण माझा असा अंदाज आहे की सिनेमागृहातला तो विशिष्ट अंधार तिला comforting वाटत असणार नक्कीच . तो अंधार तिला काही तासांपुरता का होईना तिच्या वेदना पुरून टाकण्यास मदत करत असणार . थियेटरमधला अंधार ही प्रचंड टेम्पटिंग गोष्ट असते . अंधाराच्या पण जातकुळी असतात . माजघरातला अंधार , दिवे गेल्यावर होणारा अंधार , निर्मनुष्य शेतातला अंधार ह्या सगळ्या अंधाराच्या जातकुळी वेगवेगळ्या आहेत . अंधार हा बहुतेकवेळा भयानक आणि काहीवेळा प्रचंड सुंदर असतो .
कुतुबमिनार परिसरातील लोहस्तंभ - मूल स्थान इत्यादि - लेख २.
चन्द्रगुप्त विक्रमादित्याच्या विष्णुभक्तीचा आणखी स्पष्ट पुरावा पाहण्यासाठी आपणास सध्याच्या मध्य प्रदेशातील विदिशा गावाच्या (२३० ३१' ७९.९" उत्तर, ७७० ४८' ३५.३" पूर्व) जवळच पश्चिम दिशेकडे २-३ कि.मी. वर असलेल्या ’उदयगिरि’ नामक छोटया टेकडीकडे जावे लागेल. हा पुरावा पाहण्यापूर्वी ’उदयगिरी’चा परिचय करून घेऊ.
कुतुबमिनार परिसरातील लोहस्तंभ - मूल स्थान इत्यादि - लेख १
दिल्लीला भेट देणारा प्रत्येक प्रवासी, प्रख्यात कुतुब मिनार, त्याच्याजवळील कुव्वत-उल-इस्लाम ही आता पडझड झालेली मशीद आणि तिच्या प्रांगणातील लोहस्तंभाला भेट दिल्याशिवाय राहात नाही. ह्यांपैकी कुतुब मिनार आणि मशीद ह्यांचा इतिहास पुरेसा स्पष्ट आहे, परन्तु लोहस्तंभाकडे पाहून त्याच्या मनात अनेक प्रश्न उभे राहतात. हा स्तंभ कोणी आणि का निर्माण केला, तो पहिल्यापासून येथेच आहे की आधी तो अन्य कोठे होता आणि तेथून येथे आणला गेला आहे, अन्य अनेक स्तंभांप्रमाणे हाहि बाहेरून येथे आणला गेला असेल तर त्याचे मूळ स्थान काय असावे ह्याविषयी तो विचार करू लागतो.
एकाच माळेचे मणी
विकेंडला बऱ्यापैकी युट्युबवर व्हीडिओ पाहत असते, मग जे काही ब्राउज लिस्ट मध्ये येईल ते पाहत असते, बऱ्यापैकी माहिती मिळते, नवीन काहीतरी सापडते.
पाच वर्षे झाली घरी टीव्ही नसल्याने करमणूक म्हणून पुस्तके आणि नेट वरच्या माहितीचा आधार मिळतो . तर सांगण्याचा मुद्दा असा कि, पाहता पाहता एका बाईंचा व्हीडिओ पहिला, त्या खूप जोरजोराने माईक समोर ओरडत होत्या. समोर अपार जनसमुदाय ऐकत होता . कोणी बाई इतक्या लोकांसमोर बोलत असल्या कि माझा उत्साहाला उधान येते त्यामुळे मग पुढे ऐकत राहिले.
आयुष्य म्हणजे काय रे भाऊ?...
एकंदरीत काहीतरी philosophical लिहायचा मूड झाला आज. सोसायटीची मीटिंग झाली. त्याच त्याच चर्चा, तेच तेच विषय.. आयुष्यात नाईलाजास्तव करावी लागणारी कुठली गोष्ट असेल तर ती म्हणजे आपण राहतो त्या सोसायटी च्या कमिटी मध्ये काम करणं. परमेश्वर सगळी सुखं हात जोडून समोर उभी येऊ देत नाही. म्हणून जेव्हा आनंदाने मनस्वी जगायचं ठरवलं तेव्हा परमेश्वर म्हणाला थांब. अजून हिशेब चुकते करायचेत तुझ्या पापांचे. आणि मग मी सोसायटी चा सचिव झालो.
चार्ली चाप्लीन – प्रत्यक्षाहून प्रतिमा उत्कट!
कोहम्
मी व्यक्तीशः या पृथ्वीवर का आलो? येऊन नक्की काय करायचा प्रयत्न करतोय? मी नसतो आलो इथे तर या पृथ्वीमध्ये म्हणा किंवा कोणाच्याही आयुष्यात म्हणा काय फरक पडला असता? जर आपण निमित्तमात्र आहोत आणि आपली दोरी त्या विधात्याच्या हातात आहे (आठवा तो आनंद सिनेमातला राजेश खन्ना चा प्रसिद्ध डायलॉग!) तर तुम नही तो कोई और सही असं म्हणून परमेश्वराने दुसऱ्या कोणाकडून तरी कामे करवून घेतली असती. म्हणजे थोडक्यात मदाय्राने दोरीने बांधलेल्या माकडासारखी माझी अवस्था आहे तर. असे काही बाही विचार हल्ली माझ्या डोक्यात येत असतात. कदाचित चाळीशी उलटल्याचा हा परिणाम असावा किंवा हल्ली म्हातारचळ लवकर सुरु होत असावा.
गर्दीमधले एकटेपण
माणसांचा घोळका आजूबाजूला असतो. आपली (म्हणजे केवळ नात्याने आपली. ती खरोखरंच आपली असतात का हे कोडंच!) म्हटलेली माणसं आपल्या जवळ असतात. सोशल मिडिया वर शे-दोनशे माणसं ‘कनेक्टेड’ असतात. आणि तरी देखील आयुष्यात एक काळ असा येतो जेव्हा या भाऊगर्दीत मी एकटा आहे असं वाटायला लागतं.
कर्मण्येवाधिकारस्ते...
गेली कित्येक वर्ष भगवंतांनी सांगितलेल्या या वाक्याचा अर्थ लावतोय... हो बरोबरच वाचलत. कित्येक वर्ष.... अहो, भगवद्गीता ही गोष्टच अशी आहे की जितके वेळा ती वाचू तितके वेळा वेगवेगळे अर्थ लक्षात यायला लागतात.
जितक्या प्रमाणात कर्म करू तितक्या प्रमाणात फळ मिळालं पाहिजे ही अपेक्षा ठेवण्यात काय चुकलं माझं असं माझं मन मला सारखं विचारायचं. या श्लोकात ४ गोष्टी श्रीकृष्णांनी सांगितल्या आहेत. १) फक्त कर्म करण्याचा तुला अधिकार आहे २) कर्माच्या फळांवर तुझा अधिकार नाही. ३) मिळालेल्या फळाला तू कारणीभूत आहेस असे समजू नकोस. आणि ४) या सगळ्यामुळे कर्म न करण्यासही तू उद्युक्त होऊ नकोस.
