विचार

"शिळा"लेख....

ss_sameer's picture
ss_sameer in जनातलं, मनातलं
20 Apr 2018 - 10:43 pm

आमच्या कडे कधीच शिळ उरत नाही.

कारण ज्या दिवशी जेवण मला आवडतं ते अन्न तिला आवडत नाही, आणि तिला आवडलेलं मी पोटभर खाऊ शकत नाही.

आठवड्यातले तीन दिवस कोणीतरी एक पोटापेक्षा जास्त खाऊन तृप्त असतो तर उरलेले तीन दिवस दुसरा, कारण स्वयंपाक सरासरी एक दिवसाआड चांगला बनवला जातो.

अर्थात माझ्या दृष्टीने उत्तम म्हणजे तिच्या दृष्टीने बेचव ह्या व्याख्येप्रमाणे.

आठवड्याचे उरलेले तीन दिवस मी कमी जेवतो याची दोन कारणे, एक म्हणजे आमची अन्नपूर्णा इतकी देखील वाईट स्वयंपाकिण नाही की पूर्ण उपाशी राहावे लागेल. आणि दुसरं म्हणजे मला आवडलेलं तिने खाल्लं तर तिचं मन कसं भरेल?

विनोदप्रकटनविचारविरंगुळा

रामानुजम आणि रेमन झीटा

साहना's picture
साहना in जनातलं, मनातलं
20 Apr 2018 - 10:07 am

१ + २ + ३ + ४ + ५ + ६ ....... = -१/१२

समजा वरील समीकरण कुणी तुम्हाला दाखवले तर तुम्हाला काय वाटेल ? कि ह्या माणसाला गणित अजिबात येत नाही. सर्व पॉसिटीव्ह अंकाची बेरीज निगेटिव्ह कशी असू शकते ?

पण गणिताचे मूलभूत सिद्धांत ज्यांना चांगले समजतात त्यांनी जर वरील समीकरणाला पहिले तर कदाचित त्यांना त्यांत थोडे तथ्य दिसू शकते. रामानुजम ह्यांनी हार्डीना जे पात्र पाठविले त्यात हे समीकरण होते. हार्डी ह्यांनी रामानुजमची प्रतिभा ओळखून त्यांना लंडन ला बोलावले. भारताच्या गुलामगिरीच्या काळांत जे काही थोडे चांगले साहेब होते त्यांत हार्डीचा नंबर फार वरचा आहे.

तंत्रविचार

तुमच्या देशात....

शिव कन्या's picture
शिव कन्या in जनातलं, मनातलं
13 Apr 2018 - 1:33 pm

मोबाईल स्क्रिनवर त्या छोट्या मुलीचा फोटो दाखवत मला सकाळी शेजारणीने विचारले,'असं करणार्यांना तुमच्या देशात काय करतात?'
'शिक्षा होते...'
'हातं छाटतात? दगडाने चेचतात?'
'नाही.'
'मग काय करतात?'
'सगळे कोर्टात जातात, परत बलात्कार बलात्कार नावाचा हलकट खेळ खेळतात.'
'........'
------
'आम्ही यंदाच्या सुट्टीत अल् हिंदला जाणारोत!' एक आडनीड्या वयातली शाळकरी पोर सांगत येते.एरवी अल् हिंद म्हटलं कि कोण आनंद होतो!पण काल झाला नाही.
'काय पाहणार हिंदमध्ये?'

धोरणसमाजजीवनमानविचारबातमी

गाणे कसे बनते?

arunjoshi123's picture
arunjoshi123 in जनातलं, मनातलं
11 Apr 2018 - 11:31 am

केवळ पद्यसंवादच करणारा समाज गोष्टींत ऐकला आहे, पण प्रत्यक्ष कधी होता का माहित नाही. जगात सर्व प्राचीन साहित्य मुख्यतः पद्य स्वरुपात कशामुळं असलं पाहिजे? काही वेद (कि वेदांचा काही भाग?) सोडले तर जवळजवळ सारा इतिहासच पद्य आहे असं वाटतं. समाजाला इतकी कवनप्रियता का असावी? छंदबद्धता आवश्यक असणे हा पद्द्यातिरेक होता का? असो.
-------------
कविता आणि गाणे यांच्यात मूलभूत फरक काय?

कलाविचार

निष्ठा आणि लोणी

आशु जोग's picture
आशु जोग in जनातलं, मनातलं
10 Apr 2018 - 2:31 pm

एका जंगलात त्या जंगलाचा राजा सिंह रहात होता, त्याला काही उंदरांनी सतावून सोडले होते. ते उंदीर तो झोपलेला असताना त्याची आयाळ कुरतडत, त्याला त्रास देत. इतका मोठा सिंह पण उंदरांचा बंदोबस्त करू शकत नसे. म्हणून मग त्याने एक मांजर नोकरीवर ठेवले. मांजर सिंहाला त्रास देणाऱ्या उंदरांना खात असे. त्यामुळे सिंहाची झोपही नीटपणे व्हायला लागली. याबदल्यात सिंह मांजराला रोज दूध देत असे. एके दिवशी अतिउत्साहाने मांजराने सगळेच उंदीर फस्त करून टाकले. पुढेपुढे सिंहाला उंदरांचा उपद्रवच राहिला नाही मग त्याला प्रश्न पडला की आपण मांजराला अजूनही दूध का बरे देतो आहे ? त्याने मांजराला नोकरीवरून काढून टाकले.

समाजविचार

नाशिक विमानतळ :- (जाणूनबुजून तयार केलेल्या) समस्यांचे तळ

पाषाणभेद's picture
पाषाणभेद in जनातलं, मनातलं
7 Apr 2018 - 9:32 am

नाशिक विमानतळ :- (जाणूनबुजून तयार केलेल्या) समस्यांचे तळ

प्रवासप्रकटनविचार

सलमानचे चेटूक आणि आपली अविवेकी मानसिकता.

Jayant Naik's picture
Jayant Naik in जनातलं, मनातलं
6 Apr 2018 - 12:07 pm

फेब्रुवारी १९९८ मधील काळवीट मारल्याची घटना . ५ एप्रिल २०१८ मध्ये जोधपुर कोर्टाचा निकाल. सलमान एका खटल्यामध्ये दोषी ठरला. आता परत अपील .. हायकोर्ट आणि नंतर सुप्रीम कोर्ट.अजून २० वर्षे सहज जाणार. २० वर्षे गेलेलीच आहेत !

संस्कृतीविचार